Romans 15:18 in Marathi 18 कारण परराष्ट्रीयांना आज्ञांकित करावे म्हणून, ख्रिस्ताने माझ्याकडून, शब्दाने व कृतीने, चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने ,पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने घडविलेल्या गोष्टींशिवाय मी कोणत्याच गोष्टींविषयी सांगण्यास धजणार नाही. मी ह्यामुळे यरुशलेमपासून सभोवताली इल्लूरिकमपर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे.
Other Translations King James Version (KJV) For I will not dare to speak of any of those things which Christ hath not wrought by me, to make the Gentiles obedient, by word and deed,
American Standard Version (ASV) For I will not dare to speak of any things save those which Christ wrought through me, for the obedience of the Gentiles, by word and deed,
Bible in Basic English (BBE) And I will keep myself from talking of anything but those things which Christ has done by me to put the Gentiles under his rule in word and in act,
Darby English Bible (DBY) For I will not dare to speak anything of the things which Christ has not wrought by me, for [the] obedience of [the] nations, by word and deed,
World English Bible (WEB) For I will not dare to speak of any things except those which Christ worked through me, for the obedience of the Gentiles, by word and deed,
Young's Literal Translation (YLT) for I will not dare to speak anything of the things that Christ did not work through me, to obedience of nations, by word and deed,
Cross Reference Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
Mark 16:20 in Marathi 20 शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले, व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
Acts 14:27 in Marathi 27 ते जेव्हा तेथे पोहोचले, तेव्हा त्यांनी मंडळीला एकत्र बोलावले आणि देवाने त्यांच्याबाबतीत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या त्यांना सांगितल्या तसेच दुसऱ्या देशातील यहूदीतर लोकांमध्ये देवाने विश्वासाचे दार कसे उघडले ते सांगितले,
Acts 15:4 in Marathi 4 नंतर ते येरूशलेमेस पोहचल्यावर तेथील मंडळी, प्रेषीत व वडील वर्ग ह्यांनी त्यांचे आगतस्वागत केले. तेव्हा आपण देवाच्या सहवासांत असतांना त्याने जे जे घडविले ते त्यांनी सांगितले.
Acts 15:12 in Marathi 12 तेव्हा सर्व लोक गप्प राहीले, आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या व्दारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अदभूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.
Acts 21:19 in Marathi 19 पौल त्यांना भेटला. नंतर त्याच्या हातून देवाने यहूदीतर लोकांत कशीकशी सेवा करून घेतली, याविषयी क्रमवार सविस्तर माहिती सांगितली.
Acts 26:20 in Marathi 20 उलट पहिल्यांदा दिमिष्कातील आणि नंतर यरूशलेमातील, यहूदा प्रांतातील सर्व आणि यहूदीतर विदेशी लोकांनासुध्दा प्रभूच्या वचनाची साक्ष दिली. त्यांनी पश्चात्ताप करावा, देवाकडे वळावे आणि पश्चात्तापाला साजेल अशी कामे करावी असे मी त्यांना सांगितले.
Romans 1:5 in Marathi 5 त्याच्या द्वारे आम्हाला कृपा व प्रेषितपद ही मिळाली आहेत, ह्यासाठी की, सर्व राष्ट्रांत, त्याच्या नावाकरता, विश्वासाचे आज्ञापालन केले जावे.
Romans 6:17 in Marathi 17 पण देवाला धन्यवाद, कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला, त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्यात,
Romans 16:26 in Marathi 26 पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हाला स्थिर करण्यास समर्थ आहे,
1 Corinthians 3:6 in Marathi 6 मी बी लावले, अपुल्लोसाने त्याला पाणी घातले, पण देवाने त्याची वाढ केली.
2 Corinthians 3:1 in Marathi 1 आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहो काय? किंवा आम्हाला, दुसर्यांप्रमाणे, तुमच्याकरता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय?
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 10:4 in Marathi 4 कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत_ चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
2 Corinthians 10:13 in Marathi 13 आम्ही आमच्या मर्यादेबाहेर अभिमान मिरवणार नाही; तर देवाने आम्हाला लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू, ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोहोचली आहे.
2 Corinthians 11:31 in Marathi 31 देव आणि प्रभू येशूचा पिता, ज्याची अनंतकाळपर्यंत स्तुती केली पाहिजे, तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही.
2 Corinthians 12:6 in Marathi 6 कारण आपण अभिमान मिरवावा अशी जरी मी इच्छा धरली, तरी मी मूढ होणार नाही, कारण मी जे खरे ते बोलेन; पण मी स्वतःस आवरले पाहिजे. म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये.
Galatians 2:8 in Marathi 8 कारण ज्याने पेत्राच्याद्वारे सुंता झालेल्या लोकांत प्रेषितपणा चालवावयास शक्ती पुरवली त्याने मलाहि परराष्ट्रीयात तो चालवण्यास शक्ती पुरवली.
Colossians 3:17 in Marathi 17 आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल,ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्या द्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
2 Thessalonians 2:17 in Marathi 17 तुमच्या मनाचे सांत्वन करो, आणि प्रत्येक चांगल्या कृतीत व गोष्टीत तुम्हास स्थिर करो.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 11:8 in Marathi 8 विश्वासाने, अब्राहामाने, त्याला जे ठिकाण वतन मिळणार होते तिकडे जाण्यास त्याला बोलवण्यात आले तेव्हा आज्ञा मानली. तो कोठे जाणार होता हे त्याला माहीत नसताना तो निघाला.
James 1:22 in Marathi 22 वचनाप्रमाणे आचरण करणारे असा, व फक्त ऐकूच नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.
1 John 3:18 in Marathi 18 प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जिभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
Jude 1:9 in Marathi 9 परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्या ऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला.