Acts 13:2 in Marathi 2 ही सर्व माणसे देवाची सेवा करीत असत व उपास करीत असत. पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौलाला ह्यांना ज्या कामासाठी मी बोलावले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरता वेगळे करा.”
Other Translations King James Version (KJV) As they ministered to the Lord, and fasted, the Holy Ghost said, Separate me Barnabas and Saul for the work whereunto I have called them.
American Standard Version (ASV) And as they ministered to the Lord, and fasted, the Holy Spirit said, Separate me Barnabas and Saul for the work whereunto I have called them.
Bible in Basic English (BBE) And while they were doing the Lord's work, and going without food, the Holy Spirit said, Let Barnabas and Saul be given to me for the special work for which they have been marked out by me.
Darby English Bible (DBY) And as they were ministering to the Lord and fasting, the Holy Spirit said, Separate me now Barnabas and Saul for the work to which I have called them.
World English Bible (WEB) As they served the Lord and fasted, the Holy Spirit said, "Separate Barnabas and Saul for me, for the work to which I have called them."
Young's Literal Translation (YLT) and in their ministering to the Lord and fasting, the Holy Spirit said, `Separate ye to me both Barnabas and Saul to the work to which I have called them,'
Cross Reference Matthew 6:16 in Marathi 16 “जेव्हा तुम्ही उपास करता तेव्हा तुम्ही ढोंग्यांसारखे चेहरा उदास करू नका. कारण आपण उपास करीत आहोत हे लोकांना दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हाला खरे सांगतो. त्यांना त्यांचे प्रतिफळ मिळाले आहे.
Matthew 9:14 in Marathi 14 मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्याला विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपास करतो. पण तुझे शिष्य उपास करीत नाहीत. ते का?”
Matthew 9:38 in Marathi 38 म्हणून पिकाच्या धन्याकडे प्रार्थना करा की, त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत.”
Luke 2:37 in Marathi 37 ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व मंदिर सोडून न जाता उपास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे.
Luke 10:1 in Marathi 1 ह्यानंतर प्रभूने आणखी सत्तर जणांस नेमून ज्या ज्या नगरांत व ज्या ज्या ठिकाणी तो स्वतः: जाणार होता तेथे दोघे दोघे असे त्यांना आपल्या पुढे पाठवले.
Acts 6:4 in Marathi 4 म्हणजे आम्ही स्वतः प्रार्थनेत व वचनाच्या सेवेत तत्पर राहू.”
Acts 8:29 in Marathi 29 पवित्र आत्मा फिलिप्पाला म्हणाला, “त्या रथाजवळ जा!”
Acts 9:15 in Marathi 15 परंतु प्रभू म्हणाला, “जा! राजांना, आणि परराष्ट्रांना आणि इस्त्राएलाचे संतान यांच्यासमोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे.
Acts 10:19 in Marathi 19 पेत्र अजूनसुध्दा या दृष्टान्ताविषयीच विचार करीत होता. पण आत्मा त्याला म्हणाला, “ऐक, तीन माणसे तुला शोधीत आहेत.
Acts 10:30 in Marathi 30 कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो. बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो. अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला. त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले. होते
Acts 13:3 in Marathi 3 म्हणून मंडळीने उपास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
Acts 14:26 in Marathi 26 नंतर तेथून पुढे पौल व बर्णबा सिरीया येथील अंत्युखियात समुद्रमार्गे गेले. जे काम त्यांनी पूर्ण केले होते त्याची सुरुवात त्यांनी देवाच्या कृपेने अंत्युखियापासूनच केली होती.
Acts 16:6 in Marathi 6 नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले;
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Acts 22:21 in Marathi 21 तेव्हा त्याने मला सांगितले, जा मी तुला मी परराष्ट्रीयांकडे दूर पाठवतो.
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 10:15 in Marathi 15 आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात, त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’
Romans 15:16 in Marathi 16 ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
1 Corinthians 7:5 in Marathi 5 विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हाला प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा. आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.
1 Corinthians 12:11 in Marathi 11 पण ह्या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.
2 Corinthians 6:5 in Marathi 5 फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत;
2 Corinthians 11:27 in Marathi 27 मी कष्ट केले आणि घाम गाळला, व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो,
Galatians 1:15 in Marathi 15 पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याची सुवार्तेची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
Galatians 2:8 in Marathi 8 कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाहि परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
Ephesians 3:7 in Marathi 7 देवाच्या कृतीच्या सामर्थ्याचा परिणाम म्हणून जे कृपेचे दान मला देण्यात आले होते त्यामुळे मी सुवार्ता सांगण्याची जबाबदारी दिलेला सेवक झालो.
Colossians 4:17 in Marathi 17 अर्खिपाला सांगा की, जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पूर्ण करण्याकडे म्हणून काळजी घे.
1 Timothy 2:7 in Marathi 7 आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित (मी खरे सांगतो, खोटे सांगत नाही!) असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
2 Timothy 1:11 in Marathi 11 मला त्या सुवार्तेचा घोषणाकर्ता, प्रेषित आणि शिक्षक असे नेमले होते.
2 Timothy 2:2 in Marathi 2 माझ्याकडून ज्या गोष्टी तू पुष्कळ साक्षीदारांसमोर ऐकल्यास त्या घे व इतरांना शिकविण्यास समर्थ अशा विश्वासू लोकांना सोपवून दे.
2 Timothy 4:5 in Marathi 5 पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
2 Timothy 4:11 in Marathi 11 लूक मात्र माझ्या जवळ आहे, जेव्हा तू येशील तेव्हा मार्कालाही तुझ्याबरोबर घेऊन ये. कारण सेवेकरता तो मला उपयोगी आहे.
Hebrews 5:4 in Marathi 4 आणि कोणीही मुख्य याजकपणाचा बहुमान स्वतःच्या पुढाकाराने घेत नसतो, तर अहरोनाला होते तसे त्यालाही देवाचे पाचारण असणे आवश्यक असते.