Romans 12:16 in Marathi 16 एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका.
Other Translations King James Version (KJV) Be of the same mind one toward another. Mind not high things, but condescend to men of low estate. Be not wise in your own conceits.
American Standard Version (ASV) Be of the same mind one toward another. Set not your mind on high things, but condescend to things that are lowly. Be not wise in your own conceits.
Bible in Basic English (BBE) Be in harmony with one another. Do not have a high opinion of yourselves, but be in agreement with common people. Do not give yourselves an air of wisdom.
Darby English Bible (DBY) Have the same respect one for another, not minding high things, but going along with the lowly: be not wise in your own eyes:
World English Bible (WEB) Be of the same mind one toward another. Don't set your mind on high things, but associate with the humble. Don't be wise in your own conceits.
Young's Literal Translation (YLT) of the same mind one toward another, not minding the high things, but with the lowly going along; become not wise in your own conceit;
Cross Reference Matthew 6:25 in Marathi 25 “म्हणून मी तुम्हाला सांगतो की, काय खावे आणि काय प्यावे अशी आपल्या जीवाविषयी, किंवा काय पांघरावे अशी आपल्या शरीराविषयी चिंता करू नका. जीव अन्नापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे आणि शरीर वस्त्रांपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे.
Matthew 11:5 in Marathi 5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Matthew 18:1 in Marathi 1 त्या वेळेस शिष्य येशूकडे आले आणि त्यांनी विचारले, “स्वर्गाच्या राज्यात सर्वात महान कोण?”
Matthew 20:21 in Marathi 21 त्याने तिला विचारले, “तुला काय पाहिजे?”ती म्हणाली, “माझा एक मुलगा तुमच्या राज्यात तुमच्या उजवीकडे बसेल आणि दुसरा डावीकडे बसेल असे वचन द्या.”
Matthew 26:11 in Marathi 11 गरीब लोक तुमच्याबरोबर नेहमीच असतील पण मी तुमच्याबरोबर नेहमी असणार नाही.
Luke 4:6 in Marathi 6 सैतान त्याला म्हणाला, मी तुला या सर्व राज्याचे अधिकार व गौरव देईन कारण ते मला दिलेले आहे. आणि मी माझ्या मर्जीनुसार ते देऊ शकतो.
Luke 6:20 in Marathi 20 मग येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले व म्हणाला,'अहो दीनांनो तुम्ही आशीर्वादित आहात कारण देवाचे राज्य तुमचे आहे.
Luke 14:13 in Marathi 13 पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे.
Luke 22:24 in Marathi 24 तसेच , त्यांच्यामध्ये अशासंबंधी वाद निर्माण झाला की, त्यांच्यामध्ये सर्वांत मोठा कोण आहे.
Acts 4:32 in Marathi 32 तेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांचा समुदाय एक मनाचा व एकजिवाचा होता, आणि कोणीही आपल्या मालमत्तेतील काही आपले स्वतःचे आहे असे म्हणत नसे, तर त्यांचे सर्व पदार्थ समाईक होते.
Romans 6:2 in Marathi 2 कधीच नाही!आपण जे पापाला मेलोत, ते त्यात ह्यापुढे, कसे राहणार?
Romans 11:25 in Marathi 25 बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही ह्या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
Romans 12:3 in Marathi 3 कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
Romans 15:5 in Marathi 5 आता, जो धीर व उत्तेजन देतो, तो देव तुम्हाला असे देवो की, तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे;
1 Corinthians 1:10 in Marathi 10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
1 Corinthians 3:18 in Marathi 18 कोणीही स्वतःला फसवू नये. जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टिने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे.
1 Corinthians 4:10 in Marathi 10 आम्ही ख्रिस्तासाठी मूर्ख, तर तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आहात! आम्ही अशक्त आहोत, पण तुम्ही बलवान आहात! तुम्ही आदरणीय आहात, पण आम्ही तुच्छ आहोत!
1 Corinthians 6:5 in Marathi 5 तुम्हास लाज वाटावी म्हणून मी असे म्हणतो, ज्याला भावाभावांचा न्यायनिवाडा करता येईल, असा एकही शहाणा मनुष्य तुमच्यात नाही काय?
1 Corinthians 8:2 in Marathi 2 आपण एखादी गोष्ट जाणतो असे कोणाला वाटत असेल, तर ती जशी समजली पाहिजे तशी अजून तो जाणत नाही.
2 Corinthians 13:11 in Marathi 11 शेवटी, बंधूंनो आणि बहीणींनो, आनंद करा!तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा; आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील.
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 2:2 in Marathi 2 तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा.अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा.
Philippians 3:16 in Marathi 16 तथापि आपण ज्या विचाराने येथवर मजल मारली तिच्याप्रमाणे पुढे चालावे.
Philippians 4:2 in Marathi 2 मी युवदियेला विनंती करतो, आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायीं एकमनाचे व्हा.
Philippians 4:11 in Marathi 11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही,कारण, मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे.
1 Timothy 6:6 in Marathi 6 वास्तविक पाहता संतोषाने देवाची सेवा करीत असताना मिळणारे समाधान हा फार मोठा लाभ आहे.
Hebrews 13:5 in Marathi 5 आपले जीवन पैशाच्या लोभापासून दूर ठेवा व तुमच्याकडे जे आहे त्यातच समाधान माना. कारण देवाने असे म्हटले आहे. “मी कधीही तुला सोडणार नाही, मी कधीही तुला त्यागणार नाही”
James 2:5 in Marathi 5 माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास, आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही?
James 3:13 in Marathi 13 तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी.
1 Peter 3:8 in Marathi 8 शेवटी सर्व जण एकमनाचे व्हा; आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
1 Peter 5:3 in Marathi 3 आणि, वतनावर धनीपण चालवून नाही, पण कळपाला उदाहरणे होऊन त्याचे पालन करा.
3 John 1:9 in Marathi 9 मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही.
Revelation 13:7 in Marathi 7 आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास, आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली आणि त्याला प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणार्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.