1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
Other Translations King James Version (KJV) Seeing ye have purified your souls in obeying the truth through the Spirit unto unfeigned love of the brethren, see that ye love one another with a pure heart fervently:
American Standard Version (ASV) Seeing ye have purified your souls in your obedience to the truth unto unfeigned love of the brethren, love one another from the heart fervently:
Bible in Basic English (BBE) And as you have made your souls clean, being ruled by what is true, and loving one another without deceit, see that your love is warm and from the heart:
Darby English Bible (DBY) Having purified your souls by obedience to the truth to unfeigned brotherly love, love one another out of a pure heart fervently;
World English Bible (WEB) Seeing you have purified your souls in your obedience to the truth through the Spirit in sincere brotherly affection, love one another from the heart fervently:
Young's Literal Translation (YLT) Your souls having purified in the obedience of the truth through the Spirit to brotherly love unfeigned, out of a pure heart one another love ye earnestly,
Cross Reference John 13:34 in Marathi 34 मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीती करावी.
John 15:3 in Marathi 3 जे वचन मी तुम्हाला सांगितले त्यामुळे, तुम्ही आता शुध्द झालांच आहा.
John 15:17 in Marathi 17 तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हाला ह्या आज्ञा करतो.
John 17:17 in Marathi 17 तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
John 17:19 in Marathi 19 आणि त्यांनीहि सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरितां स्वतःला पवित्र करतो.
Acts 6:7 in Marathi 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली;याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
Acts 15:9 in Marathi 9 त्याने त्यांची अंतःकरणे विश्वासाने शुध्द करून त्यांच्यामध्ये व आपल्यामध्ये काही भेद ठेवला नाही.
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 2:8 in Marathi 8 परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना क्रोध व कोप,
Romans 6:16 in Marathi 16 तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहा. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
Romans 8:13 in Marathi 13 कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
Romans 12:9 in Marathi 9 प्रीती निष्कपट असावी. वाइटापासून दूर रहा; चांगल्याला बिलगून रहा.
2 Corinthians 6:6 in Marathi 6 शुध्दतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने;
Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Galatians 5:5 in Marathi 5 कारण आपण आत्म्याच्या द्वारे,विश्वासाने, नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो.
Galatians 5:7 in Marathi 7 तुम्ही चांगले धावत होता; तुम्ही सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला?
Ephesians 4:3 in Marathi 3 शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. “
Philippians 1:9 in Marathi 9 मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी,
1 Thessalonians 3:12 in Marathi 12 आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो;
1 Thessalonians 4:8 in Marathi 8 म्हणून जो कोणी नाकार करतो तो माणसाचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव ह्याचा नाकार करतो.
2 Thessalonians 1:3 in Marathi 3 बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे; कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे,आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे;
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
1 Timothy 1:3 in Marathi 3 मी मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंति केली होती तशी आतांही करतो की तू इफिसात राहावे, यासाठी की, तू कित्येकास निक्षून सांगावे की ,की त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये.
1 Timothy 1:5 in Marathi 5 आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुध्द अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.
1 Timothy 4:12 in Marathi 12 कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, आत्म्यात विश्वासात, शुध्दपणांत, विश्वासणाऱ्यांचा आदर्श हो .
1 Timothy 5:2 in Marathi 2 तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुध्द भावाने वागव.
2 Timothy 1:14 in Marathi 14 आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याद्वारे त्या चांगल्या ठेवीचे रक्षण कर.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Hebrews 11:8 in Marathi 8 विश्वासाने, अब्राहामाने, त्याला जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्याला बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्याला माहीत नसताना तो निघाला.
Hebrews 13:1 in Marathi 1 ख्रिस्तामध्ये एकमेकांवर अखंडपणे बंधु व भगिनीसारखी प्रीती करा.
James 2:15 in Marathi 15 जर कोणी भाऊ उघडा असेल, किंवा कोणी बहीण उघडी असेल, आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल,
James 4:8 in Marathi 8 तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुध्द करा; अहो व्दिबुध्दीच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुध्द करा.
1 Peter 2:17 in Marathi 17 सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या.
1 Peter 3:1 in Marathi 1 आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे. कारण ते तुमचे शुध्द, आदराचे आचरण पाहतील.
1 Peter 3:8 in Marathi 8 शेवटी सर्व जण एकमनाचे व्हा; आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
1 Peter 4:8 in Marathi 8 आणि सर्वांत महत्वाची गोष्ट ही की, आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकते.
1 Peter 4:17 in Marathi 17 कारण देवाच्या घरापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ काळ आता आला आहे; आणि प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
2 Peter 1:7 in Marathi 7 सुभक्तीत बंधुप्रेमाची व बंधुप्रेमात प्रीतीची भर घाला.
1 John 3:11 in Marathi 11 आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.
1 John 3:14 in Marathi 14 आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत. कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करीत नाही तो मरणात राहतो.
1 John 3:23 in Marathi 23 तो आम्हाला अशी आज्ञा आहे की,त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
1 John 4:7 in Marathi 7 प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी, कारण प्रीती देवाकडून आहे, आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला आेळखतो.
1 John 4:12 in Marathi 12 देवाला कोणी कधीही पाहिले नाही. पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते.
1 John 4:20 in Marathi 20 “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे. कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही त्याला न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही.
Revelation 2:4 in Marathi 4 “तरीही तुझ्याविरुध्द माझे म्हणणे आहे: तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.