Titus 1:10 in Marathi 10 हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांना फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. ,
Other Translations King James Version (KJV) For there are many unruly and vain talkers and deceivers, specially they of the circumcision:
American Standard Version (ASV) For there are many unruly men, vain talkers and deceivers, specially they of the circumcision,
Bible in Basic English (BBE) For there are men who are not ruled by law; foolish talkers, false teachers, specially those of the circumcision,
Darby English Bible (DBY) For there are many and disorderly vain speakers and deceivers of people's minds, specially those of [the] circumcision,
World English Bible (WEB) For there are also many unruly men, vain talkers and deceivers, especially those of the circumcision,
Young's Literal Translation (YLT) for there are many both insubordinate, vain-talkers, and mind-deceivers -- especially they of the circumcision --
Cross Reference Acts 11:2 in Marathi 2 पण जेव्हा पेत्र यरूशलेमेला आला, तेव्हा सुंता झालेला गट त्याच्यावर टिका करू लागले.
Acts 15:1 in Marathi 1 तेव्हा काही जणानी यहुदीयाहून उतरून बंधुजनांना अशी शिकवण दिली की, मोशेने लावून दिलेल्या परिपाठाप्रमाणे तुमची सुंता झाल्यावाचुन तुमचे तारण होणे शक्य नाही.
Acts 15:24 in Marathi 24 आमच्यापैकी काहीनां जाऊन आपल्या बोलण्याने तुम्हाला घोटाळ्यात पाडून त्रास दिला असे आमच्या कानी आले आहे; पण त्यांना आम्ही तसे करावयाला सांगितले नव्हते;
Acts 20:29 in Marathi 29 मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील. ते कळपाला सोडणार नाहीत.
Romans 16:17 in Marathi 17 आता, बंधूंनो, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा.
2 Corinthians 11:12 in Marathi 12 आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की, जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये. ते त्यांना ह्यासाठी हवे आहे की, ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यात ते आमच्यासारखे दिसावेत .
Galatians 1:6 in Marathi 6 मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हाला ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या सुवार्तेकडे वळला आहा.
Galatians 2:4 in Marathi 4 आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते.
Galatians 3:1 in Marathi 1 अहो बुध्दीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हाला कोणी भुरळ घातली आहे?
Galatians 4:17 in Marathi 17 ते लोक तुमच्याविषयी आवेशी आहेत तरी चांगल्या प्रकारे नाही. पण तुम्ही त्यांच्याविषयी आवेशी असावे म्हणून ते तुम्हाला आमच्यापासून वेगळे करू पाहतात.
Galatians 5:1 in Marathi 1 ह्या स्वातंत्र्याकरिता ख्रिस्ताने आपल्याला मोकळे केले आहे म्हणून त्यात तुम्ही टिकून राहा, आणि दासत्वाच्या जुवाखाली पुन्हा सापडू नका.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
Philippians 3:2 in Marathi 2 त्या कुत्र्यांपासून सावध राहा. वाईट काम करणार्यांपासून सावध राहा. केवळ दैहिक सुंता झालेल्या लोकांविषयी सावध राहा.
2 Thessalonians 2:10 in Marathi 10 ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांंनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अदभूते आणि सर्व प्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल.
1 Timothy 1:4 in Marathi 4 आणि जी ईश्वरी व्यवस्था विश्वासाच्या द्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या , पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका . तेच मी आतांही सांगतो .
1 Timothy 1:6 in Marathi 6 या गोष्टी सोडून कित्येक जण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत.
1 Timothy 6:3 in Marathi 3 जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुध्द शिक्षण मान्य करीत नाही
2 Timothy 3:13 in Marathi 13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
2 Timothy 4:4 in Marathi 4 सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
James 1:26 in Marathi 26 जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जिभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.
2 Peter 2:1 in Marathi 1 पण त्या लोकांत खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील, आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील.
1 John 2:18 in Marathi 18 माझ्या लहान मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत;ह्यावरून आपल्याला दिसून येते की,ही शेवटली घटका आहे.
1 John 4:1 in Marathi 1 प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका. परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा. कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
Revelation 2:6 in Marathi 6 पण असे काही आहे जे तू करतोस, तू निकलाईतांचा कृत्यांचा व्देष करतेस, मीही त्यांच्या कृत्यांचा व्देष करतो.
Revelation 2:14 in Marathi 14 “पण तुझ्याविरुध्द माझ्याजवळ काही गोष्टी आहेत. कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व लैंगिक पापे करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले,त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.