1 Peter 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्ताचा प्रेषित पेत्र ह्याजकडून,पंत, गलतिया, कप्पदुकिया, आसिया व बिथुनिया येथे, उपरी म्हणून पांगलेल्या यहूदी लोकास,
Other Translations King James Version (KJV) Peter, an apostle of Jesus Christ, to the strangers scattered throughout Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
American Standard Version (ASV) Peter, an apostle of Jesus Christ, to the elect who are sojourners of the Dispersion in Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
Bible in Basic English (BBE) Peter, an Apostle of Jesus Christ, to the saints who are living in Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
Darby English Bible (DBY) Peter, apostle of Jesus Christ, to [the] sojourners of [the] dispersion of Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
World English Bible (WEB) Peter, an apostle of Jesus Christ, to the chosen ones who are living as strangers in the Dispersion in Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
Young's Literal Translation (YLT) Peter, an apostle of Jesus Christ, to the choice sojourners of the dispersion of Pontus, Galatia, Cappadocia, Asia, and Bithynia,
Cross Reference Matthew 4:18 in Marathi 18 नंतर तो गालीलच्या सरोवराजवळून जात असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ अंद्रिया या दोघांना पाहिले. ते कोळी होते. ते जाळे टाकून मासे धरीत होते.
Matthew 10:2 in Marathi 2 बारा प्रेषितांची नावे अशी आहेत. पेत्र (ज्याला शिमोन म्हणत)आणि त्याचा भाऊ अंद्रिया,जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान
Matthew 24:22 in Marathi 22 “आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
John 1:41 in Marathi 41 त्याला त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्याला म्हणला, “आम्हाला मशिहा (म्हणजे ख्रिस्त) सांपडला आहे.”
John 7:35 in Marathi 35 ह्यामुळे यहूदी आपआपल्यात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कुठे जाईल? हा हेल्लेण्यांत पांगलेल्या लोकांत जाऊन हेल्लेण्यांस शिकवील काय?
John 11:52 in Marathi 52 आणि केवळ त्या राष्ट्रासाठी असे नाही, तर यासाठी की त्याने देवाच्या पांगलेल्या मुलांसही एकत्र जमवून एक करावे.
John 21:15 in Marathi 15 मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, ह्यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्याला म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्याला म्हणतो, “माझी कोकरें चार.”
Acts 2:5 in Marathi 5 त्या वेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्टांतील भक्तिमान यहूदी यरूशलेमेंत राहत होते.
Acts 6:9 in Marathi 9 तेव्हा सिबिर्तिन नामक लोकांच्या सभास्थानातील काही जण तसेच कुरेनेकर आलेक्सांद्रियेकर आणि किलिकिया व आसिया ह्यातील लोकांपैकी कित्येक उठले आणि स्तेफनाबरोबर वादविवाद करू लागले.
Acts 8:4 in Marathi 4 विश्वासणारे सगळीकडे पांगले होते. जेथे कोठे विश्वासणारे जात, तेथे ते लोकांना सुवार्ता सांगत.
Acts 16:6 in Marathi 6 नंतर आशिया प्रांतात वचन सांगण्यास त्यांना पवित्र आत्म्याकडून प्रतीबंध झाल्यामुळे ते फ्रुगिया व गलतिया ह्या प्रांतामधून गेले;
Acts 18:2 in Marathi 2 करिंथमध्ये पौल एका यहूदी मनुष्याला भेटला ज्याचे नाव अक्विल्ला असे होते. तो पंत येथील रहिवासी होता. आपली पत्नी प्रिस्किल्ला हिच्यासह नुकताच तो इटलीहून आला होता. कारण सर्व यहूदी लोकांनी रोम शहर सोडून गेले पाहिजे असा हुकूम क्लौद्याने काढला होता. पौल त्यांना (अक्विल्ला व प्रिस्किल्ला) भेटावयास गेला.
Acts 18:23 in Marathi 23 तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला, आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला. त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
Acts 19:10 in Marathi 10 हे असे दोन वर्षे चालले, याचा परिणाम असा झाला की, आशियात राहत असलेल्या सर्व यहूदी व यहूदीतर लोकांपर्यंत प्रभू येशूचे वचन पोहोचले.
Acts 20:16 in Marathi 16 कारण पौलाने ठरवले होते की इफिस येथे थांबायचे नाही. आशियात त्याला जास्त वेळ थांबायचे नव्हते. तो घाई करीत होता कारण शक्य झाल्यास पन्नासाव्या दिवसाच्या सणासाठी त्याला यरूशलेम येथे राहावयास हवे होते.
1 Corinthians 16:19 in Marathi 19 आशियातील मंडळ्या तुम्हाला नमस्कार सांगतात. अक्विल्ला, प्रिस्कील्ला व जी मंडळी त्यांच्या घरात जमते, ती प्रभूमध्ये तुम्हाला नमस्कार सांगतात,
2 Corinthians 1:8 in Marathi 8 बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तिपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुध्दा सोडून दिली होती.
Galatians 1:2 in Marathi 2 आणि माझ्या सोबतीचे सर्व बंधू ह्यांजकडून गलतीयाच्या मंडळ्यास;
Ephesians 2:12 in Marathi 12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.
Ephesians 2:19 in Marathi 19 यामुळे, तुम्ही आता परके आणि परराष्ट्रीय नाहीत. तर त्याएेवजी तुम्ही पवित्र जनांच्या बरोबरचे सहनागरिक आणि देवाचे कुटुंबीय आहात
2 Timothy 1:15 in Marathi 15 आशिया प्रांतामध्ये असणाऱ्या सर्वांनी मला सोडले आहे हे तुला ठाऊकच आहे. त्यामध्ये फुगल व हर्मगनेस आहेत.
Hebrews 11:13 in Marathi 13 हे सगळे विश्वासात टिकून मेले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण 'पृथ्वीवर परके आणि प्रवासी' आहोत.
James 1:1 in Marathi 1 देवाचा आणि प्रभू येशू ख्रिस्ताचा सेवक, याकोब याजकडून,देवाच्या लोकांचे “बारा वंश” जे जगभर पांगलेले आहेत त्यांना नमस्कार .
1 Peter 2:11 in Marathi 11 माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा.
2 Peter 1:1 in Marathi 1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्वाने आमच्यासारखा, माेलवान विश्वास मिळालेल्या लोकांना,येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून
Revelation 1:11 in Marathi 11 तो आवाज म्हणाला, “तू या सर्व गोष्टी पाहतोस त्या तू एका पुस्तकात लिही, आणि इफिस, स्मुर्णा, पर्गम, थुवतीरा, सार्दीस, फिलदेल्फिया आणि लावदिकीया ह्या सात मंडळ्यांना पाठव. ”