Acts 3:13 in Marathi 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Other Translations King James Version (KJV) The God of Abraham, and of Isaac, and of Jacob, the God of our fathers, hath glorified his Son Jesus; whom ye delivered up, and denied him in the presence of Pilate, when he was determined to let him go.
American Standard Version (ASV) The God of Abraham, and of Isaac, and of Jacob, the God of our fathers, hath glorified his Servant Jesus; whom ye delivered up, and denied before the face of Pilate, when he had determined to release him.
Bible in Basic English (BBE) The God of Abraham, of Isaac, and of Jacob, the God of our fathers, has given glory to his servant Jesus; whom you gave up, turning your backs on him, when Pilate had made the decision to let him go free.
Darby English Bible (DBY) The God of Abraham and Isaac and Jacob, the God of our fathers, has glorified his servant Jesus, whom *ye* delivered up, and denied him in the presence of Pilate, when *he* had judged that he should be let go.
World English Bible (WEB) The God of Abraham, Isaac, and Jacob, the God of our fathers, has glorified his Servant Jesus, whom you delivered up, and denied in the presence of Pilate, when he had determined to release him.
Young's Literal Translation (YLT) `The God of Abraham, and of Isaac, and of Jacob, the God of our fathers, did glorify His child Jesus, whom ye delivered up, and denied him in the presence of Pilate, he having given judgment to release `him',
Cross Reference Matthew 11:27 in Marathi 27 “माझ्या पित्याने मला सर्व काही दिले आहे. आणि पित्यावाचून कोणी पुत्राला ओळखीत नाही, आणि पुत्रावाचून ज्याला प्रकट करायची पुत्राची इच्छा आहे त्याच्याशिवाय कोणीही पित्याला ओळखीत नाही.
Matthew 20:19 in Marathi 19 आणि थट्टा करावयास , फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्याला परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”
Matthew 22:32 in Marathi 32 ते असे की, ‘मी अब्राहाम, इसहाक आणि याकोबाचा देव आहे.’ तो मेलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.”
Matthew 27:2 in Marathi 2 त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व राज्यपाल पिलाताच्या स्वाधीन केले.
Matthew 27:17 in Marathi 17 म्हणून जेव्हा लोक जमले, तेव्हा पिलाताने त्यांना विचारले, “तुमच्यासाठी मी कोणाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे? बरब्बाला की ज्याला ख्रिस्त म्हणतात त्या येशूला?”
Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
Mark 15:11 in Marathi 11 परंतु पिलाताने त्याच्याऐवजी बरब्बाला सोडावे असे मुख्य याजकांनी लोकांना चिथवले.
Luke 23:4 in Marathi 4 मग पिलात मुख्य याजकांना आणि जमावाला म्हणाला, या माणसावर दोष ठेवण्यास मला काही कारण आढळत नाही.
Luke 23:16 in Marathi 16 म्हणून मी याला फटके मारून सोडून देतो.
John 3:35 in Marathi 35 पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्व काही त्याच्या हाती दिले आहे.
John 5:22 in Marathi 22 पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे.
John 7:39 in Marathi 39 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते.
John 12:16 in Marathi 16 या गोष्टी तर त्याच्या शिष्यांना पहिल्याने समजल्या नव्हत्या, पण येशूचे गौरव झाल्यावर,त्यांना आठवण झाली की, त्याच्याविषयी या गोष्टी लिहिल्या होत्या आणि लोकांनी त्याच्यासाठी असे केले होते.
John 13:31 in Marathi 31 तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे, आणि त्याच्या ठायी देवाचे गौरव झाले आहे;
John 16:14 in Marathi 14 तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळवील.
John 17:1 in Marathi 1 ह्या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, “ हे बापा, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर .
John 18:40 in Marathi 40 तेव्हा पुन्हा ते ओरडून म्हणाले, “ह्याला सोडू नका, तर बरब्बाला सोडा” आता बरब्बा हा एक लुटारू होता.
John 19:12 in Marathi 12 ह्यावरून पिलाताने त्याला सोडायचा प्रयत्न केला, पण यहूदी ओरडून म्हणाले, “आपण जर ह्याला सोडिले तर आपण कैसराचे मित्र नाही; जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला नाकारतो.”
John 19:15 in Marathi 15 ह्यावरून ते ओरडले, “त्याची वाट लावा, त्याची वाट लावा, त्याला वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हाला कैसराशिवाय राजा नाही.”
Acts 2:23 in Marathi 23 तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
Acts 2:33 in Marathi 33 म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे, त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
Acts 5:30 in Marathi 30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;
Acts 7:32 in Marathi 32 मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.' तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
Acts 13:27 in Marathi 27 यरुशलेमेमध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरवले!
Acts 22:14 in Marathi 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Philippians 2:9 in Marathi 9 ह्यामुळे देवाने त्याला सर्वांहून उंच केले आहे. आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्याला दिले आहे.
Hebrews 2:9 in Marathi 9 परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुगुट घातल्याचे पाहत आहोत. कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
Hebrews 11:9 in Marathi 9 विश्वासाने, तो वचनदत्त देशात, जणू परदेशात प्रवासी म्हणून राहिला; आणि त्याच वचनात त्याचे जोडीचे वारीस इसहाक व याकोब ह्यांच्याबरोबर तो डेर्यात राहिला.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.