Colossians 1:28 in Marathi 28 आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्याला बोध करतो, आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
Other Translations King James Version (KJV) Whom we preach, warning every man, and teaching every man in all wisdom; that we may present every man perfect in Christ Jesus:
American Standard Version (ASV) whom we proclaim, admonishing every man and teaching every man in all wisdom, that we may present every man perfect in Christ;
Bible in Basic English (BBE) Whom we are preaching; guiding and teaching every man in all wisdom, so that every man may be complete in Christ;
Darby English Bible (DBY) whom *we* announce, admonishing every man, and teaching every man, in all wisdom, to the end that we may present every man perfect in Christ.
World English Bible (WEB) whom we proclaim, admonishing every man and teaching every man in all wisdom, that we may present every man perfect in Christ Jesus;
Young's Literal Translation (YLT) whom we proclaim, warning every man, and teaching every man, in all wisdom, that we may present every man perfect in Christ Jesus,
Cross Reference Matthew 3:7 in Marathi 7 परंतु परूशी व सदूकी ह्यांच्यापैकी पुष्कळ जणांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून त्याने त्यास म्हटले, अहो दुष्ट सापांच्या पिलांनो, होणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हाला कोणी सावध केले?
Matthew 5:48 in Marathi 48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा’.
Matthew 28:20 in Marathi 20 आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
Mark 6:34 in Marathi 34 येशू नावेतून उतरला तेव्हा, त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला; त्याला त्यांचा कळवळा आला, कारण ते मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे होते. मग तो त्यांना बऱ्याच गोष्टीविषयी शिक्षण देऊ लागला.
Luke 21:15 in Marathi 15 कारण मी तुम्हाला असे शब्द व अशी बुध्दी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही.
Acts 3:20 in Marathi 20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
Acts 5:42 in Marathi 42 आणि दररोज मंदिरात व घरोघर शिकवण्याचे व येशू हाच ख्रिस्त आहे ही सुवार्ता गाजविण्याचे त्यांनी सोडले नाही.
Acts 8:5 in Marathi 5 फिलिप्प शोमरोनातील एका शहरात गेला. त्याने ख्रिस्ताची घोषणा केली . तेथील लोकांनी फिलिप्पाचे बोलणे ऐकले व त्याने केलेले चमत्कार पाहिले
Acts 8:35 in Marathi 35 मग फिलिप्पाने तोंड उघडले व पवित्र शास्त्रातील यशया संदेष्टयाच्या भागापासून सुरुवात करून येशूविषयीची सुवार्ता त्याला सांगितली.
Acts 9:20 in Marathi 20 यानंतर सरळ सभास्थानात जाऊन शौल येशूच्या नावाची घोषणा करू लागला. की, येशू हा देवाचा पुत्र आहे.
Acts 10:36 in Marathi 36 देव यहूदी लोकांशी बोलला. देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताव्दारे शांती जगात आली आहे. येशू सर्वाचा प्रभू आहे!
Acts 11:20 in Marathi 20 यातील काही विश्वासणारे कुप्र व कुरेने येथे राहणारे होते. जेव्हा हे लोक अंत्युखियात आले, तेव्हा त्यांनी या ग्रीक लोकांना येशूविषयीची सुवार्ता सांगितली.
Acts 13:38 in Marathi 38 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते.
Acts 17:3 in Marathi 3 त्यांने शास्त्राचा उलगडा करून असे प्रतिपादन केले की, ख्रिस्ताने दुःख सोसावे व मेलेल्यांमधून पुन्हा उठावे ह्याचे अगत्य होते, आणि ज्या येशूची मी तुमच्यापुढे घोषणा करीत आहे तोच तो ख्रिस्त आहे.
