Romans 9:30 in Marathi 30 मग आपण काय म्हणावे? तर जे परराष्ट्रीय नीतिमत्वाच्या मागे लागले नाहीत त्यांनी नीतिमत्व मिळविले आहे, म्हणजे विश्वासाने मिळणारे नीतिमत्व मिळविले आहे.
Other Translations King James Version (KJV) What shall we say then? That the Gentiles, which followed not after righteousness, have attained to righteousness, even the righteousness which is of faith.
American Standard Version (ASV) What shall we say then? That the Gentiles, who followed not after righteousness, attained to righteousness, even the righteousness which is of faith:
Bible in Basic English (BBE) What then may we say? That the nations who did not go after righteousness have got righteousness, even the righteousness which is of faith:
Darby English Bible (DBY) What then shall we say? That [they of the] nations, who did not follow after righteousness, have attained righteousness, but [the] righteousness that is on the principle of faith.
World English Bible (WEB) What shall we say then? That the Gentiles, who didn't follow after righteousness, attained to righteousness, even the righteousness which is of faith;
Young's Literal Translation (YLT) What, then, shall we say? that nations who are not pursuing righteousness did attain to righteousness, and righteousness that `is' of faith,
Cross Reference Romans 1:17 in Marathi 17 कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते. कारण असा शास्त्रलेख आहे की, नीतिमान विश्वासाने जगेल’.
Romans 3:5 in Marathi 5 पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.)
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे.
Romans 4:9 in Marathi 9 मग हा आशीर्वाद सुंता झालेल्यांकरता आहे की, सुंता न झालेल्यांकरताही आहे? कारण आपण असे मानतो की, विश्वास हा अब्राहामाकडे नीतिमत्व असा गणण्यात आला होता.
Romans 4:11 in Marathi 11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे.
Romans 4:13 in Marathi 13 कारण तू जगाचा वारीस होशील, हे वचन अब्राहामाला किंवा त्याच्या संतानाला नियमशास्त्राच्या द्वारे नव्हते, पण विश्वासाच्या नीतिमत्वाच्या द्वारे होते.
Romans 4:22 in Marathi 22 आणि म्हणून ते त्याच्या बाजूकडे नीतिमत्व म्हणून गणले गेले.
Romans 5:1 in Marathi 1 आता, आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत, म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या द्वारे देवाबरोबर शांती आहे.
Romans 9:14 in Marathi 14 मग आपण काय म्हणावे? देवाजवळ अनीती आहे काय? तसे न होवो.
Romans 9:31 in Marathi 31 पण जे इस्राएल नीतिमत्वाच्या नियमाच्या मागे लागले ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत.
Romans 10:6 in Marathi 6 पण विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व असे म्हणते की, तू आपल्या मनात म्हणून नकोस की, स्वर्गात कोण चढेल? (म्हणजे ख्रिस्ताला खाली आणण्यास)
Romans 10:10 in Marathi 10 कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते.
Romans 10:20 in Marathi 20 पण यशया फार धीट होऊन म्हणतो की, ‘ज्यांनी माझा शोध केला नाही त्यांना मी सापडलो आहे, ज्यांनी माझ्याविषयी विचारले नाही त्यांना प्राप्त झालो आहे.’
1 Corinthians 6:9 in Marathi 9 अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही जारकर्मी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे,
Galatians 2:16 in Marathi 16 तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्या द्वारे ठरतो,हे जाणून आम्ही ही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला;ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्ही ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने आम्ही नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.
Galatians 3:8 in Marathi 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल’.
Galatians 3:24 in Marathi 24 हयांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.
Galatians 5:5 in Marathi 5 कारण आपण आत्म्याच्या द्वारे,विश्वासाने, नीतिमत्वाची आशा धरून वाट पाहत आहो.
Ephesians 2:12 in Marathi 12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
Philippians 3:9 in Marathi 9 आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाव्दारे, म्हणजे देवाकडून विश्वासाव्दारे मिळणारे नीतिमत्व असे असावे.
1 Timothy 6:11 in Marathi 11 हे देवाच्या माणसा , तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता, आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
Hebrews 11:7 in Marathi 7 विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्याला सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्र्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्वाचा तो वारीस झाला.
1 Peter 4:3 in Marathi 3 कारण, परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात.