Acts 3:26 in Marathi 26 देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले; यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.
Other Translations King James Version (KJV) Unto you first God, having raised up his Son Jesus, sent him to bless you, in turning away every one of you from his iniquities.
American Standard Version (ASV) Unto you first God, having raised up his Servant, sent him to bless you, in turning away every one of you from your iniquities.
Bible in Basic English (BBE) To you, first, God sent his servant, blessing you by turning every one of you from his sins.
Darby English Bible (DBY) To you first God, having raised up his servant, has sent him, blessing you in turning each one [of you] from your wickedness.
World English Bible (WEB) God, having raised up his servant, Jesus, sent him to you first, to bless you, in turning away everyone of you from your wickedness."
Young's Literal Translation (YLT) to you first, God, having raised up His child Jesus, did send him, blessing you, in the turning away of each one from your evil ways.'
Cross Reference Matthew 1:21 in Marathi 21 ती पुत्राला जन्म देईल, आणि तू त्याचे नाव येशू ठेव,अाणि तो आपल्या लोकांना त्यांच्या पापांपासून तारील ,”
Matthew 10:5 in Marathi 5 येशूने या बारा जणांना अशी आज्ञा देऊन पाठवले की यहूदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
Luke 2:10 in Marathi 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हास सांगतो.
Luke 24:47 in Marathi 47 आणि यरुशलेमापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा गाजविण्यात यावी.
Acts 1:8 in Marathi 8 परंतु पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल,आणि यरूशलेमेत,सर्व यहूदीयांत,शमरोनांत व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.
Acts 2:24 in Marathi 24 त्याला देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले ,कारण त्याला मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
Acts 3:15 in Marathi 15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.
Acts 3:20 in Marathi 20 आणि तुमच्याकरिता पूर्वी नेमलेला ख्रिस्त येशू याला त्याने पाठवावे.
Acts 3:22 in Marathi 22 मोशेने तर सांगितले की, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून उठवील, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.
Acts 3:25 in Marathi 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
Acts 13:26 in Marathi 26 “माझ्या बंधूनो, अब्राहामच्या कुटुंबातील पुत्रांनो, आणि तुम्ही यहूदी नसलेले पण खऱ्या देवाची उपासना करणारे, ऐका! या तारणाची बातमी आम्हाला सांगितली गेली.
Acts 13:32 in Marathi 32 आम्ही तुम्हाला देवाने जे अभिवचन आमच्या वाडवडिलांना (पूर्वजांना) दिले त्याविषयी सुवार्ता सांगतो.
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Acts 18:4 in Marathi 4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
Acts 26:20 in Marathi 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुध्दा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Romans 2:9 in Marathi 9 संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लणी,अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
Romans 15:29 in Marathi 29 आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन.
Galatians 3:9 in Marathi 9 तर मग जे विश्वास ठेवतात त्यांना विश्वासू अब्राहामाबरोबर आशीर्वाद दिला गेला आहे.
Ephesians 1:3 in Marathi 3 स्वर्गीय स्थानातील प्रत्येक आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हाला ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे, त्या आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या देवाला व पित्याला धन्यवाद असोत.
Ephesians 5:26 in Marathi 26 यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
Titus 2:11 in Marathi 11 कारण, सर्व लोकास तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 7:4 in Marathi 4 ज्यांच्या वर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी एेकली इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला.