Acts 13:48 in Marathi 48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाला त्यांनी गौरव दिले . आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
Other Translations King James Version (KJV) And when the Gentiles heard this, they were glad, and glorified the word of the Lord: and as many as were ordained to eternal life believed.
American Standard Version (ASV) And as the Gentiles heard this, they were glad, and glorified the word of God: and as many as were ordained to eternal life believed.
Bible in Basic English (BBE) And the Gentiles, hearing this, were glad and gave glory to the word of God: and those marked out by God for eternal life had faith.
Darby English Bible (DBY) And [those of] the nations, hearing it, rejoiced, and glorified the word of the Lord, and believed, as many as were ordained to eternal life.
World English Bible (WEB) As the Gentiles heard this, they were glad, and glorified the word of God. As many as were appointed to eternal life believed.
Young's Literal Translation (YLT) And the nations hearing were glad, and were glorifying the word of the Lord, and did believe -- as many as were appointed to life age-during;
Cross Reference Matthew 28:16 in Marathi 16 पण अकरा शिष्य गालीलात येशूने त्यांना सांगितलेल्या डोंगरावर निघून गेले.
Luke 2:10 in Marathi 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हास सांगतो.
Luke 7:8 in Marathi 8 कारण मीही दुस-याच्या अधिकाराखाली असलेला माणूस असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो, व दुस-याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो, आणि माझ्या दासाला म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो.
John 10:16 in Marathi 16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत;तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
John 10:26 in Marathi 26 तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही.
John 11:52 in Marathi 52 आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.
Acts 2:41 in Marathi 41 तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला; आणि त्या दिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार माणसांची भर पडली.
Acts 2:47 in Marathi 47 सर्व लोक त्यांना प्रसन्न असत आणि प्रभू तारण प्राप्त होत असलेल्या माणसांची दररोज त्यांच्यात भर घालीत असे.
Acts 8:8 in Marathi 8 यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले
Acts 13:42 in Marathi 42 जेव्हा पौल व बर्णबा जाऊ लागले, तेव्हा लोक म्हणाले की, पुढील शब्बाथाच्या दिवशी परत या आणि आम्हाला याविषयी अधिक सांगा.
Acts 15:2 in Marathi 2 तेव्हा पौल व बर्णबा ह्यांचा त्यांच्याशी बराच मतभेद व वादविवाद झाल्यावर असे ठरविण्यात आले की, पौल व बर्णबा ह्यांनी व त्यांच्यापैकी इतर काहींनी ह्या वादासंबधाने यरूशलेमेतले प्रेषीत व वडीलवर्ग हयांच्याकडे जावे.
Acts 15:31 in Marathi 31 त्यातला बोध वाचून त्यांना आनंद झाला.
Acts 20:13 in Marathi 13 तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो. तेथे आम्ही पौलाला घेणार होतो. त्यानेच अशा प्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.
Acts 22:10 in Marathi 10 मग मी म्हणालो , प्रभूजी मी काय करावे ?प्रभूने मला म्हटले,उठून दिमिष्कात जा; मग तू जे काही करावे म्हणून ठरविण्यात आले आहे, त्या सर्वांविषयी तुला तेथे सांगण्यात येईल.
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
Romans 11:7 in Marathi 7 मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्याला मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले.
Romans 13:1 in Marathi 1 प्रत्येक जनाने आपल्यावर असलेल्या अधीकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत.
Romans 15:9 in Marathi 9 आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे. कारण असे लिहिले आहे की, ‘म्हणून, मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’
1 Corinthians 16:15 in Marathi 15 आता बंधूंनो व बहिणींनो स्तेफनाच्या घराण्याविषयी तुम्हाला चांगली माहिती आहे. ते अखयातील प्रथमफळ आहे;आणि पवित्र जनांच्या सेवेसाठी त्यांनी स्वतःला वाहिले आहे. मी तुम्हाला विनंती करतो की,
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Ephesians 1:19 in Marathi 19 “आणि जे आपण विश्वास ठेवणारे त्या आपणाविषयीच्या त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्व ते काय ते तुम्ही त्याच्या बलशाली पराक्रमाच्या कृतीवरून आेळखून घ्यावे .
Ephesians 2:5 in Marathi 5 आम्ही आमच्या अपराधांमध्ये मेलेले असता त्याने आम्हाला ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले तुमचे तारण कृपेने झाले आहे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Thessalonians 3:1 in Marathi 1 बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की,जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगति व्हावी व त्याचे गौरव व्हावे;