Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
Other Translations King James Version (KJV) And be not conformed to this world: but be ye transformed by the renewing of your mind, that ye may prove what is that good, and acceptable, and perfect, will of God.
American Standard Version (ASV) And be not fashioned according to this world: but be ye transformed by the renewing of your mind, and ye may prove what is the good and acceptable and perfect will of God.
Bible in Basic English (BBE) And let not your behaviour be like that of this world, but be changed and made new in mind, so that by experience you may have knowledge of the good and pleasing and complete purpose of God.
Darby English Bible (DBY) And be not conformed to this world, but be transformed by the renewing of [your] mind, that ye may prove what [is] the good and acceptable and perfect will of God.
World English Bible (WEB) Don't be conformed to this world, but be transformed by the renewing of your mind, so that you may prove what is the good, well-pleasing, and perfect will of God.
Young's Literal Translation (YLT) and be not conformed to this age, but be transformed by the renewing of your mind, for your proving what `is' the will of God -- the good, and acceptable, and perfect.
Cross Reference John 7:7 in Marathi 7 जगाने तुमचा व्देष करवा हे शक्य नाही; पण ते माझा व्देष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत.
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 15:19 in Marathi 19 जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हाला जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा व्देष करते.
John 17:14 in Marathi 14 मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेहि जगाचे नाहीत.
Romans 7:12 in Marathi 12 म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
Romans 7:14 in Marathi 14 कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आध्यात्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे.
Romans 7:22 in Marathi 22 कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो;
Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Romans 13:14 in Marathi 14 तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.
1 Corinthians 3:19 in Marathi 19 कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे. कारण असे लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.”
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 5:17 in Marathi 17 म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
2 Corinthians 6:14 in Marathi 14 विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?
Galatians 1:4 in Marathi 4 आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे, ह्या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, आपल्या पापांबद्दल, स्वतःचे दान केले.
Galatians 5:22 in Marathi 22 आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळ ही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा,
Ephesians 1:18 in Marathi 18 म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हाला हे समजावे की, त्याच्या पाचारणाची आशा काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र जनांत किती आहे,
Ephesians 2:2 in Marathi 2 “ज्यामध्ये तुम्ही पूर्वी या जगाच्या चालिरीतीप्रमाणे चालत व रहात होता, आकाशातील राज्याचा अधिकारी जो सैतान, आज्ञा मोडणाऱ्या पुत्रांच्या आत्म्यात कार्य करणाऱ्या अधिपती प्रमाणे चालत होता. . “
Ephesians 4:17 in Marathi 17 म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका.
Ephesians 4:22 in Marathi 22 तुमचा जुना मनुष्य त्याला काढून टाकावा तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे,
Ephesians 5:9 in Marathi 9 कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्व, आणि सत्यात दिसून येतात.
Ephesians 5:17 in Marathi 17 म्हणून मूर्खासारखे वागू नका, तर उलट देवाची इच्छा काय आहे ते समजून घ्या.
Colossians 1:21 in Marathi 21 आणि तुम्ही जे एकदा परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता,
Colossians 3:10 in Marathi 10 आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे,त्याला तुम्ही परिधान केले आहे.
Colossians 4:12 in Marathi 12 ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हाला सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनामध्यें सर्वदा तुम्हांसाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे राहावे.
1 Thessalonians 4:3 in Marathi 3 कारण देवाची इच्छा ही आहे की,तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दुर राहावे
2 Timothy 3:16 in Marathi 16 प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
Titus 3:5 in Marathi 5 तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नवीकरणाने तारले.
James 1:27 in Marathi 27 अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो, व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुध्द व निर्दोष ठरते.
James 4:4 in Marathi 4 हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
1 Peter 1:18 in Marathi 18 कारण तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
1 Peter 4:2 in Marathi 2 म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे.
2 Peter 1:4 in Marathi 4 त्यांच्या योगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत;ह्यासाठी की,त्यांच्या द्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे भागीदार व्हावे.
2 Peter 2:20 in Marathi 20 कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते.
1 John 2:15 in Marathi 15 जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
1 John 3:13 in Marathi 13 बंधूनो, जर जग तुमचा व्देष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका.
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Revelation 13:8 in Marathi 8 आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्व जण त्या पशूला नमन करतील.