1 John 5:6 in Marathi 6 जो आमच्याकडे पाणी व रक्त यांच्यासह आला तो हाच म्हणजे येशू ख्रिस्त; केवळ पाण्याद्वारेच नाही तर पाणी आणि रक्ताद्वारे आला.
Other Translations King James Version (KJV) This is he that came by water and blood, even Jesus Christ; not by water only, but by water and blood. And it is the Spirit that beareth witness, because the Spirit is truth.
American Standard Version (ASV) This is he that came by water and blood, `even' Jesus Christ; not with the water only, but with the water and with the blood.
Bible in Basic English (BBE) This is he who came by water and by blood, Jesus Christ; not by water only but by water and by blood.
Darby English Bible (DBY) This is he that came by water and blood, Jesus [the] Christ; not by water only, but by water and blood. And it is the Spirit that bears witness, for the Spirit is the truth.
World English Bible (WEB) This is he who came by water and blood, Jesus Christ; not with the water only, but with the water and the blood. It is the Spirit who testifies, because the Spirit is the truth.
Young's Literal Translation (YLT) This one is he who did come through water and blood -- Jesus the Christ, not in the water only, but in the water and the blood; and the Spirit it is that is testifying, because the Spirit is the truth,
Cross Reference Matthew 26:28 in Marathi 28 कारण हे माझे कराराचे रक्त आहे.हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.
Mark 14:24 in Marathi 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
Luke 22:20 in Marathi 20 त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.”
John 1:31 in Marathi 31 मी त्याला ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.”
John 3:5 in Marathi 5 येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही.
John 4:10 in Marathi 10 येशूने तिला उत्तर दिले, “देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यायला दे असे तुला म्हणणारा कोण आहे, हे तुला समजले असते तर तू त्याच्याजवळ मागितले असतेस आणि त्याने तुला जिवंत पाणी दिले असते.”
John 4:14 in Marathi 14 परंतु मी देईन ते पाणी जो कोणी पिईल त्याला कधीहि तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्यांच्यामध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा होईल.”
John 6:55 in Marathi 55 कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे.
John 7:38 in Marathi 38 जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 14:17 in Marathi 17 तो खरेपणाचा आत्मा आहे, जग त्याला ग्रहण करू शकत नाही,कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओळखता,कारण तो तुम्हाबरोबर राहतो,आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:13 in Marathi 13 पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि हाेणार्या गोष्टी तुम्हाला कळवील.
John 19:34 in Marathi 34 तरी शिपायांपैकी एकाने भाल्याने त्याच्या कुशीत भाला भोसकला; आणि, लगेच, रक्त व पाणी बाहेर आले.
Acts 8:36 in Marathi 36 ते दोघे प्रवास करीत असताना एका पाण्याच्या ठिकाणाजवळ (तळ्याजवळ)आले. अधिकारी म्हणाला, “पाहा! येथे पाणी आहे! माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे.त्याने उत्तर दिले,येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.
Romans 3:25 in Marathi 25 त्याला देवाने ह्यासाठी पुढे ठेवले की, विश्वासाद्वारे, त्याच्या रक्ताकडून प्रायश्चित्त व्हावे, आणि त्याने आपले नीतिमत्व प्रकट करावे; कारण देवाच्या सहनशीलपणात, मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Ephesians 5:25 in Marathi 25 पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
Colossians 1:4 in Marathi 4 कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी, आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
Hebrews 9:7 in Marathi 7 पण केवळ एकटा मुख्य याजकच वर्षातून एकदाच दुसऱ्या खोलीत (मंडपात) जाई, शिवाय तो रक्त घेतल्याशिवाय आत जात नसे. ते रक्त तो स्वतःसाठी (स्वतःच्या पापांसाठी) व लोकांच्या अज्ञानाच्या पापांसाठी अर्पण करायला आत जात असे.
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Hebrews 10:29 in Marathi 29 तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले,कराराच्या ज्या रक्ताने त्याला पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, त्या मनुष्याला कितीतरी अधिक शिक्षा मिळेल याचा विचार करा!
Hebrews 12:24 in Marathi 24 आणि तुम्ही जो नव्या कराराचा मध्यस्थ येशू त्याच्याकडे आला आहात, आणि तुम्ही शिंपडण्यात आलेल्या रक्ताकडे आलात की जे रक्त हाबेलाच्या रक्तापेक्षा अधिक उत्तम बोलते.
Hebrews 13:20 in Marathi 20 ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा (म्हणजे आपल्या लोकांचा) मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.
1 Peter 1:2 in Marathi 2 देवपित्याच्या पूर्वज्ञानानुसार आत्म्याच्या पवित्रीकरणाद्वारे, आज्ञापालन करण्यासाठी, येशू ख्रिस्ताचे रक्त शिंपडून निवडलेले तुम्हाला कृपा व शांती विपुल मिळोत.
1 Peter 3:21 in Marathi 21 आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा (देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो.
1 John 1:7 in Marathi 7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
1 John 4:10 in Marathi 10 आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.
1 John 5:7 in Marathi 7 आत्मा हा साक्ष देणारा आहे,कारण आत्मा सत्य आहे.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 5:9 in Marathi 9 आणि त्यांनी नवे गाणे गाईलेः “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने मनुष्यांना प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या जमातीतून, आणि राष्ट्रांतून विकत घेतले.
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.