Romans 8:30 in Marathi 30 आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
Other Translations King James Version (KJV) Moreover whom he did predestinate, them he also called: and whom he called, them he also justified: and whom he justified, them he also glorified.
American Standard Version (ASV) and whom he foreordained, them he also called: and whom he called, them he also justified: and whom he justified, them he also glorified.
Bible in Basic English (BBE) And those who were marked out by him were named; and those who were named were given righteousness; and to those to whom he gave righteousness, in the same way he gave glory.
Darby English Bible (DBY) But whom he has predestinated, these also he has called; and whom he has called, these also he has justified; but whom he has justified, these also he has glorified.
World English Bible (WEB) Whom he predestined, those he also called. Whom he called, those he also justified. Whom he justified, those he also glorified.
Young's Literal Translation (YLT) and whom He did fore-appoint, these also He did call; and whom He did call, these also He declared righteous; and whom He declared righteous, these also He did glorify.
Cross Reference John 5:24 in Marathi 24 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे, आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
John 6:39 in Marathi 39 आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की, त्याने मला जे सर्व दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, पण शेवटच्या दिवशी मी ते उठवावे.
John 17:22 in Marathi 22 तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, ह्यासाठी की, जसे आपण एक आहो तसे त्यांनी एक व्हावे ;
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
Romans 1:6 in Marathi 6 त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहा.
Romans 3:22 in Marathi 22 पण हे देवाचे नीतिमत्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्या सर्वांसाठी आहे. कारण तेथे कसलाही फरक नाही.
Romans 5:8 in Marathi 8 पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मेला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.
Romans 8:1 in Marathi 1 म्हणून ख्रिस्त येशुमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही.ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात.
Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Romans 8:33 in Marathi 33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
1 Corinthians 1:2 in Marathi 2 ख्रिस्त येशूत पवित्र केलेल्या, आणि जे प्रत्येक ठिकाणी आपला प्रभू, म्हणजे त्यांचा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने धावा करतात, अशा सर्वांबरोबर पवित्र जन होण्यास बोलावलेल्या, करिंथ येथील देवाच्या मंडळीस
1 Corinthians 1:9 in Marathi 9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागीतेत तुम्हाला बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
2 Corinthians 4:17 in Marathi 17 कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते.
Ephesians 1:5 in Marathi 5 “देवाच्या प्रीतीच्या योजनेनुसार त्याच्या स्वतःचा पुत्र येशू ख्रिस्ताद्वारे त्याने दत्तक होण्यासाठी आमची नेमणूक केली. त्याने हे यासाठी केले कारण त्याची जी इच्छा होती त्यात तो आनंदित होता.”
Ephesians 1:11 in Marathi 11 ख्रिस्तामध्ये आम्ही पूर्वीच देवाचे लोक म्हणून त्याच्या योजनेप्रमाणे निवडून नेमले गेलो. जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो
Ephesians 2:6 in Marathi 6 “आणि आम्हाला त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात येशू ख्रिस्ताबरोबर त्याच्या आसनावर बसविले.
Ephesians 4:4 in Marathi 4 एक शरीर व एकच आत्मा आहे. ज्याप्रमाणे तुम्हालाही एकाच आशेत सहभागी होण्यास पाचारण केले आहे.
Colossians 3:4 in Marathi 4 आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
1 Thessalonians 2:12 in Marathi 12 जो देव आपल्या राज्यात व गौरवात तुम्हाला पाचारण करीत आहे त्याला शोभेल असे तुम्ही चालावे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 2:11 in Marathi 11 हे वचन विश्वसनीय आहे की , ''जर आम्ही त्याच्यासह मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Hebrews 9:15 in Marathi 15 पहिल्या काळात ज्या चुका झाल्या, त्या चुकांपासून सुटका व्हावी म्हणून देव आपल्या वचनानुसार सर्वकालच्या वतनासाठी ज्या लोकांना बोलावतो, त्यांच्याकरता ख्रिस्त हा नवीन कराराचा मध्यस्थ झाला आहे.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 3:9 in Marathi 9 तर वाइटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या. कारण ह्यासाठीच तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हाला आशीर्वाद हे वतन मिळावे.
1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
2 Peter 1:10 in Marathi 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. ह्या गोष्टी तुम्ही केल्या तर तुमचे पतन कधीही होणार नाही.
Revelation 17:14 in Marathi 14 ते कोकर्याशी युध्द करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. ”
Revelation 19:9 in Marathi 9 आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः ‘कोकर्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत. ’” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत. ”