1 John 4:6 in Marathi 6 पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
Other Translations King James Version (KJV) We are of God: he that knoweth God heareth us; he that is not of God heareth not us. Hereby know we the spirit of truth, and the spirit of error.
American Standard Version (ASV) We are of God: he that knoweth God heareth us; he who is not of God heareth us not. By this we know the spirit of truth, and the spirit of error.
Bible in Basic English (BBE) We are of God: he who has the knowledge of God gives ear to us; he who is not of God does not give ear to us. By this we may see which is the true spirit, and which is the spirit of error.
Darby English Bible (DBY) *We* are of God; he that knows God hears us; he who is not of God does not hear us. From this we know the spirit of truth and the spirit of error.
World English Bible (WEB) We are of God. He who knows God listens to us. He who is not of God doesn't listen to us. By this we know the spirit of truth, and the spirit of error.
Young's Literal Translation (YLT) we -- of God we are; he who is knowing God doth hear us; he who is not of God, doth not hear us; from this we know the spirit of the truth, and the spirit of the error.
Cross Reference Luke 10:22 in Marathi 22 “माइया पित्याने सर्व गोष्टी माझ्यासाठी दिल्या होत्या. आणि पुत्र कोण आहे हे पित्याशिवाय कोणालाच ठाऊक नाही. आणि पुत्राशिवाय कोणालाही पिता कोण आहे हे माहीत नाही व ज्या कोणाला ते प्रकट करण्याची पुत्राची इच्छा असेल त्यालाच फक्त माहीत आहे.
John 8:19 in Marathi 19 ह्यावरून ते त्याला म्हणाले, “तुमचा पिता कोठे आहे?” येशूने उत्तर दिले, “तुम्ही मला किंवा माझ्या पित्यालाही ओळखीत नाही. तुम्ही मला ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते.”
John 8:45 in Marathi 45 पण मी तुम्हाला खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही.
John 10:16 in Marathi 16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत;तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
John 10:27 in Marathi 27 माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो, आणि ती माझ्यामागें येतात.
John 13:20 in Marathi 20 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो की, मी ज्याला पाठवतो त्याचा जो स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो मला स्वीकारतो तो ज्याने मला पाठवले त्याला स्वीकारतो.”
John 14:17 in Marathi 17 तो खरेपणाचा आत्मा आहे, जग त्याला ग्रहण करू शकत नाही,कारण ते त्याला पाहत नाही अथवा त्याला ओळखीत नाही; तुम्ही त्याला ओळखता,कारण तो तुम्हाबरोबर राहतो,आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
John 15:26 in Marathi 26 पण जो पित्यापासून निघतो,ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
John 16:13 in Marathi 13 पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि हाेणार्या गोष्टी तुम्हाला कळवील.
John 18:37 in Marathi 37 म्हणून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे, आणि ह्यासाठी मी जगात आलो आहे.मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
John 20:21 in Marathi 21 तेव्हा येशू त्यांना पुन्हा म्हणाला, “तुम्हाला शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीहि तुम्हाला पाठवतो.”
Romans 1:1 in Marathi 1 प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून;
Romans 11:8 in Marathi 8 कारण असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना ह्या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
1 Corinthians 2:12 in Marathi 12 परंतु आम्हाला जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण अोळखून घ्यावे.
1 Corinthians 14:37 in Marathi 37 एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो धार्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हाला लिहित आहे ती देवाकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. -
2 Corinthians 10:7 in Marathi 7 डोळ्यांपुढे आहे ते पाहा; आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी भरवसा असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की, जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहोत.
2 Thessalonians 1:8 in Marathi 8 तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील.
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
1 Timothy 4:1 in Marathi 1 आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काही जण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
2 Peter 3:2 in Marathi 2 ह्यासाठी की, पवित्र संदेष्ट्यांनी अगोदर सांगितलेल्या वचनांची, आणि जो आपला प्रभू व तारणारा आहे त्याने तुमच्या प्रेषिताद्वारे दिलेल्या आज्ञेची आठवण तुम्ही ठेवावी.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
1 John 4:8 in Marathi 8 जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही. कारण देव प्रीती आहे.
Jude 1:17 in Marathi 17 पण प्रियांनो, तुम्ही तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रेषितांनी पूर्वी सांगितलेल्या वचनांची तुम्ही आठवण करा;