1 Peter 1:7 in Marathi 7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
Other Translations King James Version (KJV) That the trial of your faith, being much more precious than of gold that perisheth, though it be tried with fire, might be found unto praise and honour and glory at the appearing of Jesus Christ:
American Standard Version (ASV) that the proof of your faith, `being' more precious than gold that perisheth though it is proved by fire, may be found unto praise and glory and honor at the revelation of Jesus Christ:
Bible in Basic English (BBE) So that the true metal of your faith, being of much greater value than gold (which, though it comes to an end, is tested by fire), may come to light in praise and glory and honour, at the revelation of Jesus Christ:
Darby English Bible (DBY) that the proving of your faith, much more precious than of gold which perishes, though it be proved by fire, be found to praise and glory and honour in [the] revelation of Jesus Christ:
World English Bible (WEB) that the proof of your faith, which is more precious than gold that perishes even though it is tested by fire, may be found to result in praise, glory, and honor at the revelation of Jesus Christ--
Young's Literal Translation (YLT) that the proof of your faith -- much more precious than of gold that is perishing, and through fire being approved -- may be found to praise, and honour, and glory, in the revelation of Jesus Christ,
Cross Reference Matthew 19:28 in Marathi 28 येशू म्हणाला, “मी तुम्हाला खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी सिंहासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा सिंहासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Matthew 25:23 in Marathi 23 “मालक म्हणाला, ‘चांगल्या आणि विश्वासू दासा! तू थोड्या पैशाविषयी इमानीपणे वागलास, म्हणून मी तुझी आणखी पुष्कळशा गोष्टींवर नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!
Luke 12:20 in Marathi 20 पण देव त्याला म्हणतो, अरे “मूर्खा, जर आज तू मेलास तर तू साठवलेल्या गोष्टी कोणाला मिळतील?’
Luke 12:33 in Marathi 33 तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतः:साठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
John 5:44 in Marathi 44 जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता, आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हाला विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे?
John 12:26 in Marathi 26 जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्याला मान करील.
Acts 8:20 in Marathi 20 पेत्र शिमोनाला म्हणाला, “तुझा व तुझ्या पैशाचा नाश होवो! कारण, देवाचे दान पैशाच्या बळावर विकत घेण्याचा तू विचार केलास!
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 2:29 in Marathi 29 कारण जो अंतरी यहूदी आहे तो यहूदी होय; आणि जी आध्यात्मिक अनुसरून आहे, शास्त्रलेखाला अनुसरून नाही, अशी जी अंतःकरणाची सुंता आहे ती सुंता होय. आणि त्याची प्रशंसा मनुष्याकडून नाही परंतु देवाकडून होईल.
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
1 Corinthians 3:13 in Marathi 13 तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे ह्याची परीक्षा करील.
1 Corinthians 4:5 in Marathi 5 म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
2 Thessalonians 1:7 in Marathi 7 म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देव दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल.
James 1:3 in Marathi 3 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
James 1:12 in Marathi 12 जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुगूट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्याला मिळेल.
James 5:2 in Marathi 2 तुमची संपत्ती नाश पावली आहे. व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत.
1 Peter 1:5 in Marathi 5 आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहा.
1 Peter 2:4 in Marathi 4 मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता,
1 Peter 2:7 in Marathi 7 म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हाला तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे’;
1 Peter 4:12 in Marathi 12 प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हाला काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 Peter 3:10 in Marathi 10 तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्या दिवशी आकाश मोठा नाद करीत निघून होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील.
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 1:7 in Marathi 7 पहा, येशू ढगांसह येत आहे! प्रत्येक डोळा त्याला पाहील, ज्यांनी त्याला भोसकले तेसुध्दा त्याला पाहतील. पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील, होय, असेच होईल! आमेन.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 3:10 in Marathi 10 धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हाला राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहातात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल.
Revelation 3:18 in Marathi 18 मी तुम्हाला सल्ला देतो की, अग्नीत शुध्द केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील. आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे.
Revelation 18:16 in Marathi 16 आणि म्हणतील, ‘हाय हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिर्यामोत्यांचा साज घालीत असे.