Romans 8:34 in Marathi 34 दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मेला, हो, जो मेलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे.
Other Translations King James Version (KJV) Who is he that condemneth? It is Christ that died, yea rather, that is risen again, who is even at the right hand of God, who also maketh intercession for us.
American Standard Version (ASV) who is he that condemneth? It is Christ Jesus that died, yea rather, that was raised from the dead, who is at the right hand of God, who also maketh intercession for us.
Bible in Basic English (BBE) Who will give a decision against us? It is Christ Jesus who not only was put to death, but came again from the dead, who is now at the right hand of God, taking our part.
Darby English Bible (DBY) who is he that condemns? [It is] Christ who has died, but rather has been [also] raised up; who is also at the right hand of God; who also intercedes for us.
World English Bible (WEB) Who is he who condemns? It is Christ who died, yes rather, who was raised from the dead, who is at the right hand of God, who also makes intercession for us.
Young's Literal Translation (YLT) who `is' he that is condemning? Christ `is' He that died, yea, rather also, was raised up; who is also on the right hand of God -- who also doth intercede for us.
Cross Reference Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Mark 16:19 in Marathi 19 मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
John 14:19 in Marathi 19 आता थोडाच वेळ आहे, मग जग मला आणखी पाहणार नाही. पण तुम्ही मला पाहाल; मी जिवंत आहे, म्हणून तुम्हीही जिवंत राहाल.
John 16:23 in Marathi 23 आणि त्या दिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल.
John 16:26 in Marathi 26 त्या दिवशी तुम्ही माझ्या नावाने मागाल; आणि मी तुमच्यासाठी पित्याजवळ विनंती करीन असे मी तुम्हाला म्हणत नाही.
John 17:20 in Marathi 20 “मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीहि विनंती करतो
Acts 7:56 in Marathi 56 आणि त्याने म्हटले, पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.
Romans 5:6 in Marathi 6 कारण, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मेला.
Romans 8:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
Romans 8:27 in Marathi 27 आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो आत्म्याचे मन जाणतो,कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
Romans 14:9 in Marathi 9 कारण ख्रिस्त मेला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
Romans 14:13 in Marathi 13 तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Colossians 3:1 in Marathi 1 म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहा तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा.
Hebrews 1:3 in Marathi 3 पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांना त्यांच्या पापांपासून शुध्द केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
Hebrews 4:14 in Marathi 14 म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान प्रमुख याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या.
Hebrews 7:25 in Marathi 25 म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे. कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.
Hebrews 8:1 in Marathi 1 आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे कीः असा मुख्य याजक आम्हाला लाभलेला आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या सिंहासनाच्या उजव्या बाजूस बसतो,
Hebrews 9:10 in Marathi 10 हे विधी केवळ दैहिक बाबी म्हणजे अन्न व पाणी तसेच निरनिराळ्या प्रकारच्या औपचारिक धुण्याबाबत संबंधित आहेत. हे केवळ सुधारणुकीच्या काळापर्यंत लावून दिले आहेत.
Hebrews 9:24 in Marathi 24 कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला.
Hebrews 10:10 in Marathi 10 देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.
Hebrews 10:19 in Marathi 19 म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपण निर्धास्तपणे परमपवित्रस्थानामध्ये प्रवेश करतो.
Hebrews 12:1 in Marathi 1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 Peter 3:22 in Marathi 22 तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे; आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
1 John 2:1 in Marathi 1 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हाला या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हापैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे.
Revelation 1:18 in Marathi 18 आणि जो जिवंत तो मी आहे; मी मेलो होतो, पण तरी पाहा, मी अनंतकाळासाठी जिवंत आहे! आणि माझ्या जवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.