1 John 5:18 in Marathi 18 आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.
Other Translations King James Version (KJV) We know that whosoever is born of God sinneth not; but he that is begotten of God keepeth himself, and that wicked one toucheth him not.
American Standard Version (ASV) We know that whosoever is begotten of God sinneth not; but he that was begotten of God keepeth himself, and the evil one toucheth him not.
Bible in Basic English (BBE) We are certain that one who is a child of God will do no sin, but the Son of God keeps him so that he is not touched by the Evil One.
Darby English Bible (DBY) We know that every one begotten of God does not sin, but he that has been begotten of God keeps himself, and the wicked [one] does not touch him.
World English Bible (WEB) We know that whoever is born of God doesn't sin, but he who was born of God keeps himself, and the evil one doesn't touch him.
Young's Literal Translation (YLT) We have known that every one who hath been begotten of God doth not sin, but he who was begotten of God doth keep himself, and the evil one doth not touch him;
Cross Reference John 1:13 in Marathi 13 त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा, किंवा मनुष्याची इच्छा ह्यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
John 3:2 in Marathi 2 तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “गुरूजी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहा हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहा ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 15:4 in Marathi 4 तुम्ही माझ्यामध्ये राहा, आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावांचून त्याला आपल्याआपण फळ देतां येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हालाहि देता येणार नाही.
John 15:7 in Marathi 7 तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हाला मिळेल.
John 15:9 in Marathi 9 जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीहि तुम्हावर प्रीती केली; तुम्ही माझ्या प्रीतीत रहा.
Acts 11:23 in Marathi 23 बर्णबा चांगला मनुष्य होता. तो पवित्र आत्म्याने आणि विश्वासाने पूर्णपणे भरलेला होता. जेव्हा बर्णबा अंत्युखियाला गेला, तेव्हा त्याने पाहिले की, देवाने या लोकांवर खूप कृपा केली आहे. त्यामुळे बर्णबाला खूप आनंद झाला. अंत्युखियातील सर्व विश्वासणाऱ्यांना त्याने उत्तेजन दिले, त्याने त्यांना सांगितले, “कधीही तुमचा विश्वास गमावू नका. नेहमी प्रभूची आज्ञा अंतःकरणापासून पाळा.”
James 1:18 in Marathi 18 आपण त्याच्या निर्मीती मधील जसे काय प्रथमफळ व्हावे म्हणून त्याने सत्यवचनाद्वारे स्वतःच्या इच्छेने आपणाला जन्म दिला.
James 1:27 in Marathi 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुध्द व निर्दोष ठरते.
1 Peter 1:23 in Marathi 23 कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या शब्दाच्याद्वारे पुन्हा जन्म पावलेले आहा .
1 John 2:13 in Marathi 13 वडिलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो,मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला आेळखता.
1 John 2:29 in Marathi 29 जर तुम्हाला माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हाला कळेल.
1 John 3:3 in Marathi 3 आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुध्द आहे, तसा तो आपणाला शुध्द करतो
1 John 3:9 in Marathi 9 जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही. कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही. कारण तो देवापासून जन्मला आहे.
1 John 3:12 in Marathi 12 काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्यांच्या भावाची कृत्ये नीतीची होती.
1 John 4:6 in Marathi 6 पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
1 John 5:1 in Marathi 1 येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे. आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरहि प्रीती करतो.
1 John 5:4 in Marathi 4 कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो, आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास.
1 John 5:21 in Marathi 21 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.
Jude 1:21 in Marathi 21 तुम्ही अनंतकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.
Jude 1:24 in Marathi 24 आता, तुम्हाला अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 3:8 in Marathi 8 “मला तुमची कामे माहीत आहेत, पाहा मी तुमच्यासमोर दार उघडे करून ठेवले आहे. जे कोणीही बंद करू शकणार नाही. मला माहीत आहे की, तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझा शब्द पाळला आहेस, आणि माझे नाव नाकारले नाहीस.