Hebrews 10:25 in Marathi 25 आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन दयावे.
Other Translations King James Version (KJV) Not forsaking the assembling of ourselves together, as the manner of some is; but exhorting one another: and so much the more, as ye see the day approaching.
American Standard Version (ASV) not forsaking our own assembling together, as the custom of some is, but exhorting `one another'; and so much the more, as ye see the day drawing nigh.
Bible in Basic English (BBE) Not giving up our meetings, as is the way of some, but keeping one another strong in faith; and all the more because you see the day coming near.
Darby English Bible (DBY) not forsaking the assembling of ourselves together, as the custom [is] with some; but encouraging [one another], and by so much the more as ye see the day drawing near.
World English Bible (WEB) not forsaking our own assembling together, as the custom of some is, but exhorting one another; and so much the more, as you see the Day approaching.
Young's Literal Translation (YLT) not forsaking the assembling of ourselves together, as a custom of certain `is', but exhorting, and so much the more as ye see the day coming nigh.
Cross Reference Matthew 18:20 in Marathi 20 कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.”
Matthew 24:33 in Marathi 33 त्याचप्रमाणे तुम्ही ह्या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दाराजवळ आहे.
Mark 13:29 in Marathi 29 त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे.
John 20:19 in Marathi 19 तेव्हा त्याच दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी,शिष्य जेथे जमले होते तेथील दारे यहूद्यांच्या भीतीमुळें,बंद असता. येशू आला मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.”
Acts 1:13 in Marathi 13 आणि आल्यावर ते माडीवरच्या एका खोलीत जिथे पेत्र, योहान, याकोब, अंद्रिया, फिलिप्प, थोमा, बर्थलमय, मत्तय,अल्फीचा मुलगा याकोब, शिमोन जिलोत व याकोबाचा मुलगा यहूदा हे राहत होते तिथे गेले;
Acts 2:1 in Marathi 1 नंतर पेन्टीकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना,
Acts 2:42 in Marathi 42 ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.
Acts 16:16 in Marathi 16 मग असे झाले की, आम्ही प्रार्थना स्थळाकडे जात असता कोणीएक भूत लागलेली मुलगी आम्हाला आढळली. तिच्या अंगात येत असे .ती दैवप्रश्न सांगून आपल्या धन्यांना पुष्कळ मिळकत करून देत असे.
Acts 20:7 in Marathi 7 मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे रविवारी आम्ही सर्व भाकर मोडण्यासाठी एकत्र जमलो असताना, पौल त्यांच्याबरोबर बोलू लागला कारण दुसऱ्या दिवशी निघण्याचा त्याचा बेत होता. तो मध्यरात्रीपर्यंत बोलत राहीला.
Romans 12:8 in Marathi 8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
Romans 13:11 in Marathi 11 आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.
1 Corinthians 3:13 in Marathi 13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा करील.
1 Corinthians 5:4 in Marathi 4 जेव्हा तुम्ही प्रभू येशूच्या नावाने एकत्र जमाल आणि तेव्हा आपला प्रभू येशू ह्याच्या सामर्थ्याने, माझा आत्मा तुमच्याबरोबर असेल,
1 Corinthians 11:17 in Marathi 17 पण आता ही पुढची आज्ञा देत असताना मी तुमची प्रशंसा मंडळी म्हणून करीत नाही, कारण तुमच्या एकत्र येण्याने तुमचे चांगले न होता तुमचे वाईट होते.
1 Corinthians 11:20 in Marathi 20 म्हणून जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने प्रभुभोजन घेत नाही.
1 Corinthians 14:3 in Marathi 3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती,व सांत्वन याविषयी बोलतो,
1 Corinthians 14:23 in Marathi 23 म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल (आणि) जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हाला म्हणणार नाही का?
Philippians 4:5 in Marathi 5 सर्व लोकांना तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे.
1 Thessalonians 4:18 in Marathi 18 म्हणून तुम्ही ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा.
1 Thessalonians 5:11 in Marathi 11 म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहा.
Hebrews 3:13 in Marathi 13 जोपर्यंत , “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.
Hebrews 10:24 in Marathi 24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
James 5:8 in Marathi 8 तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे.तुमचे अंतःकरण बळकट करा, कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
1 Peter 4:7 in Marathi 7 पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे; म्हणून समंजस मनाचे व्हा, आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
2 Peter 3:9 in Marathi 9 कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे.
2 Peter 3:11 in Marathi 11 ह्या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे?
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
Jude 1:19 in Marathi 19 हे फूट पाडणारे लोक देहबुद्धी स्वभावाचे, आत्मा नसलेले लोक आहेत.