Romans 15:8 in Marathi 8 कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता, सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे, पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे,
Other Translations King James Version (KJV) Now I say that Jesus Christ was a minister of the circumcision for the truth of God, to confirm the promises made unto the fathers:
American Standard Version (ASV) For I say that Christ hath been made a minister of the circumcision for the truth of God, that he might confirm the promises `given' unto the fathers,
Bible in Basic English (BBE) Now I say that Christ has been made a servant of the circumcision to give effect to the undertakings given by God to the fathers,
Darby English Bible (DBY) For I say that Jesus Christ became a minister of [the] circumcision for [the] truth of God, to confirm the promises of the fathers;
World English Bible (WEB) Now I say that Christ has been made a minister of the circumcision for the truth of God, that he might confirm the promises given to the fathers,
Young's Literal Translation (YLT) And I say Jesus Christ to have become a ministrant of circumcision for the truth of God, to confirm the promises to the fathers,
Cross Reference Matthew 15:24 in Marathi 24 पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेढरांकडे पाठवले आहे.”
Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Luke 1:54 in Marathi 54 आपल्या पूर्वजास त्याने सांगीतल्या प्रमाणे अब्राहाम व त्याचे संतान ह्यांच्यावरील दया सर्वकाळ स्मरूण
Luke 1:70 in Marathi 70 हे देवाने त्याच्या पवित्र संदेष्ट्यांव्दारे फार पूर्वीच सांगितले होते.
John 1:11 in Marathi 11 जे त्याचे स्वतःचे त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही.
John 10:16 in Marathi 16 ह्या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत;तीहि मला आणली पाहिजेत, आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
Acts 3:25 in Marathi 25 तुम्ही भविष्यवाद्यांचे मुले आहा, आणि तुझ्या संततीव्दारे पृथ्वीतील सर्व कुटुंबे आशीर्वादित होतील, असे अब्राहामाशी बोलून देवाने तुमच्या पूर्वजांशी जो करार केला, त्या कराराची तुम्ही मुले आहा.
Acts 13:46 in Marathi 46 पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले. ते म्हणाले. “देवाचा संदेश तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हाला सांगितलाच पाहिजे. पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात. तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात. व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील यहूदीतर लोकांकडे जाऊ!
Romans 3:3 in Marathi 3 पण काहींनी विश्वास ठेवला नाही, म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय?
Romans 3:26 in Marathi 26 त्याने ह्या आताच्या काळात आपले नीतिमत्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्याला नीतिमान ठरविणारा व्हावे.
Romans 4:16 in Marathi 16 आणि म्हणून हे वचन विश्वासाद्वारे म्हणजे कृपेने दिलेले आहे; ते ह्यासाठी की, नियमशास्त्रामुळे जे आहेत त्यांनाच ते असावे असे नाही. पण अब्राहामाच्या विश्वासामुळे जे आहेत त्यांनाही, म्हणजे सर्व संतानाला ते खात्रीने असावे. तो आपल्या सर्वांचा पिता आहे.
Romans 9:4 in Marathi 4 ते इस्राएली आहेत; त्यांच्यासाठी दत्तकपण, गौरव आणि करार, नियमशास्त्र, उपासना आणि वचने आहेत.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 11:22 in Marathi 22 तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाहीतर, तूही छाटला जाशील.
Romans 11:30 in Marathi 30 कारण ज्याप्रमाणे, पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता, पण आता त्यांच्या आज्ञाभांगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे,
Romans 15:16 in Marathi 16 ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
1 Corinthians 1:12 in Marathi 12 माझे म्हणणे असे आहे की तुमच्यातील प्रत्येक जण म्हणतो, “मी पौलाचा आहे.” “मी अपुल्लोचा आहे,” “मी केफाचा आहे,” “मी ख्रिस्ताचा आहे.”
1 Corinthians 10:19 in Marathi 19 तर मी काय म्हणतो? माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे का की मूर्तीला वाहिलेले अन्न काहीतरी आहे किंवा ती मूर्ती काहीतरी आहे?
1 Corinthians 10:29 in Marathi 29 आणि जेव्हा मी “विवेक” म्हणतो तो स्वतःचा असे मी म्हणत नाही तर इतरांचा. आणि हेच फक्त एक कारण आहे. कारण माझ्या स्वातंत्र्याचा इतरांच्या सद्सद्विवेकबुध्दीने न्याय का व्हावा?
1 Corinthians 15:50 in Marathi 50 आता बंधूंनो व बहिणींनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही.
2 Corinthians 1:20 in Marathi 20 कारण देवाची सर्व वचने त्याच्यात ‘होय’ अशी आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे ‘आमेन’ म्हणतो.
Galatians 4:4 in Marathi 4 पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला,
Ephesians 2:12 in Marathi 12 त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे केलेले होता, इस्राएलातून तुम्हाला परके केलेले, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाहीन आणि देवाशिवाय या जगात होता.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.