Hebrews 12:1 in Marathi 1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
Other Translations King James Version (KJV) Wherefore seeing we also are compassed about with so great a cloud of witnesses, let us lay aside every weight, and the sin which doth so easily beset us, and let us run with patience the race that is set before us,
American Standard Version (ASV) Therefore let us also, seeing we are compassed about with so great a cloud of witnesses, lay aside every weight, and the sin which doth so easily beset us, and let us run with patience the race that is set before us,
Bible in Basic English (BBE) For this reason, as we are circled by so great a cloud of witnesses, putting off every weight, and the sin into which we come so readily, let us keep on running in the way which is marked out for us,
Darby English Bible (DBY) Let *us* also therefore, having so great a cloud of witnesses surrounding us, laying aside every weight, and sin which so easily entangles us, run with endurance the race that lies before us,
World English Bible (WEB) Therefore let us also, seeing we are surrounded by so great a cloud of witnesses, lay aside every weight and the sin which so easily entangles us, and let us run with patience the race that is set before us,
Young's Literal Translation (YLT) Therefore, we also having so great a cloud of witnesses set around us, every weight having put off, and the closely besetting sin, through endurance may we run the contest that is set before us,
Cross Reference Matthew 10:22 in Marathi 22 माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यत जो टिकेल तोच तरेल.
Matthew 10:37 in Marathi 37 “जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
Matthew 24:13 in Marathi 13 पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
Luke 8:14 in Marathi 14 आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जातां जातां चिंता व धन व ह्या आयुष्यांतली सुखे यांनी गुदमरून जातात, व भरदार पीक देत नाहीत.
Luke 9:59 in Marathi 59 मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, माझ्या मागे ये. परंतु तो म्हणाला, हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे, आणि माझ्या बापाला पुरूं दे,
Luke 12:15 in Marathi 15 मग येशू त्यांना म्हणाला, “सांभाळा आणि सर्व प्रकारच्या लोभापासून स्वतः:ला दूर ठेवा. कारण जेव्हा एखाद्या माणसाजवळ त्याच्या गरजेपेक्षा अधिक असते तेव्हा ती संपत्ती म्हणजे त्याचे जीवन असे होत नाही.”
Luke 14:26 in Marathi 26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतः:च्या जिवाचासुध्दा व्देष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
Luke 16:28 in Marathi 28 लाजराला माझ्या पाच भावंडाकडे जाऊन त्यांना सावध करू दे म्हणजे ते तरी या दुःखाच्या ठिकाणी येणार नाहीत.’
Luke 18:22 in Marathi 22 जेव्हा येशूने हे ऐकले, तेव्हा तो त्याला म्हणाला, “तुझ्यामध्ये अजून एका गोष्टीची कमी आहे. तुझ्याजवळचे सर्व काही विकून ते गरिबांना वाट, म्हणजे स्वर्गात तुला धन मिळेल. मग ये. माझ्या मागे चल.”
Luke 21:34 in Marathi 34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व ह्या हल्लीच्या आयुष्यासंबंधीच्या चिंता ह्यांनी तुमची अंतकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल.
John 3:32 in Marathi 32 जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
John 4:39 in Marathi 39 'मी केलेले सर्व काही त्याने मला सांगितले' अशी साक्ष देणाऱ्या त्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या नगरातल्या पुष्कळ शोमरोनी लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
John 4:44 in Marathi 44 कारण येशूने स्वतः साक्ष दिली की, संदेष्ट्याला स्वतःच्या देशात मान मिळत नाही.
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:24 in Marathi 24 कारण, आपण आशेने तारले गेलो आहो; पण दिसणारी आशा ही आशा नाही, कारण जी गोष्ट दिसत आहे तिची कोणी आशा करतो का?
Romans 12:12 in Marathi 12 आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
Romans 13:11 in Marathi 11 आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.
1 Corinthians 9:24 in Marathi 24 शर्यतीत धावणारे सगळेच धावतात पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून असे धावा की,ते तुम्ही मिळवाल.
2 Corinthians 7:1 in Marathi 1 प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुध्देपासून स्वतःला शुध्द करू, आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
Galatians 5:7 in Marathi 7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Philippians 2:16 in Marathi 16 त्या लोकांमध्ये तुम्ही जीवनाचे वचन पुढे करून दाखवतांना ज्योतीसारखे जगात दिसता. असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमहि व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
Philippians 3:10 in Marathi 10 हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची,त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी आेळख करून घ्यावी.
Colossians 3:5 in Marathi 5 तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा,कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे,हे जिवें मारा.
1 Timothy 6:9 in Marathi 9 पण जे श्रीमंत होऊ पाहतात ते परीक्षेत आणि सापळ्यात व अति मूर्खपणाच्या आणि हानिकारक अभिलाषांच्या आहारी जाऊन नाश पावतात.
2 Timothy 2:4 in Marathi 4 सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्याला आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
2 Timothy 4:7 in Marathi 7 मी सुयुध्द केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
Hebrews 6:15 in Marathi 15 म्हणून धीराने वाट पाहिल्यानंतर देवाने जे वचन त्याला दिले होते ते त्याला प्राप्त झाले.
Hebrews 10:35 in Marathi 35 म्हणून धैर्य सोडू नका,त्याचे प्रतिफळ माेठे आहे.
Hebrews 11:2 in Marathi 2 त्याद्वारे आमच्या पूर्वजांनी साक्ष मिळवली.
James 1:3 in Marathi 3 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
James 5:7 in Marathi 7 यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो.
1 Peter 2:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून,
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
1 Peter 5:12 in Marathi 12 मी ज्या सिल्वान ला विश्वासू बंधू म्हणून मानतो त्याच्या हाती तुम्हाला थोडक्यात लिहून पाठवून, बोध करतो आणि साक्ष देतो की, ही देवाची खरी कृपा आहे. हित तुम्ही स्थिर रहा.
2 Peter 1:6 in Marathi 6 ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात धीराची,धीरात सुभक्तीची,
1 John 2:15 in Marathi 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 3:10 in Marathi 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
Revelation 13:10 in Marathi 10 जो कैदेत जायचा तो कैदेत जाताे; जो तलवारीने जीवे मारील त्याला तलवारीने मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो. भुमीतून वर आलेले श्वापद
Revelation 22:16 in Marathi 16 “तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक अंकुर व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे. ”