1 John 1:2 in Marathi 2 ते जीवन आम्हास प्रकट झाले. आम्ही ते पाहिले आहे; त्याविषयी आम्ही साक्ष देतो; आणि आम्ही त्या सार्वकालिक जीवनाविषयी तुम्हाला घोषणा करीत आहोत. ते जीवन पित्याजवळ होते आणि ते आम्हाला प्रकट केले गेले.
Other Translations King James Version (KJV) (For the life was manifested, and we have seen it, and bear witness, and shew unto you that eternal life, which was with the Father, and was manifested unto us;)
American Standard Version (ASV) (and the life was manifested, and we have seen, and bear witness, and declare unto you the life, the eternal `life', which was with the Father, and was manifested unto us);
Bible in Basic English (BBE) (And the life was made clear to us, and we have seen it and are witnessing to it and giving you word of that eternal life which was with the Father and was seen by us);
Darby English Bible (DBY) (and the life has been manifested, and we have seen, and bear witness, and report to you the eternal life, which was with the Father, and has been manifested to us:)
World English Bible (WEB) (and the life was revealed, and we have seen, and testify, and declare to you the life, the eternal life, which was with the Father, and was revealed to us);
Young's Literal Translation (YLT) and the Life was manifested, and we have seen, and do testify, and declare to you the Life, the age-during, which was with the Father, and was manifested to us --
Cross Reference John 1:1 in Marathi 1 प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
John 1:4 in Marathi 4 त्याच्या ठायी जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते.
John 1:18 in Marathi 18 देवाला कोणीहीं कधीच पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र जन्मलेला पित्याच्या उराशी असतो त्याने त्याला प्रकट केले आहे.
John 3:13 in Marathi 13 स्वर्गातून उतरलेला व स्वर्गात असलेला जो मनुष्याचा पुत्र त्याच्यावाचून कोणीही स्वर्गात चढून गेला नाही.
John 7:29 in Marathi 29 मी तर त्याला ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.”
John 8:38 in Marathi 38 मी पित्याजवळ जे पाहिले ते बोलतो, तसेच तुम्ही आपल्या पित्याकडून जे ऐकले ते करता.”
John 11:25 in Marathi 25 येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मेला असला तरी जगेल.
John 14:6 in Marathi 6 येशूने त्याला म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
John 15:27 in Marathi 27 आणि तुम्ही पहिल्यापासून माझ्याबरोबर आहा म्हणून तुम्हीही साक्ष द्याल
John 16:28 in Marathi 28 मी पित्यापासून निघून जगात आलो आहे; पुन्हा, जग सोडून पित्याकडे जातो.”
John 17:3 in Marathi 3 सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला, आणि ज्याला तू पाठविलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे.
John 17:5 in Marathi 5 तर आता, हे माझ्या बापा, हे जग होण्याआधी जे माझे गौरव तुझ्याजवळ होते त्याच्यायोगे तू आपणाजवळ माझे गौरव कर.
John 21:14 in Marathi 14 येशू मेलेल्यातून उठल्यानंतर त्याची शिष्यांना प्रकट व्हायची ही तिसरी वेळ.
Acts 1:22 in Marathi 22 म्हणजे तो आपणांमध्ये येत जात असे त्या सगळ्या काळात ही जी माणसे आपल्या संगतीसोबतीत होती त्यांच्यातून एकाने आपल्याबरोबर त्याच्या पुनरूत्थानाचा साक्षी झाले पाहिजे.
Acts 2:32 in Marathi 32 त्या येशूला देवाने उठवले ह्याविषयी आम्ही सर्व साक्षी आहो.
Acts 3:15 in Marathi 15 आणि जीवनाच्या अधिपतीला तुम्ही जिवे मारले; त्याला देवाने मेलेल्यामधून उठवले, याचे आम्ही साक्षी आहो.
Acts 5:32 in Marathi 32 ह्या गोष्टीविषयी आम्ही साक्षी आहोत आणि देवाने आपल्या आज्ञा पाळणाऱ्यांना जो पवित्र आत्मा दिला आहे तोही साक्षी आहे.
Acts 10:41 in Marathi 41 परंतु सर्वच माणासांनी येशूला पाहिले नाही. देवाने त्यांना अगोदरच साक्षीदार म्हणून निवडले होते. त्यांनीच त्याला पाहिले. ते साक्षीदार आम्ही आहोत! येशू मरणातून उठविला गेल्यानंतर आम्ही त्याच्याबरोबर अन्नपाणी सेवन केले.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
1 Timothy 3:16 in Marathi 16 ''सुभक्तीचे रहस्य निर्विवाद मोठे आहे'' ''तो देहात प्रकट झाला, ''आत्म्याने तो नीतिमान ठरवला गेला, ''तो देवदूतांच्या दृष्टीस पडला, '' राष्ट्रांमध्ये गाजवल्या गेला, ''जगात त्याच्यावर विश्वास ठेवण्यात आला, '' तो गौरवात वर घेतला गेला.
2 Timothy 1:10 in Marathi 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
1 Peter 5:1 in Marathi 1 तुमच्यात जे कोणी वडील आहेत त्यांना मी एक सोबतीचा वडील व ख्रिस्ताच्या दुःखांचा साक्षी म्हणून व त्याचप्रमाणे, पुढे प्रकट होणार असलेल्या गौरवाचा एक भागीदार म्हणून हा बोध करतो.
1 John 1:1 in Marathi 1 जे आरंभापासून होते. ते आम्ही ऐकले आहे, आमच्या डोळ्यांनी आम्ही जे पाहिले आहे आणि न्याहाळले आहे, आम्ही ते आमच्या हातांनी चाचपले आहे,त्याच जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो.
1 John 3:5 in Marathi 5 तुम्हाला माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठीतो प्रकट झाला; त्याच्या ठायी पाप नाही.
1 John 3:8 in Marathi 8 जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1 John 5:11 in Marathi 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.