1 Timothy 5:10 in Marathi 10 जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्र जनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा.
Other Translations King James Version (KJV) Well reported of for good works; if she have brought up children, if she have lodged strangers, if she have washed the saints' feet, if she have relieved the afflicted, if she have diligently followed every good work.
American Standard Version (ASV) well reported of for good works; if she hath brought up children, if she hath used hospitality to strangers, if she hath washed the saints' feet, if she hath relieved the afflicted, if she hath diligently followed every good work.
Bible in Basic English (BBE) And if witness is given of her good works; if she has had the care of children, if she has been kind to travellers, washing the feet of the saints, helping those who are in trouble, giving herself to good works.
Darby English Bible (DBY) borne witness to in good works, if she have brought up children, if she have exercised hospitality, if she have washed saints' feet, if she have imparted relief to the distressed, if she have diligently followed every good work.
World English Bible (WEB) being approved by good works, if she has brought up children, if she has been hospitable to strangers, if she has washed the saints' feet, if she has relieved the afflicted, and if she has diligently followed every good work.
Young's Literal Translation (YLT) in good works being testified to: if she brought up children, if she entertained strangers, if saints' feet she washed, if those in tribulation she relieved, if every good work she followed after;
Cross Reference Matthew 5:16 in Marathi 16 तशाच प्रकारे तुम्ही सुध्दा इतरांच्यासाठी प्रकाश असे झाले पाहिजे. यासाठी की त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
Luke 7:38 in Marathi 38 आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहूून आसवांनी त्याचे पाय भिजवूं लागली, व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
Luke 7:44 in Marathi 44 तेव्हा त्याने त्या बाईकडे वळून शिमोनाला म्हटले, ही बाई तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले, आणि आपल्या केसांनी ते पुसले.
John 13:5 in Marathi 5 त्यानंतर येशू एका घंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधिलेल्या रूमालाने पुसू लागला.
Acts 6:3 in Marathi 3 तर बंधुजनहो, तुम्ही आपल्यामधून पवित्र आत्म्याने व ज्ञानाने पूर्ण असे सात प्रतिष्ठीत पुरूष शोधून काढा. त्यांना आम्ही ह्या कामावर नेमू.;
Acts 9:36 in Marathi 36 यापो शहरात येशूची एक शिष्या राहत होती. तीचे नाव तबिथा होते (ग्रीक भाषेत तिचे नाव दुर्कस होते, त्याचा अर्थ हरीण) ती नेहमी लोकांसाठी चांगली कामे करीत असे. गरीबांना दानधर्म करीत असे.
Acts 9:39 in Marathi 39 पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला. जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्याला माडीवरच्या खोलीत नेले. सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या. त्या रडत होत्या. दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले.
Acts 10:22 in Marathi 22 ती माणसे म्हणाली, “एका पवित्र देवदूताने तुम्हाला आमंत्रित करण्याविषयी कर्नेल्याला सांगितले होते. कर्नेल्य हा शताधिपती आहे. तो चांगला धर्मशील मनुष्य आहे. तो देवाची उपासना करतो. सर्व यहूदी लोक त्याचा आदर करतात, तुम्हाला घरी बोलावून तुमचे शब्द ऐकावेत असे देवदूताने त्याला सांगितले आहे.”
Acts 16:14 in Marathi 14 तेथे लुदिया नावाची कोणीएक स्त्री होती;ती थुवतीरा नगराची असून जांभळी वस्त्रे विकीत असे; ती देवाची भक्ति करणारी होती. तिने आमचे भाषण ऐकले;तिचे अंतःकरण प्रभूने असे प्रफुल्लित केले की, पौलाच्या सांगण्याकडे तिने लक्ष दिले;
Acts 22:12 in Marathi 12 मग हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य होता, तो नियमशास्त्राप्रमाणे नीतिमान होता, आणि तेथे राहणारे सर्व यहूदी त्याच्याविषयी चांगले बोलत असत.
Romans 12:13 in Marathi 13 पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
Ephesians 2:10 in Marathi 10 कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत, ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले, जे देवाने अारभीच याेजून ठेवले होते. यासाठी त्याप्रमाणे आम्ही चालावे.
Colossians 1:10 in Marathi 10 ह्यासाठी की, तुम्ही प्रभूला सर्व प्रकारे संतोष देण्यास प्रत्येक चांगल्या कामात फळ देऊन त्याला शोभेल असे वागावे व देवाच्या ज्ञानाने तुमची वाढ व्हावी.
1 Timothy 2:10 in Marathi 10 तर देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे.
1 Timothy 3:7 in Marathi 7 त्याचे बाहेरच्या लोकांमध्ये चांगले नाव असावे. यासाठी की त्याच्यावर टीका होऊ नये व त्याने सैतानाच्या जाळ्यात सापडू नये
1 Timothy 5:16 in Marathi 16 जर एखाद्या विश्वासणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
1 Timothy 5:25 in Marathi 25 त्याचप्रमाणे, चांगली कामेही स्पष्ट आहेत ती सुध्दा कायमची लपवता येत नाहीत.
1 Timothy 6:18 in Marathi 18 चांगले ते करावे , चांगल्या कृत्यात धनवान ,उदार व परोपकारी असावे.
2 Timothy 1:5 in Marathi 5 तुझ्यातील निष्कपट विश्वासाची मला आठवण होते जो पहिल्यांदा तुझी आजी लोईसमध्ये होता आणि तुझी आई युनीकेमध्ये होता. आणि माझी खात्री आहे की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
2 Timothy 2:21 in Marathi 21 म्हणून जर कोणी त्या पासून दूर राहून स्वतःला शुध्द करील, तर तो पवित्र केलेले, मालकाला उपयोगी पडणारे, प्रत्येक चांगल्या कामास तयार केलेले असे मानाचे पात्र होईल.
2 Timothy 3:15 in Marathi 15 तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशू मधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
2 Timothy 3:17 in Marathi 17 यासाठी की, देवाचा माणूस तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Titus 3:1 in Marathi 1 त्यांनी सत्ताधीश, व अधिकारी हयांच्या अधीन राहावे.त्यांच्या अाज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे.
Titus 3:8 in Marathi 8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू ह्या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. ह्या गोष्टी चांगल्या असून माणसासाठी हितकारक आहेत.
Titus 3:14 in Marathi 14 आणि आपल्या लोकांनी आपल्या आवश्यक गरजांसाठी चांगली कामे करण्यास शिकण्याची काळजी घ्यावी ; म्हणजे ते निष्फळ होणार नाहीत.
Hebrews 10:24 in Marathi 24 आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ.
Hebrews 13:2 in Marathi 2 पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.
Hebrews 13:21 in Marathi 21 त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हाला चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याला संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्याला सदासर्वकाल र्गौरव असो. आमेन.
1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
1 Peter 4:9 in Marathi 9 काही कुरकुर न करता तुम्ही सर्व जण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा.
3 John 1:12 in Marathi 12 प्रत्येक जण देमेत्रियाविषयी चांगली साक्ष देतात व स्वतः सत्यानेही चांगली साक्ष दिली आहे. आम्ही देखील त्याच्याविषयी तसेच म्हणतो, आणि तुम्हाला माहीत आहे की, आमची साक्ष खरी आहे.