Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Other Translations King James Version (KJV) I am crucified with Christ: neverthless I live; yet not I, but Christ liveth in me: and the life which I now live in the flesh I live by the faith of the Son of God, who loved me, and gave himself for me.
American Standard Version (ASV) I have been crucified with Christ; and it is no longer I that live, but Christ living in me: and that `life' which I now live in the flesh I live in faith, `the faith' which is in the Son of God, who loved me, and gave himself up for me.
Bible in Basic English (BBE) I have been put to death on the cross with Christ; still I am living; no longer I, but Christ is living in me; and that life which I now am living in the flesh I am living by faith, the faith of the Son of God, who in love for me, gave himself up for me.
Darby English Bible (DBY) I am crucified with Christ, and no longer live, *I*, but Christ lives in me; but [in] that I now live in flesh, I live by faith, the [faith] of the Son of God, who has loved me and given himself for me.
World English Bible (WEB) I have been crucified with Christ, and it is no longer I that live, but Christ living in me. That life which I now live in the flesh, I live by faith in the Son of God, who loved me, and gave himself up for me.
Young's Literal Translation (YLT) with Christ I have been crucified, and live no more do I, and Christ doth live in me; and that which I now live in the flesh -- in the faith I live of the Son of God, who did love me and did give himself for me;
Cross Reference Matthew 4:3 in Marathi 3 तेव्हा सैतान येशूची परीक्षा घेण्यासाठी त्याच्याकडे आला व म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर ह्या दगडांना भाकरी होण्याची आज्ञा कर.”
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
John 1:49 in Marathi 49 नथनेलाने उत्तर दिले, “गुरूजी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहा.”
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 6:57 in Marathi 57 जसे जिवंत पित्याने मला पाठवले, आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोही माझ्यामुळे जगेल.
John 6:69 in Marathi 69 आणि आम्ही विश्वास ठेवला आहे, आणि जाणतो की, तू देवाचा पवित्र पुरूष आपण आहा.”
John 9:35 in Marathi 35 त्यांनी त्याला बाहेर घालविले हे येशूने ऐकले; आणि त्याला तो सांपडल्यावर तो त्याला म्हणाला, “तू मनुष्याच्या पुत्रावर विश्वास ठेवतोस काय?”
John 10:11 in Marathi 11 मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
John 14:19 in Marathi 19 आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
John 15:13 in Marathi 13 आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा ह्यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
John 17:21 in Marathi 21 की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा.
Acts 8:36 in Marathi 36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ)आले. अधिकारी म्हणाला, “पाहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.त्याने उत्तर दिले,येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
Romans 1:17 in Marathi 17 कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. कारण असा शास्त्रलेख आहे की, नीतिमान विश्वासाने जगेल’.
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 6:4 in Marathi 4 म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की, जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मेलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे.
Romans 6:8 in Marathi 8 पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मेलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो.
Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Romans 8:2 in Marathi 2 कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले.
Romans 8:37 in Marathi 37 पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्या द्वारे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
2 Corinthians 1:24 in Marathi 24 आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवितो असे नाही, पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकारी आहोत; कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात.
2 Corinthians 4:10 in Marathi 10 आम्ही निरंतर आमच्या शरिरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरिरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.
2 Corinthians 5:7 in Marathi 7 (कारण आम्ही विश्वासाने चालतो, पाहून नाही;)
2 Corinthians 5:15 in Marathi 15 आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मेला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मेला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
2 Corinthians 10:3 in Marathi 3 कारण, आम्ही देहात चालणारे असूनही अाम्ही देहस्वभावाप्रमाणे युध्द करत नसतो.
2 Corinthians 13:3 in Marathi 3 कारण माझ्या द्वारे ख्रिस्त बोलतो ह्याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच; तो तुमच्यासंबंधाने दुर्बळ नाही पण तुमच्यात समर्थ आहे.
2 Corinthians 13:5 in Marathi 5 तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही , म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हाला आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 2:16 in Marathi 16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो,हे जाणून आम्ही ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला;ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्ही ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Galatians 3:11 in Marathi 11 नियमशास्त्राने कोणीही देवासमोर नीतिमान ठरत नाही, हे उघड आहे; कारण ‘नीतिमान विश्वासाने जगेल’.
Galatians 5:24 in Marathi 24 जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाला भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
Galatians 6:14 in Marathi 14 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो.पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
Ephesians 2:4 in Marathi 4 “पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.”
Ephesians 3:17 in Marathi 17 विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असे असून,
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Ephesians 5:25 in Marathi 25 पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
Philippians 4:13 in Marathi 13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे.
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
Colossians 2:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे.
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
1 Thessalonians 1:10 in Marathi 10 आणि त्याचा पुत्र येशू ह्याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास,तुम्ही मूर्तींपासून देवाकडे कसे वळलां, हे ते आपण होऊन आम्हाविषयी सांगतात; तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मेलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
1 Thessalonians 5:10 in Marathi 10 प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी ह्याकरता मेला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
1 Peter 1:8 in Marathi 8 तुम्ही त्याला बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्याला पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसित होता.
1 Peter 4:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले; आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा. कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे.
1 John 1:7 in Marathi 7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
1 John 4:9 in Marathi 9 देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.
1 John 4:14 in Marathi 14 ही गोष्ट आम्ही पाहिली आहे व आम्ही साक्ष देतो की, जगाचा तारणारा म्हणून पित्याने पुत्राला पाठवले आहे.
1 John 5:10 in Marathi 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 3:20 in Marathi 20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.