Galatians 6:1 in Marathi 1 बंधूंनो, कोणी माणूस अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्याला सौम्यतेच्या आत्म्याने ताळ्यावर आणा; तूही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे.
Other Translations King James Version (KJV) Brethren, if a man be overtaken in a fault, ye which are spiritual, restore such an one in the spirit of meekness; considering thyself, lest thou also be tempted.
American Standard Version (ASV) Brethren, even if a man be overtaken in any trespass, ye who are spiritual, restore such a one in a spirit of gentleness; looking to thyself, lest thou also be tempted.
Bible in Basic English (BBE) Brothers, if a man is taken in any wrongdoing, you who are of the Spirit will put such a one right in a spirit of love; keeping watch on yourself, for fear that you yourself may be tested.
Darby English Bible (DBY) Brethren, if even a man be taken in some fault, ye who are spiritual restore such a one in a spirit of meekness, considering thyself lest *thou* also be tempted.
World English Bible (WEB) Brothers, even if a man is caught in some fault, you who are spiritual must restore such a one in a spirit of gentleness; looking to yourself so that you also aren't tempted.
Young's Literal Translation (YLT) Brethren, if a man also may be overtaken in any trespass, ye who `are' spiritual restore such a one in a spirit of meekness, considering thyself -- lest thou also may be tempted;
Cross Reference Matthew 9:13 in Marathi 13 मी तुम्हाला सांगतो, जा आणि याचा अर्थ काय ते शिका; ‘मला यज्ञपशूंची अर्पणे नकोत, तर दया हवी.’ मी नीतिमान लोकांना नव्हे, तर पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे.”
Matthew 11:29 in Marathi 29 माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Matthew 18:12 in Marathi 12 “जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरु शोधायला जाईल की नाही?
Luke 15:4 in Marathi 4 “तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानांत सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय?
Luke 15:22 in Marathi 22 परंतु बाप आपल्या नोकरांस म्हणाला, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्याला घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला.
Romans 8:6 in Marathi 6 कारण देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती.
Romans 14:1 in Marathi 1 जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
Romans 15:1 in Marathi 1 म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा, आणि स्वतःला संतुष्ट करू नये.
1 Corinthians 2:15 in Marathi 15 जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.
1 Corinthians 3:1 in Marathi 1 बंधूंनो आत्मिक लोकांशी बोलावे तसा मी तुमच्याशी बोलू शकलो नाही. पण त्याऐवजी मला तुमच्याशी दैहिक लोकांसारखे आणि ख्रिस्तामधील बालकांसारखे बोलावे लागले.
1 Corinthians 4:21 in Marathi 21 तुम्हाला कोणते पाहिजे? मी तुमच्याकडे तुम्हाला शिक्षा करण्यासाठी काठी घेऊन यावे की, प्रीतीने व सौम्यतेच्या आत्म्याने यावे?
1 Corinthians 7:5 in Marathi 5 विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हाला प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.
1 Corinthians 10:12 in Marathi 12 म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.
1 Corinthians 14:37 in Marathi 37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. -
2 Corinthians 2:7 in Marathi 7 म्हणून, उलट त्याला क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे; यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
Galatians 2:11 in Marathi 11 पण त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्या समोर त्याला आडवा आलो, कारण तो दोषीच होता.
Galatians 5:23 in Marathi 23 सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूध्द नियमशास्त्र नाही.
2 Thessalonians 3:15 in Marathi 15 तरी त्याला शत्रु समजू नका, तर त्याला बंधु समजून त्याची कान उघडणी करा.
2 Timothy 2:25 in Marathi 25 जे त्याला विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप कण्याची बुद्धी देईल.
Hebrews 12:13 in Marathi 13 तुमच्या पावलांकरीता सरळ वाटा तयार करा यासाठी की, लंगडे पाय निकामी होऊ नयेत, तर उलट ते बरे व्हावेत.
Hebrews 13:3 in Marathi 3 तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
James 3:2 in Marathi 2 कारण, पुष्कळ गोष्टींत आपण सर्व जण चुकतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही कह्यात ठेवण्यास समर्थ आहे.
James 3:13 in Marathi 13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
James 5:19 in Marathi 19 माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्याला परत आणले तर पापी मनुष्याला चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो.
1 Peter 3:15 in Marathi 15 पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्याला सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा.
1 John 5:16 in Marathi 16 जर एखाद्याला त्याचा बंधूला पापात पडलेला दिसला आणि त्याचा परिणाम मरण नसेल तर त्याने त्याच्याकरता प्रार्थना करावी आणि देव त्याला जीवन देईल. ज्याचा परिणाम मरण नाही असे पाप करणार्यास ते देईल. ज्याचा परिणाम मरण आहे असेही पाप आहे, आणि त्यासाठी त्याने विनंती करावी असे मी म्हणत नाही.
Jude 1:22 in Marathi 22 जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा;