Acts 13:39 in Marathi 39 मोशेचे नियमशास्त्र तुम्हाला तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही. पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याव्दारे त्या सर्वाविषयी न्यायी ठरविली जाते.
Other Translations King James Version (KJV) And by him all that believe are justified from all things, from which ye could not be justified by the law of Moses.
American Standard Version (ASV) and by him every one that believeth is justified from all things, from which ye could not be justified by the law of Moses.
Bible in Basic English (BBE) And through him everyone who has faith is made free from all those things, from which the law of Moses was not able to make you free.
Darby English Bible (DBY) and from all things from which ye could not be justified in the law of Moses, in him every one that believes is justified.
World English Bible (WEB) and by him everyone who believes is justified from all things, from which you could not be justified by the law of Moses.
Young's Literal Translation (YLT) and from all things from which ye were not able in the law of Moses to be declared righteous, in this one every one who is believing is declared righteous;
Cross Reference Luke 10:25 in Marathi 25 नंतर एक नियमशास्त्राचा शिक्षक उभा राहिला आणि त्याने येशूची परीक्षा पाहण्याचा प्रयत्न केला, तो म्हणाला, “गुरुजी, अनंतकाळचे जीवन मिळण्यासाठी मी काय केले पाहीजे?
Luke 10:28 in Marathi 28 तेव्हा येशू त्याला म्हणाला, तू बरोबर उत्तर दिलेस, हेच कर म्हणजे तू जगशील.
Luke 18:14 in Marathi 14 मी तुम्हाला सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा अधीक चांगला ठरुन घरी गेला. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्याला कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्याला उंच केले जाईल.”
John 1:17 in Marathi 17 कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्याद्वारे आले.
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
Romans 3:19 in Marathi 19 आता आपण हे जाणतो की, नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते; म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.
Romans 3:24 in Marathi 24 देवाच्या कृपेने ख्रिस्त येशुने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
Romans 4:5 in Marathi 5 पण जो काही करीत नाही, पण जो धर्माचरण न करणार्यास नीतिमान ठरवतो त्याच्यावर विश्वास ठेवतो,त्याचा विश्वास त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणला जातो,
Romans 4:15 in Marathi 15 कारण नियमशास्त्र क्रोधाला कारण होते. पण जेथे नियमशास्त्र नाही तेथे उल्लंघन नाही.
Romans 4:24 in Marathi 24 पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याला ज्याने मेलेल्यातून उठवले, त्याच्यावर आपण विश्वास ठेवला, तर तो ते आपल्याही हिशोबी गणले जाणार आहे .
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
Romans 5:9 in Marathi 9 मग, आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की, त्याच्या द्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
Romans 5:20 in Marathi 20 शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली.
Romans 7:9 in Marathi 9 कारण मी एकदा नियमशास्त्राशिवाय जगत होतो, पण जेव्हा आज्ञा आली तेव्हा पाप सजीव झाले व मी मेलो.
Romans 8:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 8:30 in Marathi 30 आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
Romans 9:31 in Marathi 31 पण जे इस्राएल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
Romans 10:4 in Marathi 4 कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
Romans 10:10 in Marathi 10 कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
Galatians 2:16 in Marathi 16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो,हे जाणून आम्ही ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला;ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्ही ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Galatians 2:19 in Marathi 19 कारण मी नियमशास्त्राद्वारे नियमशास्त्राला मेलो आहे, ह्यासाठी की,मी देवाकरता जगावे.
Galatians 3:8 in Marathi 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल’.
Galatians 3:10 in Marathi 10 कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व आचरण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे’.
Galatians 3:21 in Marathi 21 तर मग नियमशास्त्र हे देवाच्या वचनाविरुध्द आहे काय? कधीच नाही. कारण जीवन देण्यास समर्थ असलेले नियमशास्त्र देण्यात आले असते तर, नीतिमत्व खरोखरच नियमशास्त्राने प्राप्त झाले असते.
Galatians 5:3 in Marathi 3 कारण सुंता झालेल्या प्रत्येक मनुष्याला मी हे पुन्हा निक्षून सांगतो की, तो संपूर्ण नियमशास्त्र पाळण्यास बांधलेला आहे.
Philippians 3:6 in Marathi 6 आस्थेविषयी म्हणाल तर मंडळीचा छळ करणारा; आणि नियमशास्त्रातील नीतिमत्वाविषयी निर्दोष ठरलेला असा आहे.
Hebrews 7:19 in Marathi 19 कारण नियमशास्त्रामुळे कोणतीच गोष्ट पूर्ण झाली नाही आणि आता अधिक चांगली आशा आम्हाला देण्यात आली आहे, जिच्यामुळे आम्ही देवाजवळ येतो.
Hebrews 9:9 in Marathi 9 हे सर्व आजच्या काळात प्रतिकात्मक आहे. याचा अर्थ असा की, देवाला दिलेली दाने व त्याला वाहिलेली अर्पणे यामुळे उपासना करणाऱ्यांचा विवेकभाव परिपूर्ण होऊ शकत नाही.
Hebrews 10:4 in Marathi 4 कारण बैलांच्या किंवा बकऱ्याच्या रक्ताने पाप नाहीसे होणे अशक्य आहे.
Hebrews 10:11 in Marathi 11 प्रत्येक यहूदी याजक उभा राहतो आणि दररोज त्याची धार्मिक कामे करत असतो आणि ज्यामुळे पाप नाहीसे होत नाही असे यज्ञ तो वारंवार अर्पण करतो.