2 Corinthians 5:11 in Marathi 11 म्हणून आम्हाला प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्यांचे मन वळवतो; पण आम्ही देवाला प्रकट झालो आहो; आणि मी अशीही आशा धरतो की, आम्ही तुमच्या विवेकांत प्रकट झालो आहो.
Other Translations King James Version (KJV) Knowing therefore the terror of the Lord, we persuade men; but we are made manifest unto God; and I trust also are made manifest in your consciences.
American Standard Version (ASV) Knowing therefore the fear of the Lord, we persuade men, but we are made manifest unto God; and I hope that we are made manifest also in your consciences.
Bible in Basic English (BBE) Having in mind, then, the fear of the Lord, we put these things before men, but God sees our hearts; and it is my hope that we may seem right in your eyes.
Darby English Bible (DBY) Knowing therefore the terror of the Lord we persuade men, but have been manifested to God, and I hope also that we have been manifested in your consciences.
World English Bible (WEB) Knowing therefore the fear of the Lord, we persuade men, but we are revealed to God; and I hope that we are revealed also in your consciences.
Young's Literal Translation (YLT) having known, therefore, the fear of the Lord, we persuade men, and to God we are manifested, and I hope also in your consciences to have been manifested;
Cross Reference Matthew 10:28 in Marathi 28 “जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्याला भ्या.
Matthew 25:46 in Marathi 46 “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”
Mark 8:35 in Marathi 35 जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माइयासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
Mark 9:43 in Marathi 43 जर तुझा उजवा हात तुला पाप करायला प्रवृत्त करतो तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.
Luke 12:5 in Marathi 5 तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला ठार मारल्यांनतर तुम्हास नरकात टाकून देण्यास जो समर्थ आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.
Luke 16:31 in Marathi 31 अब्राहाम त्याला म्हणाला, “जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मेलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.”‘
Acts 13:43 in Marathi 43 भास्थानातील बैठक संपल्यावर अनेक यहूदी लोक आणि यहूदी मतानुसारी चालणारे इतर धार्मिक लोक पौल व बर्णबा यांच्यामागे गेले. पौल व बर्णबा यांनी त्या लोकांना देवाच्या कृपेत टिकून राहण्यास कळकळीची विनंति केली.
Acts 18:4 in Marathi 4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
Acts 18:13 in Marathi 13 यहूदी लोक म्हणाले, “हा मनुष्य अशा रीतीने लोकांना देवाची उपासना करायला शिकवीत आहे की, जे नियमशास्त्राच्या विरुध्द आहे.”
Acts 19:26 in Marathi 26 पण पहा तो पौल नावाचा मनुष्य काय करीत आहे! तो काय म्हणत आहे ते ऐका! पौलाने पुष्कळ लोकांना प्रभावित केले आहे व बदलले आहे. त्याने हे इफिसमध्ये व सगळ्या आशियामध्ये केले आहे, तो म्हणतो, माणसांच्या हातून बनवलेले देव खरे देव नाहीत.
Acts 20:18 in Marathi 18 जेव्हा ते आले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “आशियात आलो त्या दिवसापासून मी तुमच्या सोबत असताना कसा राहिलो हे तुम्हाला माहीत आहे.
Acts 26:26 in Marathi 26 येथे हजर असलेल्या महाराजांना याविषयी चांगली माहिती आहे, आणि यामुळे मी त्यांच्याशी उघडपणाने बोलू शकतो. त्याच्या ध्यानातून काही सुटले नसेल, असे मला खात्रीने वाटते. मी हे म्हणतो, कारण ही गोष्ट एखाद्या कानाकोपऱ्यात झाली नाही.
Acts 28:23 in Marathi 23 तेव्हा (रोम शहरातील) यहूदी लोकांनी एक बैठकीचा दिवस ठरवला, जेथे पौल राहत होता, तेथे ते मोठ्या संख्येने जमा झाले. तेव्हा पौलाने त्यांना समजावून सांगितले आणि देवाच्या राज्याविषयी आपली साक्ष दिली. मोशेच्या नियमशास्त्रापासून आणि संदेष्ट्यांच्यापासून फोड करून येशूविषयी त्यांची खात्री पटविण्याचा प्रयत्न केला. हे तो (पौल) सकाळपासून संध्याकाळपर्यंत करीत होता.
1 Corinthians 4:4 in Marathi 4 कारण जरी माझा विवेक मला दोष देत नाही. पण त्यामुळे मी निर्दोष ठरत नाही. प्रभू हाच माझा न्यायनिवाडा करणारा आहे.
2 Corinthians 1:12 in Marathi 12 आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण,म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुध्दीची साक्ष होय.आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 Corinthians 2:17 in Marathi 17 कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही; पण आम्ही शुध्द भावाने, देवाचे म्हणून, देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
2 Corinthians 4:1 in Marathi 1 म्हणून, आमच्यावर दया झाल्यामुळे, ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.
2 Corinthians 5:20 in Marathi 20 तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हाला आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
Galatians 1:10 in Marathi 10 मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय?मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो.
Colossians 1:28 in Marathi 28 आम्ही त्याची घोषणा करतो, प्रत्येक मनुष्याला बोध करतो, आणि सर्व ज्ञानीपणाद्वारे प्रत्येक मनुष्याला आम्ही शिकवतो, ते ह्यासाठी की, आम्ही प्रत्येक मनुष्याला ख्रिस्ताच्या ठायी प्रौढ करून सादर करावे.
1 Thessalonians 2:3 in Marathi 3 कारण आमचा बोध फसवण्याने, अथवा अशुध्दपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
2 Timothy 2:24 in Marathi 24 देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे.
Hebrews 10:31 in Marathi 31 जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.तुम्ही आपला आनंद व धैर्य गमावू नका.
Jude 1:23 in Marathi 23 आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.
Revelation 20:15 in Marathi 15 आणि ज्या कोणाचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्याला अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.