Acts 24:14 in Marathi 14 तरी मी आपणाजवळ इतके कबूल करतो की, ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेष्ट्यांच्या लेखांत आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी पूर्वजांच्या देवाची सेवा करतो.
Other Translations King James Version (KJV) But this I confess unto thee, that after the way which they call heresy, so worship I the God of my fathers, believing all things which are written in the law and in the prophets:
American Standard Version (ASV) But this I confess unto thee, that after the Way which they call a sect, so serve I the God of our fathers, believing all things which are according to the law, and which are written in the prophets;
Bible in Basic English (BBE) But this I will say openly to you, that I do give worship to the God of our fathers after that Way, which to them is not the true religion: but I have belief in all the things which are in the law and in the books of the prophets:
Darby English Bible (DBY) But this I avow to thee, that in the way which they call sect, so I serve my fathers' God, believing all things which are written throughout the law, and in the prophets;
World English Bible (WEB) But this I confess to you, that after the Way, which they call a sect, so I serve the God of our fathers, believing all things which are according to the law, and which are written in the prophets;
Young's Literal Translation (YLT) `And I confess this to thee, that, according to the way that they call a sect, so serve I the God of the fathers, believing all things that in the law and the prophets have been written,
Cross Reference Matthew 7:12 in Marathi 12 “यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्या असे तुम्हाला वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा. कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.
Matthew 10:32 in Marathi 32 “जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्याला मीसुध्दा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन.
Matthew 22:40 in Marathi 40 सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.”
Luke 1:70 in Marathi 70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांव्दारे फार पूर्वीच सांगितले होते.
Luke 16:16 in Marathi 16 “योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते, आणि तेव्हांपासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजविली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहे.
Luke 16:29 in Marathi 29 पण अब्राहाम म्हणाला, “तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत, त्यांचे त्यांनी ऐकावे.’
Luke 24:27 in Marathi 27 आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्ट्यापर्यंत सांगून, पवित्र शास्त्रात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.
Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
John 1:45 in Marathi 45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
Acts 3:13 in Marathi 13 अब्राहामाचा व इसहाकाचा व याकोबाचा देव, आमच्या पूर्वजांचा देव, याने आपला सेवक येशू याचे गौरव केले आहे, त्याला तुम्ही मरणास सोपवून दिले, व पिलाताने त्याला सोडून देण्याचे ठरवले असताही त्याला तुम्ही त्याच्यासमक्ष नाकारले.
Acts 3:22 in Marathi 22 मोशेने तर सांगितले की, प्रभू देव तुम्हासाठी माझ्यासारखा भविष्यवादी तुमच्या भावांमधून उठवील, तो जे काही तुम्हाला सांगेल ते सर्व त्याचे ऐका.
Acts 5:30 in Marathi 30 ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर टांगून मारले त्याला आपल्या पूर्वजांच्या देवाने उठवले;
Acts 7:32 in Marathi 32 मी तुझ्या पूर्वजांचा देव, अब्राहामाचा, इसहाकाचा व याकोबाचा देव आहे.' तेव्हा मोशे थरथर कापला व त्याला तिकडे पाहण्याचे धैर्य झाले नाही.
Acts 9:2 in Marathi 2 शौलाने दिमिष्क येथील सभास्थानांतील प्रमुख याजकाकडून रिव्रस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की,जर त्याला तेथे कोणी विश्वासणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरूशलेमला आणावे.
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
Acts 13:15 in Marathi 15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविलाः “बंधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही बोधवचन सांगा.
Acts 19:9 in Marathi 9 परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले, व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला, आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले. मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले. आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
Acts 19:23 in Marathi 23 याकाळामध्ये त्यामार्गाविषयी (ख्रिस्ती चळवळीविषयी) मोठा गोंधळ उडाला.
Acts 22:14 in Marathi 14 मग तो म्हणाला आपल्या पूर्वजांच्या देवाने तुझ्यासंबधाने ठरवले आहे की, त्याची इच्छा काय आहे हे तू समजून घ्यावे; आणि त्या नीतिमान पुरुषाला पहावे व त्याच्या तोंडाची वाणी ऐकावी.
Acts 24:5 in Marathi 5 हा माणूस म्हणजे एक पिडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहूदी लोकांत हा बंड उठवणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे.
Acts 24:22 in Marathi 22 फेलिक्साला त्या मार्गाची चांगली माहीती असल्यामुळे त्याने खटला तहकूब करून म्हटले, लुसीयाचा सरदार येईल तेव्हा तुमच्या प्रकरणाचा निकाल करीन.
Acts 26:6 in Marathi 6 आता देवाने आमच्या पुर्वजांना जे वचन दिले त्याची आशा धरल्याबद्दल माझा न्याय होण्याकरिता मी उभा आहे;
Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.”
Acts 26:27 in Marathi 27 अग्रिप्पा महाराज, भविष्यावाद्यांनी जे लिहिले त्यावर तुमचा विश्वास आहे काय? तुमचा त्यावर विश्वास आहे हे मला नक्की माहीत आहे.”
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे.
1 Corinthians 11:19 in Marathi 19 यासाठी की, जे तुमच्यामध्ये पसंतीस उतरलेले आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
Galatians 5:20 in Marathi 20 मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट,
2 Timothy 1:3 in Marathi 3 माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुध्द विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो; आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
Titus 3:10 in Marathi 10 वितंडवादी मनुष्याला पहिला व दुसरा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”