1 Peter 1:2 in Marathi 2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.
Other Translations King James Version (KJV) Elect according to the foreknowledge of God the Father, through sanctification of the Spirit, unto obedience and sprinkling of the blood of Jesus Christ: Grace unto you, and peace, be multiplied.
American Standard Version (ASV) according to the foreknowledge of God the Father, in sanctification of the Spirit, unto obedience and sprinkling of the blood of Jesus Christ: Grace to you and peace be multiplied.
Bible in Basic English (BBE) Who, through the purpose of God, have been made holy by the Spirit, disciples of Jesus, made clean by his blood: May you have grace and peace in full measure.
Darby English Bible (DBY) elect according to [the] foreknowledge of God [the] Father, by sanctification of [the] Spirit, unto [the] obedience and sprinkling of [the] blood of Jesus Christ: Grace to you and peace be multiplied.
World English Bible (WEB) according to the foreknowledge of God the Father, in sanctification of the Spirit, that you may obey Jesus Christ and be sprinkled in his blood: Grace to you and peace be multiplied.
Young's Literal Translation (YLT) according to a foreknowledge of God the Father, in sanctification of the Spirit, to obedience and sprinkling of the blood of Jesus Christ: Grace to you and peace be multiplied!
Cross Reference Matthew 24:22 in Marathi 22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Matthew 24:31 in Marathi 31 मनुष्याचा पुत्र तुतारीच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
Mark 13:20 in Marathi 20 देवाने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
Mark 13:22 in Marathi 22 कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांना फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील.
Mark 13:27 in Marathi 27 नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशांतून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांना एकत्र करील.
Luke 18:7 in Marathi 7 आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावील का?
John 15:16 in Marathi 16 तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हाला निवडले आणि नेमले आहे; ह्यात हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हाला द्यावे.
Acts 2:23 in Marathi 23 तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले;
Acts 15:18 in Marathi 18 हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो ,
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 1:7 in Marathi 7 रोममधील तुम्हा सर्वांस, देवाच्या प्रियांस, पवित्र जन होण्यास बोलावलेल्यांसः देव आपला पिता व आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्यांजकडून तुम्हाला कृपा व शांती.
Romans 8:13 in Marathi 13 कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
Romans 8:33 in Marathi 33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 11:2 in Marathi 2 देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने सोडले नाही. शास्त्रलेख एलियाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की,
Romans 11:5 in Marathi 5 मग त्याचप्रमाणे ह्या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.
Romans 11:28 in Marathi 28 ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत, पण, ते निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत.
Romans 15:16 in Marathi 16 ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
Romans 16:19 in Marathi 19 कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाइटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.
Romans 16:26 in Marathi 26 पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे,
1 Corinthians 1:30 in Marathi 30 कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे. व तो देवाची देणगी म्हणून आपले. ज्ञान, आपले नीतिमत्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
2 Corinthians 10:5 in Marathi 5 तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूध्द उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो.
2 Corinthians 13:14 in Marathi 14 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Colossians 3:12 in Marathi 12 तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून, करूणायुक्त हृदय,दया व सौम्यता, लीनता, व सहनशीलता धारण करा.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 2:10 in Marathi 10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.
Titus 1:1 in Marathi 1 विश्वासाच्या सहभागितेतील माझे खरेखुरे लेकरु तीत ह्यास,सर्वकाळच्या जीवनाच्या आशेकरीता सुभक्तीनुसार असलेल्या सत्याच्या पूर्ण ज्ञानासाठी निवडलेला येशू ख्रिस्ताचा प्रेषित आणि देवाचा दास पौल,ह्याच्याकडून:
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 9:19 in Marathi 19 कारण नियमशास्त्राची प्रत्येक आज्ञा सर्व लोकांसमोर जाहीर केल्यानंतर मोशेने पाण्याबरोबर वासराचे व बकऱ्याचे रक्त तसेच किरमिजी लोकर आणि एजोबाच्या फांद्या हे सर्व बरोबर घेतले; आणि ते त्याने नियमशास्त्राच्या पुस्तकावर आणि सर्व लोकांवर शिंपडले.
Hebrews 10:22 in Marathi 22 म्हणून आपण आपली मलीन विवेकबुद्धि शुध्द करण्यासाठी आपल्या मनावर केलेल्या येशूच्या रक्तसिंचनाने आणि आपली शरीरे पवित्र पाण्याने धुतल्याने असे खऱ्या अंतःकरणाने विश्र्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.
Hebrews 11:28 in Marathi 28 विश्वासाने, त्याने वल्हांडण व रक्तसिंचन हे विधी पाळले, ते ह्यासाठी की, प्रथम जन्मलेल्यांना मारणार्याने त्यांना शिवू नये.
Hebrews 12:24 in Marathi 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.
1 Peter 1:22 in Marathi 22 तुम्ही जर आत्म्याच्या द्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुध्द केले आहेत, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
2 Peter 1:2 in Marathi 2 देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या आेळखीने तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळो.
2 John 1:1 in Marathi 1 वडिलांकडून, देवाने निवडलेली बाई व तिच्या मुलांना, सत्यात सहभागी असलेल्या लोकांप्रमाणे ज्यांच्यावर मी प्रीती करतो, आणि तुमच्यावर प्रीती करणारा मी एकटाच नाही, तर ज्यांची सत्याशी ओळख झाली आहे असे इतर सर्वजणसुध्दा प्रीती करतात. या सत्यामुळे जे आमच्यामध्ये असते, ते आमच्यामध्ये सर्वकाळ राहील.
2 John 1:13 in Marathi 13 देवाने निवडून घेतलेल्या तुमच्या बहिणींची मुले तुम्हाला सलाम सांगतात.
Jude 1:2 in Marathi 2 दया, शांती व प्रीती ही तुम्हास विपुल मिळोत.