Romans 12:8 in Marathi 8 किंवा बोध करतो त्याने बोध करण्यात तत्पर रहावे; जो दान देतो त्याने औदार्याने द्यावे; जो कारभार चालवतो त्याने तत्परतेने कारभार चालवावा, जो दया करतो त्याने संतोषाने दया करावी.
Other Translations King James Version (KJV) Or he that exhorteth, on exhortation: he that giveth, let him do it with simplicity; he that ruleth, with diligence; he that sheweth mercy, with cheerfulness.
American Standard Version (ASV) or he that exhorteth, to his exhorting: he that giveth, `let him do it' with liberality; he that ruleth, with diligence; he that showeth mercy, with cheerfulness.
Bible in Basic English (BBE) He who has the power of comforting, let him do so; he who gives, let him give freely; he who has the power of ruling, let him do it with a serious mind; he who has mercy on others, let it be with joy.
Darby English Bible (DBY) or he that exhorts, in exhortation; he that gives, in simplicity; he that leads, with diligence; he that shews mercy, with cheerfulness.
World English Bible (WEB) or he who exhorts, to his exhorting: he who gives, let him do it with liberality; he who rules, with diligence; he who shows mercy, with cheerfulness.
Young's Literal Translation (YLT) or he who is exhorting -- `In the exhortation!' he who is sharing -- `In simplicity!' he who is leading -- `In diligence?' he who is doing kindness -- `In cheerfulness.'
Cross Reference Matthew 6:2 in Marathi 2 म्हणून जेव्हा जेव्हा तू दानधर्म करतोस तेव्हा तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हाला खचीत सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे.
Matthew 25:40 in Marathi 40 “मग राजा त्यांना उत्तर देईल, ‘मी तुम्हाला खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
Luke 21:1 in Marathi 1 येशूने दृष्टि वर करून श्रीमंत लोकांना दानपेटीत दान टाकताना पाहीले.
Acts 2:44 in Marathi 44 तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते, आणि त्यांचे सर्व काही समाईक होते,
Acts 4:33 in Marathi 33 आणि प्रेषित मोठ्या सामर्थ्याने .प्रभू येशूच्या पुनरूत्थानाविषयी साक्ष देत होते; आणि त्या सर्वावर मोठी कृपा होती
Acts 11:28 in Marathi 28 यांच्यापैकी एकाचे नाव अगब होते. अंत्युखियात तो उभा राहिला आणि बोलू लागला. पवित्र आत्म्याच्या साहाय्याने तो म्हणाला, “फार वाईट काळ सर्व पृथ्वीवर येत आहे. लोकांना खायला अन्न मिळणार नाही.” (क्लौदिया राजा राज्य करीत होता तेव्हा त्याच्या काळात हे घडले.)
Acts 13:12 in Marathi 12 तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला. प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.
Acts 13:15 in Marathi 15 तेव्हा नियमशास्त्र आणि संदेष्टयांच्या लेखाचे वाचन झाल्यावर सभास्थानच्या अधिकाऱ्यांनी पौल व बर्णबाला निरोप पाठविलाः “बंधूनो, येथील लोकांना काही मदत होईल असे काही बोधवचन सांगा.
Acts 15:32 in Marathi 32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनाना बोध केला व स्थिरावले .
Acts 20:2 in Marathi 2 मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला. मग पौल ग्रीसला आला
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Romans 12:13 in Marathi 13 पवित्र जनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
Romans 13:6 in Marathi 6 ह्या कारणास्तव तुम्ही करही देता. कारण ह्याच गोष्टींत ठाम राहणारे ते देवाचे सेवक आहेत.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 14:3 in Marathi 3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती,व सांत्वन याविषयी बोलतो,
2 Corinthians 1:12 in Marathi 12 आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण,म्हणजे आमच्या सद्सद्विवेकबुध्दीची साक्ष होय.आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रतेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो.
2 Corinthians 8:1 in Marathi 1 बंधूनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो.
2 Corinthians 8:12 in Marathi 12 कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.
2 Corinthians 9:7 in Marathi 7 प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण ' संतोषाने देणारा देवाला ' प्रिय असतो.
2 Corinthians 9:11 in Marathi 11 म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकार स्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल.
2 Corinthians 9:13 in Marathi 13 ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
Ephesians 6:5 in Marathi 5 दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने,व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
Colossians 3:22 in Marathi 22 दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. माणसांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा.
1 Thessalonians 2:3 in Marathi 3 कारण आमचा बोध फसवण्याने, अथवा अशुध्दपणा ह्यांतून निर्माण झालेला नसून कपटाचा नव्हता;
1 Thessalonians 2:8 in Marathi 8 आम्हास तुमच्याविषयी कळकळ वाटत असल्यामुळे आम्ही तुम्हाला केवळ देवाच्या सुवार्तेचे दानच देण्यास नव्हे, तर तुम्हावरील आमच्या अत्यंत प्रीतीमुळे तुम्हाकरीता आपला जीवही देण्यास तयार होतो.
1 Thessalonians 5:12 in Marathi 12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
1 Timothy 3:4 in Marathi 4 आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा.
1 Timothy 4:13 in Marathi 13 मी येई पर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, ह्याकडे लक्ष्य लाव .
1 Timothy 5:17 in Marathi 17 जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे,
Hebrews 10:25 in Marathi 25 आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा, आणि तो दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन दयावे.
Hebrews 13:7 in Marathi 7 ज्यांनी तुम्हाला देवाचे वचन दिले त्या पुढाऱ्यांची आठवण ठेवा. त्यांच्या जीवनातील आचार पाहा. व त्यांच्या विश्वासाचे अनुकरण करा.
Hebrews 13:17 in Marathi 17 आपल्या अधीकाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दुःखाने न करता आनंदाने करावे.
Hebrews 13:22 in Marathi 22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हाला करतो.
Hebrews 13:24 in Marathi 24 तुमच्या सर्व पुढाऱ्यांना व देवाच्या सर्व पवित्रजणांना सलाम सांगा, इटली येथील सर्वजण तुम्हाला सलाम सांगतात.
1 Peter 4:9 in Marathi 9 काही कुरकुर न करता तुम्ही सर्व जण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा.
1 Peter 5:2 in Marathi 2 तुमच्यामधील, देवाच्या कळपाचे पालन करा; भाग पडते म्हणून नाही, पण देवाला आवडेल असे, स्वेच्छेने; द्रव्यलोभासाठी नाही, पण उत्सुकतेने; करा