Romans 8:39 in Marathi 39 किंवा उंची किंवा खोली, किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्या ठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
Other Translations King James Version (KJV) Nor height, nor depth, nor any other creature, shall be able to separate us from the love of God, which is in Christ Jesus our Lord.
American Standard Version (ASV) nor height, nor depth, nor any other creature, shall be able to separate us from the love of God, which is in Christ Jesus our Lord.
Bible in Basic English (BBE) Or things on high, or things under the earth, or anything which is made, will be able to come between us and the love of God which is in Christ Jesus our Lord.
Darby English Bible (DBY) nor height, nor depth, nor any other creature, shall be able to separate us from the love of God, which [is] in Christ Jesus our Lord.
World English Bible (WEB) nor height, nor depth, nor any other created thing, will be able to separate us from the love of God, which is in Christ Jesus our Lord.
Young's Literal Translation (YLT) nor things about to be, nor height, nor depth, nor any other created thing, shall be able to separate us from the love of god, that `is' in Christ Jesus our Lord.
Cross Reference Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
John 3:16 in Marathi 16 कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला अनंतकाळचे जीवन मिळावे.
John 10:28 in Marathi 28 मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकून घेणार नाही.
John 16:27 in Marathi 27 कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
John 17:26 in Marathi 26 मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, ह्यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यांमध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
Romans 5:8 in Marathi 8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
Romans 11:33 in Marathi 33 अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे निर्णय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
2 Corinthians 2:11 in Marathi 11 यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याचे विचार जाणत नाही असे नाही.
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
Ephesians 1:4 in Marathi 4 देवाने ख्रिस्ताठायी विश्वास ठेवणाऱ्यांना जगाची निर्मिती होण्यापूर्वीच निवडले जेणेकरून आम्ही त्याच्या दृष्टीने पवित्र आणि निर्दोष असावे.
Ephesians 2:4 in Marathi 4 “पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.”
Ephesians 3:18 in Marathi 18 “ “यासाठी की,जे पवित्र जन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे.
Colossians 3:3 in Marathi 3 कारण तुम्ही मृत झला आहा, आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेलें आहे.
2 Thessalonians 2:4 in Marathi 4 तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या मंदिरांत बसणारा असा आहे.
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
1 John 4:9 in Marathi 9 देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हाला जीवन मिळावे.अशा प्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे.
1 John 4:16 in Marathi 16 आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे.आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्या मध्ये राहतो.
1 John 4:19 in Marathi 19 पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.
Revelation 2:24 in Marathi 24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्यास सैतानाची_ म्हणतात ती गुपिते तुम्हाला माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 13:1 in Marathi 1 आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्याला दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुगुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.
Revelation 19:20 in Marathi 20 मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. ह्या दोघांनाही गंधकाने जळणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.
Revelation 20:3 in Marathi 3 आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यात बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्याला पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते.
Revelation 20:7 in Marathi 7 जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल.