Romans 8:28 in Marathi 28 कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात.
Other Translations King James Version (KJV) And we know that all things work together for good to them that love God, to them who are the called according to his purpose.
American Standard Version (ASV) And we know that to them that love God all things work together for good, `even' to them that are called according to `his' purpose.
Bible in Basic English (BBE) And we are conscious that all things are working together for good to those who have love for God, and have been marked out by his purpose.
Darby English Bible (DBY) But we *do* know that all things work together for good to those who love God, to those who are called according to purpose.
World English Bible (WEB) We know that all things work together for good for those who love God, to those who are called according to his purpose.
Young's Literal Translation (YLT) And we have known that to those loving God all things do work together for good, to those who are called according to purpose;
Cross Reference Mark 12:30 in Marathi 30 तू आपला देव जो तुझा प्रभू आहे, त्याजवर संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती कर.’
Acts 13:48 in Marathi 48 जेव्हा यहूदी नसलेल्यांनी पौलाला असे बोलताना ऐकले तेव्हा ते फार आनंदित झाले, देवाच्या संदेशाला त्यांनी गौरव दिले . आणि त्या लोकांपैकी पुष्कळांनी संदेशावर विश्वास ठेवला, कारण ते अनंतकाळच्या जीवनासाठी निवडले गेले होते.
Romans 1:6 in Marathi 6 त्यांपैकी तुम्हीही येशू ख्रिस्ताचे होण्यास बोलावलेले आहा.
Romans 5:3 in Marathi 3 आणि इतकेच नाही, तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की, संकट धीर उत्पन्न करते,
Romans 8:30 in Marathi 30 आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले, आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले, आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
Romans 8:35 in Marathi 35 ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय?
Romans 9:11 in Marathi 11 आणि मुलांचा जन्म झाला नसल्यामुळे, काही चांगले किंवा वाईट कोणी केले नसताना निवडीप्रमाणे देवाची योजना कायम रहावी म्हणून, कृतीप्रमाणे नाही पण बोलावणार्याच्या इच्छेप्रमाणे,
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
1 Corinthians 1:9 in Marathi 9 ज्याने आपला पुत्र येशू ख्रिस्त, आपला प्रभू याच्या सहभागीतेत तुम्हाला बोलावले होते, तो देव विश्वासू आहे.
1 Corinthians 2:9 in Marathi 9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
2 Corinthians 4:15 in Marathi 15 सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकारस्मरणाने, देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी.
2 Corinthians 5:1 in Marathi 1 कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हाला देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे.
Galatians 1:15 in Marathi 15 पण ज्या देवाने मला आईच्या उदरापासून वेगळे केले व आपल्या कृपेने मला बोलावले, त्याला जेव्हा बरे वाटले की, आपल्या पुत्राला माझ्याद्वारे प्रकट करावे, म्हणजे परराष्ट्रीयांमध्ये मी त्याची सुवार्तेची घोषणा करावी तेव्हा मी हे कोणत्याही मानवाची मसलत न घेता,
Galatians 5:8 in Marathi 8 तुम्हाला जो बोलवत आहे त्याच्याकडची ही शिकवण नाही.
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 3:11 in Marathi 11 देवाच्या सर्वकालच्या हेतूला अनुसरुन जे त्याने आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्यामध्ये पूर्णत्वास नेले.
Philippians 1:19 in Marathi 19 कारण मी जाणताे की हे, तुमच्या प्रार्थनेने व येशू ख्रिस्ताच्या आत्म्याच्या पुरवठ्याने माझ्या उध्दारास कारण होईल.
1 Thessalonians 5:9 in Marathi 9 कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.
2 Thessalonians 1:5 in Marathi 5 ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहा त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
2 Thessalonians 2:13 in Marathi 13 बंधूनो, प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे; कारण पवित्र आत्म्याच्या द्वारे होणाऱ्या पवित्रीकरणांत व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हाला प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;
2 Timothy 1:9 in Marathi 9 त्याने आम्हाला तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती.
2 Timothy 2:19 in Marathi 19 तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्याला हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे .”
Hebrews 12:6 in Marathi 6 कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्याला तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो.”
James 1:3 in Marathi 3 तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते.
James 1:12 in Marathi 12 जो परीक्षा सोसतो तो आशीर्वादित आहे, कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुगूट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्याला मिळेल.
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
1 Peter 1:7 in Marathi 7 म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी.
1 Peter 5:10 in Marathi 10 पण तुम्हाला ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हाला परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
1 John 4:10 in Marathi 10 आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.
1 John 4:19 in Marathi 19 पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो.
1 John 5:2 in Marathi 2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने.आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
Revelation 3:19 in Marathi 19 “ तो ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.