Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
Other Translations King James Version (KJV) To him give all the prophets witness, that through his name whosoever believeth in him shall receive remission of sins.
American Standard Version (ASV) To him bear all the prophets witness, that through his name every one that believeth on him shall receive remission of sins.
Bible in Basic English (BBE) To him all the prophets give witness, that through his name everyone who has faith in him will have forgiveness of sins.
Darby English Bible (DBY) To him all the prophets bear witness that every one that believes on him will receive through his name remission of sins.
World English Bible (WEB) All the prophets testify about him, that through his name everyone who believes in him will receive remission of sins."
Young's Literal Translation (YLT) to this one do all the prophets testify, that through his name every one that is believing in him doth receive remission of sins.'
Cross Reference Mark 16:16 in Marathi 16 जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
Luke 24:25 in Marathi 25 मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
John 1:45 in Marathi 45 फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्याला म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हाला सापडला आहे.”
John 3:14 in Marathi 14 जसा मोशेने अरण्यात सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाहि उंच केले पाहिजे,
John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
John 20:31 in Marathi 31 पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा. आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हाला त्याच्या नावात जीवन मिळावे.
Acts 2:38 in Marathi 38 पेत्र त्यांना म्हणाला, पश्चाताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या;म्हणजे तुम्हाला पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.
Acts 3:16 in Marathi 16 आणि त्याच्या नावाने, त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता व ओळखता त्या ह्या माणसाला शक्तिमान केले आहे; आणि त्याच्याव्दारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.
Acts 3:18 in Marathi 18 परंतु आपल्या ख्रिस्ताने दुःखे सोसावी म्हणून देवाने आपल्या सर्व भविष्यवाद्यांच्या तोंडाने जे पूर्वी कळवले होते ते याप्रमाणे पूर्ण केले आहे.
Acts 4:10 in Marathi 10 तर तुम्हा सर्वास व सर्व इस्त्राएल लोकास हे माहित असावे की, ज्याला तुम्ही वधस्तंभी दिले, ज्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, त्या नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने, हा माणूस बरा होऊन येथे तुमच्यापुढे उभा राहिला आहे.
Acts 13:38 in Marathi 38 बंधूनो, आम्ही जे सांगत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हाला मिळू शकते.
Acts 15:9 in Marathi 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.”
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
Romans 6:23 in Marathi 23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. *
Romans 8:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
Romans 8:34 in Marathi 34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
Romans 10:11 in Marathi 11 म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’
Galatians 3:22 in Marathi 22 तरी शास्त्राने सर्वांस पापामध्ये कोंडून ठेवले आहे, ह्यांत उद्देश हा की, विश्वास ठेवणार्यांना येशू ख्रिस्ताच्या विश्वासाने जे अभिवचन आहे ते देण्यांत यावे.
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Colossians 1:14 in Marathi 14 आणि त्याच्या ठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 1:11 in Marathi 11 त्यांच्यामधील ख्रिस्ताचा आत्मा जेव्हा ख्रिस्ताच्या दुःखांविषयी व त्यानंतरच्या गौरवी गोष्टींविषयी पूर्वीच सांगितले होते, तेव्हा त्याने कोणता किंवा कोणत्या प्रकारचा काळ दर्शवला ह्याचा ते विचार करीत होते.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”