Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
Other Translations King James Version (KJV) In hope of eternal life, which God, that cannot lie, promised before the world began;
American Standard Version (ASV) in hope of eternal life, which God, who cannot lie, promised before times eternal;
Bible in Basic English (BBE) In the hope of eternal life, which was made certain before eternal time, by the word of God who is ever true;
Darby English Bible (DBY) in [the] hope of eternal life, which God, who cannot lie, promised before the ages of time,
World English Bible (WEB) in hope of eternal life, which God, who can't lie, promised before eternal times;
Young's Literal Translation (YLT) upon hope of life age-during, which God, who doth not lie, did promise before times of ages,
Cross Reference Matthew 25:34 in Marathi 34 “मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा.
Matthew 25:46 in Marathi 46 “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”
Mark 10:17 in Marathi 17 येशू प्रवासाला निघाला असता एक मनुष्य त्याच्याकडे धावत आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “उत्तम गुरूजी, सार्वकालिक जीवन मिळण्यासाठी मी काय करावे?”
Mark 10:30 in Marathi 30 अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.”
John 3:15 in Marathi 15 ह्यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्याला त्याच्या ठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.”
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
John 6:54 in Marathi 54 जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि मीच त्याला शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन.
John 6:68 in Marathi 68 तेव्हा शिमोन पेत्राने त्याला उत्तर दिले, “प्रभू, आम्ही कोणाकडे जाणार? सार्वकालिक जीवनाची वचने आपणाकडे आहेत.
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 17:2 in Marathi 2 जे तू त्याला दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्याला सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस.
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
Acts 15:18 in Marathi 18 हे जे त्याला युगादीपासून माहीत आहे ते करणारा प्रभू असे म्हणतो ,
Romans 1:2 in Marathi 2 त्याने तीच्याविषयी, आपल्या संदेष्ट्यांद्वारे, पवित्र शास्त्रलेखात, अगोदरच अभिवचन दिले होते;
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 5:2 in Marathi 2 आपण उभे आहोत त्या कृपेतही, त्याच्या द्वारे विश्वासाने, आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो.
Romans 5:4 in Marathi 4 आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते.
Romans 5:21 in Marathi 21 म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले, तसे कृपेने नीतिमत्वाच्या योगे प्राप्त होणार्या सार्वकालिक जीवनासाठी, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे राज्य चालवावे.
Romans 6:23 in Marathi 23 कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे. *
Colossians 1:27 in Marathi 27 त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ति परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्र जनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
1 Thessalonians 2:15 in Marathi 15 त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाहि जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व माणसांचेही विरोधी झाले आहेत;
1 Thessalonians 5:8 in Marathi 8 परत जे आपण दिवसाचे आहोत त्या आपण सावध असावे;विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्राण घालावे.
1 Timothy 6:12 in Marathi 12 विश्वासा संबंधी चांगले युध्द कर, ज्यासाठी तुला बोलावले होते. त्या अनंतकाळच्या जीवनाला दृढ धर. तू अनेक साक्षीदारांसमोर चांगली साक्ष दिलीस,
1 Timothy 6:19 in Marathi 19 जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतः साठी करावा.
2 Timothy 1:1 in Marathi 1 येशू ख्रिस्तामध्ये असलेल्या जीवनाविषयीच्या अभिवचनाची घोषणा करण्यास, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल याजकडून,
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 2:10 in Marathi 10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.
2 Timothy 2:13 in Marathi 13 जरी आम्ही अविश्वासू आहोत तरी तो अजूनही विश्वासू आहे कारण तो स्वतःला नाकारु शकत नाही''.
2 Timothy 2:15 in Marathi 15 देवाला पटलेला व देवाचे वचन योग्य रीतीने शिकवण्यास पात्र असा आणि जे काम करतोस त्यात लाज वाटण्यासारखे काहीही नसलेला असा देवाने पसंत केलेला कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
Titus 2:7 in Marathi 7 तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता,
Titus 2:13 in Marathi 13 आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
Titus 3:7 in Marathi 7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
Hebrews 6:17 in Marathi 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
1 Peter 1:3 in Marathi 3 आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे,
1 Peter 1:20 in Marathi 20 खरोखर, जगाच्या स्थापने अगोदर, तो पूर्वीपासून नेमलेला होता. पण, ह्या शेवटच्या काळात तो तुमच्यासाठी प्रकट झाला,
1 John 2:25 in Marathi 25 आणि देवाने आम्हाला जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय.
1 John 3:2 in Marathi 2 प्रियांनो, आता आम्ही देवाची मुले आहोत, आणि भविष्यकाळात आम्ही कसे असू हे अाम्हाला माहीत नाही. तरीही आम्हाला माहीत आहे की, जेव्हा ख्रिस्त पुन्हा येईल, तेव्हा आम्ही त्याच्यासारखे असू. कारण तो जसा आहे तसे आम्ही त्याला पाहू.
1 John 5:11 in Marathi 11 आणि देवाची जी साक्ष आहे ती ही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Jude 1:21 in Marathi 21 तुम्ही अनंतकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.
Revelation 17:8 in Marathi 8 आणि तू जो पशू बघितलास, जो होता, आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल. आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील. कारण तो होता, नाही, आणि येणार आहे.