Acts 17:18 in Marathi 18 तेव्हा एपिकूरपंथी व स्तोयिकपंथी ह्यांच्याबरोबर कित्येक तत्वज्ञांनी त्याला विरोध केला. कित्येक म्हणाले, हा बडबड्या काय बोलतो ? दुसरे म्हणाले, हा परक्या दैवतांची घोषणा करणारा दिसतो; कारण येशू व पुनरुत्थान हयाविषयीच्या सुवार्तेची तो घोषणा करीत असे.
Acts 20:27 in Marathi 27 देवाची संपूर्ण इच्छा काय आहे हे प्रकट करण्यास मी कधीही मागेपुढे पाहिलेले नाही.
Acts 20:31 in Marathi 31 यासाठी सावध राहा. तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
1 Corinthians 1:23 in Marathi 23 परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण, आणि यहूदीतरांसाठी मूर्खपणा असा आहे.
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 2:6 in Marathi 6 जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो, परंतु ते ज्ञान ह्या जगाचे नाही आणि ह्या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही.
1 Corinthians 2:15 in Marathi 15 जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.
1 Corinthians 4:14 in Marathi 14 मी तुम्हाला हे लाजविण्यासाठी लिहित नाहीः तर उलट मी तुम्हाला माझ्या प्रिय लेकरांप्रमाणे चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतो,
1 Corinthians 12:8 in Marathi 8 कारण एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाचे वचन मिळते , आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते.
1 Corinthians 15:12 in Marathi 12 पण जर आम्ही ख्रिस्त मेलेल्यातून उठविला गेला आहे अशी सुवार्ता गाजवितो, तर मृतांचे पुनरुत्थान नाही असे तुमच्यातील काहीजण म्हणतात हे कसे?
2 Corinthians 4:5 in Marathi 5 कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण येशू ख्रिस्त जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो, आणि येशूकरता आम्ही तुमचे दास आहोत.
2 Corinthians 10:14 in Marathi 14 कारण जणू, आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नव्हतो, अशा प्रकारे, आम्ही मर्यादे बाहेर जात नाही. कारण, आम्ही ख्रिस्ताची सुवार्ता गाजवीत तुमच्यापर्यंत प्रथम पोहचलोच आहो.
2 Corinthians 11:2 in Marathi 2 कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हाला शुध्द कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
Ephesians 3:8 in Marathi 8 जरी मी सर्व पवित्र जनांमध्ये अगदी अयोग्य, लहानातील लहान आहे तरी मला हे ख्रिस्ताच्या गहन अशा संपत्तीची सुवार्ता परराष्ट्रीयांना सांगावी हे कृपेचे दान मला दिले गेले,”
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Ephesians 5:27 in Marathi 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
Philippians 1:15 in Marathi 15 कित्येक मत्सराने व वैरभावानेही ख्रिस्ताची घोषणा करीत आहेत; आणि काही सदिच्छेने करीत आहेत.
Colossians 1:22 in Marathi 22 त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हाला त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.
Colossians 2:10 in Marathi 10 तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्या ठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,
Colossians 3:16 in Marathi 16 ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंत:करणात स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा.
1 Thessalonians 4:6 in Marathi 6 कोणी ह्या गोष्टींचे उल्लंघन करून आपल्या बंधूचा गैरफायदा घेऊ नये; कारण प्रभू ह्या सर्व गोष्टींबद्दल शासन करणारा आहे; हे आम्ही तुम्हास अाधीच सांगितले होते व बजावलेहि होते.
1 Thessalonians 5:12 in Marathi 12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
1 Timothy 3:2 in Marathi 2 तर वडील हा निर्दोष, एका बायकोचा नवरा, मिताचारी ,सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण , असा असावा.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
2 Timothy 2:24 in Marathi 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
Hebrews 10:14 in Marathi 14 कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
2 Peter 3:15 in Marathi 15 आणि आपल्या प्रभूची सहनशीलता हे तारणच आहे असे समजा. आपला प्रिय बंधू पौल ह्याला देण्यांत आलेल्या ज्ञानाप्रमाणे त्यानेहि तुम्हास असेच लिहिले आहे.