Romans 8:17 in Marathi 17 आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहो. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण सोसले तर.
Other Translations King James Version (KJV) And if children, then heirs; heirs of God, and joint-heirs with Christ; if so be that we suffer with him, that we may be also glorified together.
American Standard Version (ASV) and if children, then heirs; heirs of God, and joint-heirs with Christ; if so be that we suffer with `him', that we may be also glorified with `him'.
Bible in Basic English (BBE) And if we are children, we have a right to a part in the heritage; a part in the things of God, together with Christ; so that if we have a part in his pain, we will in the same way have a part in his glory.
Darby English Bible (DBY) And if children, heirs also: heirs of God, and Christ's joint heirs; if indeed we suffer with [him], that we may also be glorified with [him].
World English Bible (WEB) and if children, then heirs; heirs of God, and joint-heirs with Christ; if indeed we suffer with him, that we may also be glorified with him.
Young's Literal Translation (YLT) and if children, also heirs, heirs, indeed, of God, and heirs together of Christ -- if, indeed, we suffer together, that we may also be glorified together.
Cross Reference Matthew 16:24 in Marathi 24 तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्या मागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
Matthew 25:21 in Marathi 21 “त्याचा मालक म्हणाला, ‘शाब्बास, चांगल्या आणि विश्वासू दासा, तू भरंवसा ठेवण्यायोग्य नोकर आहेस. त्या थोड्या पैशांचा तू चांगला वापर केलास म्हणून मी पुष्कळावर तुझी नेमणूक करीन. आत जा आणि आपल्या मालकाच्या आनंदात सहभागी हो!’
Luke 12:32 in Marathi 32 “हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हाला त्याचे राज्य द्यावे यात पित्याला संतोष वाटतो.
Luke 22:29 in Marathi 29 ज्याप्रमाणे माझ्या पित्याने माझी नियुक्ति केली तशी मी तुमची नियुक्ति राज्यावर करतो.
Luke 24:26 in Marathi 26 ख्रिस्तासाठी या सर्व गोष्टी सहन करणे आणि त्याच्या गौरवात जाणे आवश्यक नव्हते काय?
John 12:25 in Marathi 25 जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्याला मुकेल आणि जो ह्या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठीे रक्षण करील.
John 17:24 in Marathi 24 हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीहि जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की,जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाच्या स्थापने अगोदर तू माझ्यावर प्रीती केली.
Acts 14:22 in Marathi 22 आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले. त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ राहावे म्हणून उत्तेजन दिले. ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
Acts 20:32 in Marathi 32 आणि आता मी तुम्हाला देवाच्या व वचनाच्या कृपेच्या अधीन करतो. जी तुमची वाढ करण्यासाठी समर्थ आहे, व सर्व पवित्र केलेल्यांमध्ये वतन द्यावयाला समर्थ आहे
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 5:9 in Marathi 9 मग, आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की, त्याच्या द्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ.
Romans 5:17 in Marathi 17 कारण मरणाने, एका अपराधामुळे, एकाच्या द्वारे राज्य केले, तर त्याहून अधिक हे आहे की, जे कृपेची व नीतिमत्वाच्या देणगीची विपुलता स्वीकारतात, ते त्या एकाच्या, म्हणजे येशू ख्रिस्ताच्या द्वारे जीवनात राज्य करतील.
Romans 8:3 in Marathi 3 कारण, देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्याला जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला, पापासाठी, पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली.
Romans 8:29 in Marathi 29 कारण त्याला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे.
1 Corinthians 2:9 in Marathi 9 परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही, आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
1 Corinthians 3:22 in Marathi 22 तर तो पौल,किंवा अपुल्लोस, किंवा केफा , जग, जीवन किंवा मरण असो, आताच्या गोष्टी असोत अथवा येणाऱ्या गोष्टी असोत,हे सर्व तुमचे आहे.
2 Corinthians 1:7 in Marathi 7 आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे; कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहा तसेच सांत्वनाचेहि भागीदार आहा.
2 Corinthians 4:8 in Marathi 8 आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात, पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही,आम्ही गोधळलेलो आहोत,पण निराश झालो नाही.
Galatians 3:29 in Marathi 29 आणि तुम्ही जर ख्रिस्ताचे आहा; तर अब्राहामाचे संतान आणि अभिवचनाप्रमाणे वारीस आहा.
Galatians 4:7 in Marathi 7 म्हणून तू आतापासून दास नाहीस, तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसहि आहेस.
Ephesians 3:6 in Marathi 6 हे रहस्य ते आहे की,येशू ख्रिस्तामध्ये सुवार्तेद्वारे परराष्ट्रीय हे यहूदी लोकांबरोबर वारसदार आणि ते एकाच शरीराचे अवयव आहेत. आणि अभिवचनाचे भागीदार आहेत.”
Philippians 1:29 in Marathi 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
2 Timothy 2:10 in Marathi 10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.
Titus 3:7 in Marathi 7 म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.
Hebrews 1:14 in Marathi 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
Hebrews 6:17 in Marathi 17 आपल्या योजनेचे कधीही न बदलणारे स्वरूप वचनाच्या वारसदारांना कळावे अशी देवाची इच्छा आहे. म्हणून त्याने वाहिलेल्या शपथेच्या द्वारे याबाबत हमी दिली.
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
1 Peter 1:4 in Marathi 4 आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे,
1 Peter 4:13 in Marathi 13 उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखांत भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लसित व्हावे.
Revelation 3:21 in Marathi 21 “ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन.
Revelation 21:7 in Marathi 7 जो विजय मिळवतो त्याला ह्या सर्व गोष्टी वारशान मिळवील; मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.