Romans 16:26 in Marathi 26 पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे,
Other Translations King James Version (KJV) But now is made manifest, and by the scriptures of the prophets, according to the commandment of the everlasting God, made known to all nations for the obedience of faith:
American Standard Version (ASV) but now is manifested, and by the scriptures of the prophets, according to the commandment of the eternal God, is made known unto all the nations unto obedience of faith:
Bible in Basic English (BBE) But is now made clear; and by the writings of the prophets, by the order of the eternal God, the knowledge of it has been given to all the nations, so that they may come under the rule of the faith;
Darby English Bible (DBY) but [which] has now been made manifest, and by prophetic scriptures, according to commandment of the eternal God, made known for obedience of faith to all the nations --
World English Bible (WEB) {See Romans 14:23}
Young's Literal Translation (YLT) and now having been made manifest, also, through prophetic writings, according to a command of the age-during God, having been made known to all the nations for obedience of faith --
Cross Reference Matthew 28:19 in Marathi 19 म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकास माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.
Mark 16:15 in Marathi 15 तो त्यांना म्हणाला, ‘संपूर्ण जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा.’
Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
Acts 6:7 in Marathi 7 मग देवाच्या वचनाचा प्रसार होत गेला; यरूशलेमेत शिष्यांची संख्या फार वाढत गेली;याजकवर्गातीलहि पुष्कळ लोकांनी ह्या विश्वासाला मान्यता दिली.
Acts 8:32 in Marathi 32 पवित्र शास्त्रातील जो भाग तो वाचत होता, तो भाग पुढीलप्रमाणे होताः “वधावयला नेत असलेल्या मेंढरासारखा तो होता. लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला. त्याने आपले तोंड उघडले नाही.
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Acts 26:17 in Marathi 17 ह्या लोकांपासून व परराष्ट्रीयांपासून मी तुझे रक्षण करीन.
Acts 26:22 in Marathi 22 परंतु देवाने मला मदत केली म्हणून मी आज येथे उभा राहून समाजातील लहानथोरांना साक्ष देत आहे. “जे काही पुढे होणार होते, त्याविषयी संदेष्ट्यांनी व मोशेने जे सांगितले त्यापेक्षा दुसरे मी सांगत नाही.”
Romans 1:2 in Marathi 2 त्याने तीच्याविषयी, आपल्या संदेष्ट्यांद्वारे, पवित्र शास्त्रलेखात, अगोदरच अभिवचन दिले होते;
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 1:20 in Marathi 20 कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकालचे सामर्थ्य व देवपण ह्या त्याच्या अदृष्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे.
Romans 15:4 in Marathi 4 कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
Romans 15:18 in Marathi 18 कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून, शब्दाने व कृतीने, चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने ,पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडविलेल्या गोष्टींशिवाय मी कोणत्याच गोष्टींविषयी सांगण्यास धजणार नाही. मी ह्यामुळे यरुशलेमपासून सभोवताली इल्लूरिकमपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे.
Galatians 3:8 in Marathi 8 आणि देव परराष्ट्रीयांना विश्वासाने नीतिमान ठरवणार ह्या पूर्वज्ञानामुळे शास्त्रलेखाने, अब्राहामाला पूर्वीच ही सुवार्ता सांगितली की, ‘तुझ्याकडून सर्व राष्ट्रांना आशीर्वाद मिळेल’.
Ephesians 1:9 in Marathi 9 देवाने ख्रिस्ताच्याठायी प्रदर्शित केलेल्या इच्छेप्रमाणे गुप्त सत्याची योजना आपणास कळवली आहे
Ephesians 2:20 in Marathi 20 “तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे या पायावर बांधलेली इमारत आहा, आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. “
Colossians 1:26 in Marathi 26 जे रहस्य युगानुयुग व पिढ्यान् पिढ्या गुप्त ठेवलेले होते, परंतु आता, त्याच्या पवित्र जनांना प्रकट झाले आहे, ते हे वचन आहे.
1 Timothy 1:17 in Marathi 17 आता सर्वकालचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
2 Timothy 1:10 in Marathi 10 पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
Titus 1:2 in Marathi 2 जे युगांनुयुगाचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने अनंतकाळापूर्वी देऊ केले, त्याविषयीचे वचन त्याच आपल्या तारणाऱ्या देवाच्या आज्ञेने मला सोपविलेल्या घोषणेत यथाकाळी त्याने प्रकट केले,
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
Hebrews 13:8 in Marathi 8 येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
1 John 5:20 in Marathi 20 पण आम्हाला माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हाला समजबुध्दी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्याला आम्ही ओळखावे. आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.
Revelation 1:8 in Marathi 8 प्रभू देव म्हणातो, “मी अल्फा आणि ओमेगा आहे. मी जो आहे, जो होतो आणि जो येत आहे. मी सर्वसमर्थ आहे. ”
Revelation 1:17 in Marathi 17 मी त्याला पाहिले, तेव्हा मी मेलेल्या सारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला,
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”