Romans 12:6 in Marathi 6 पण, आपल्याला पुरविलेल्या कृपेप्रमाणे आपल्याला वेगवेगळी कृपादाने आहेत; जर ते संदेश देणे असेल तर विश्वासाच्या परिमाणानुसार आपण संदेश द्यावेत;
Other Translations King James Version (KJV) Having then gifts differing according to the grace that is given to us, whether prophecy, let us prophesy according to the proportion of faith;
American Standard Version (ASV) And having gifts differing according to the grace that was given to us, whether prophecy, `let us prophesy' according to the proportion of our faith;
Bible in Basic English (BBE) And having different qualities by reason of the grace given to us, such as the quality of a prophet, let it be made use of in relation to the measure of our faith;
Darby English Bible (DBY) But having different gifts, according to the grace which has been given to us, whether [it be] prophecy, [let us prophesy] according to the proportion of faith;
World English Bible (WEB) Having gifts differing according to the grace that was given to us, if prophecy, let us prophesy according to the proportion of our faith;
Young's Literal Translation (YLT) And having gifts, different according to the grace that was given to us; whether prophecy -- `According to the proportion of faith!'
Cross Reference Matthew 23:34 in Marathi 34 मी तुम्हाला सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल. आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल.
Luke 11:49 in Marathi 49 यामुळे देवाचे ज्ञानसुध्दा असे म्हणाले, “मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’
Acts 2:17 in Marathi 17 देव म्हणतो, शेवटल्या दिवसात 'असे होईल की, मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन; तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरूणांस दृष्टांन्त होतील, व तुमच्या वृध्दास स्वप्ने पडतील;
Acts 11:27 in Marathi 27 याच काळात काही संदेष्टे यरूशलेमहून अंत्युखियास आले.
Acts 13:1 in Marathi 1 अंत्युखिया येथील ख्रिस्ती मंडळीत काही संदेष्टे व शिक्षक होते. ते पुढीलप्रमाणेः बर्णबा, शिमोन निग्र, लूक्य कुरेनेकर, मनाएन (जो हेरोदाबरोबर लहानाचा मोठा झाला होता), आणि शौल.
Acts 15:32 in Marathi 32 यहुदा व सीला हे स्वतः संदेष्टे होते, म्हणून त्यांनी पुष्कळ बोलून बंधुजनाना बोध केला व स्थिरावले .
Acts 18:24 in Marathi 24 अपुल्लो नावाचा एक यहूदी होता. तो आलेक्सांद्र येथे जन्मला होता. तो उच्च शिक्षित होता. तो इफिस येथे आला. त्याला पवित्र शास्त्राचे सखोल ज्ञान होते.
Acts 21:9 in Marathi 9 त्याला चार मुली होत्या. त्यांची लग्ने झालेली नव्हती. या मुलींना देवाच्या गोष्टी (भविष्याविषयीचे) सांगण्याचे दान होते
Romans 1:11 in Marathi 11 कारण तुम्ही स्थिर व्हावे म्हणून तुम्हाला काही आध्यात्मिक कृपादान दयावे हयासाठी मी तुम्हाला भेटण्यास उत्कंठित आहे;
Romans 12:3 in Marathi 3 कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
1 Corinthians 1:5 in Marathi 5 त्याने तुम्हाला प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात समृद्ध केले आहे.
1 Corinthians 4:6 in Marathi 6 आता, बंधूनो , तुमच्यासाठी मी या गोष्टी माझ्याकरीता व अपुल्लोसाकरीता उदाहरणाने लागू केल्या आहेत. यासाठी की, शास्त्रलेखापलीकडे कोणी स्वतःला न मानावे हा धडा तुम्ही आम्हापासून शिकावा म्हणजे तुम्हापैकी कोणीही गर्वाने फुगून जाऊ नये म्हणजे एखाद्याला चांगली वागणूक देऊन दुसऱ्याला विरोध करू नये.
1 Corinthians 7:7 in Marathi 7 माझी इच्छा अशी आहे की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
1 Corinthians 12:4 in Marathi 4 आता कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, पण आत्मा एकच आहे.
1 Corinthians 12:28 in Marathi 28 आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहायक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारेअसे नेमले आहेत.
1 Corinthians 13:2 in Marathi 2 आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले, आणि, मला डोंगर ढळवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला, पण माझ्या ठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.
1 Corinthians 14:1 in Marathi 1 प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या. आणि आध्यात्मिक दानांची विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
1 Corinthians 14:3 in Marathi 3 परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती,व सांत्वन याविषयी बोलतो,
1 Corinthians 14:24 in Marathi 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
1 Corinthians 14:29 in Marathi 29 दोघा किंवा तिघांनी संदेश द्यावा व इतरांनीही ते काय बोलतात याची परीक्षा करावी.
1 Corinthians 14:31 in Marathi 31 जर तुम्हा सर्वांना संदेश देता येत असेल, तर एका वेळी एकानेच बोलावे, यासाठी की सर्वजण शिकतील, सर्वांना बोधपर मार्गदर्शन मिळेल.
2 Corinthians 8:12 in Marathi 12 कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.
Ephesians 3:5 in Marathi 5 ते रहस्य जसे आता आत्म्याच्या द्वारे त्याच्या पवित्र प्रेषितांना आणि संदेश देणाऱ्यांना प्रकट करण्यात आले आहे,तसे ते इतर पिढ्यांच्या मनुष्य संतानांना सांगण्यात आले नव्हते.
Ephesians 4:11 in Marathi 11 आणि ख्रिस्ताने स्वतःच काही लोकांना प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक,पाळक, आणि शिक्षक असे दाने दिली.
Philippians 3:15 in Marathi 15 तर जेवढे आपण प्रौढ आहोत, तेवढ्यांनी हीच चित्तवृति ठेवावी आणि तुम्ही एखाद्या गोष्टीविषयी निराळी चित्तवृति ठेवली, तरी देव तेही तुम्हाला प्रकट करील.
1 Thessalonians 5:20 in Marathi 20 संदेशांचा उपहास करू नका.
1 Peter 4:10 in Marathi 10 तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी ह्या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.