Romans 12:1 in Marathi 1 म्हणून,बंधूंनो देवाची दया स्मरून, मी तुम्हाला विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय ’यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
Other Translations King James Version (KJV) I beseech you therefore, brethren, by the mercies of God, that ye present your bodies a living sacrifice, holy, acceptable unto God, which is your reasonable service.
American Standard Version (ASV) I beseech you therefore, brethren, by the mercies of God, to present your bodies a living sacrifice, holy, acceptable to God, `which is' your spiritual service.
Bible in Basic English (BBE) For this reason I make request to you, brothers, by the mercies of God, that you will give your bodies as a living offering, holy, pleasing to God, which is the worship it is right for you to give him.
Darby English Bible (DBY) I beseech you therefore, brethren, by the compassions of God, to present your bodies a living sacrifice, holy, acceptable to God, [which is] your intelligent service.
World English Bible (WEB) Therefore I urge you, brothers, by the mercies of God, to present your bodies a living sacrifice, holy, acceptable to God, which is your spiritual service.
Young's Literal Translation (YLT) I call upon you, therefore, brethren, through the compassions of God, to present your bodies a sacrifice -- living, sanctified, acceptable to God -- your intelligent service;
Cross Reference Luke 7:47 in Marathi 47 या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.
Romans 2:4 in Marathi 4 किंवा देवाची दयेची तुला पश्चातापाकडे नेत आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय?
Romans 6:13 in Marathi 13 आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मेलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा, आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.
Romans 6:16 in Marathi 16 तुम्ही ज्याला आपल्या स्वतःला दास म्हणून आज्ञा पाळण्यास समर्पण करता, तुम्ही ज्याच्या आज्ञा पाळता त्याचे तुम्ही दास आहा. ते मरणासाठी पापाचे किंवा नीतिमत्वासाठी आज्ञापालनाचे, हे तुम्ही जाणत नाही काय?
Romans 6:19 in Marathi 19 मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो. कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.
Romans 9:23 in Marathi 23 आणि, गौरवासाठी आधी योजलेल्या दयेच्या पात्रांवर आपल्या गौरवाच धन प्रकट करावे म्हणून त्याने असे केले तर काय?
Romans 11:30 in Marathi 30 कारण ज्याप्रमाणे, पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता, पण आता त्यांच्या आज्ञाभांगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे,
Romans 12:2 in Marathi 2 आणि ह्या जगाशी समरूप होऊ नका, पण तुमच्या मनाच्या नवीकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची, उत्तम व त्याला संतोष देणारी, परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
Romans 15:16 in Marathi 16 ती कृपा ह्यासाठी आहे की, तिच्या योगे, मी परराष्ट्रीयांसाठी देवाच्या सुवार्तेचे याजकपण करणारा, येशू ख्रिस्ताचा सेवक व्हावे; म्हणजे, परराष्ट्रीय हे अर्पण पवित्र आत्म्याकडून पवित्र केले जाऊन मान्य व्हावे.
Romans 15:30 in Marathi 30 पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरता व आत्म्याच्या प्रीतीकरता, बंधूंनो, तुम्हाला विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा;
1 Corinthians 1:10 in Marathi 10 तर आता, बंधूनो, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये मी तुम्हास विनंति करतो की, तुम्ही सर्वांनी एकमेकांशी सारख्या मनाने एकत्र व्हावे आणि तुमच्यात मतभेद असू नयेत, तर तुम्ही एकाच हेतूने परिपूर्ण व्हावे.
1 Corinthians 5:7 in Marathi 7 म्हणून तुम्ही जुने खमीर काढून टाका, यासाठी की, जसे तुम्ही बेखमीर झाला आहा तसे तुम्ही एक नवीन गोळा व्हावे; कारण आपला वल्हांडणाचा कोकरा जो ख्रिस्त त्याचे अर्पण झाले आहे.
1 Corinthians 6:13 in Marathi 13 '' अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे”; पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण जारकर्मासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे, आणि शरीरासाठी प्रभू आहे .
2 Corinthians 4:1 in Marathi 1 म्हणून, आमच्यावर दया झाल्यामुळे, ही सेवा आम्हाला देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही.
2 Corinthians 4:16 in Marathi 16 म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे.
2 Corinthians 5:14 in Marathi 14 कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरते. कारण आम्ही असे मानतो की, एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले,
2 Corinthians 5:20 in Marathi 20 तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हाला आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हाला विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा.
2 Corinthians 6:1 in Marathi 1 म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्हीदेखील तुम्हाला अशी विनंती करतो की,तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका.
2 Corinthians 10:1 in Marathi 1 पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हाला ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
Ephesians 2:4 in Marathi 4 “पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.”
Ephesians 4:1 in Marathi 1 “म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हाला विनंती करतो, देवाकडून तुम्हाला जे पाचारण झालेले आहे, त्याला शोभेल असे राहा. “
Ephesians 5:10 in Marathi 10 प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
Philippians 1:20 in Marathi 20 कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराव्दारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
Philippians 2:1 in Marathi 1 ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता,काही कळवळा व करूणा ही जर आहेत,
Philippians 2:17 in Marathi 17 तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
Philippians 4:18 in Marathi 18 पण माझ्याजवळ सर्व काही आहे आणि विपुल आहे, आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे.
1 Thessalonians 4:1 in Marathi 1 बंधूनो, शेवटी आम्ही तुम्हास विनंती करतो व प्रभू येशूमध्ये बोध करतो की, कसे वागून देवाला संतोषवावे हे तुम्ही आम्हापासून एेकून घेतले व त्याप्रमाणे वागत आहा, त्यांत तुमची अधिकाधिक वाढ व्हावी.
1 Thessalonians 4:10 in Marathi 10 आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहा. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
1 Thessalonians 5:12 in Marathi 12 आणि बंधूंनो, आम्ही तुम्हाला विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हाला बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या;
1 Timothy 2:3 in Marathi 3 कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे,
1 Timothy 5:4 in Marathi 4 पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे , कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
Titus 3:4 in Marathi 4 पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली,
Hebrews 10:20 in Marathi 20 त्याच्या शरीराद्वारे, त्याने उघडलेल्या नवीन आणि जिवंत अशा मार्गामुळे आपण न भीता परमपवित्र स्थानात पाऊल ठेवू शकतो
Hebrews 13:15 in Marathi 15 म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या आेठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण' त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.
Hebrews 13:22 in Marathi 22 बंधुजनहो, हा जो बोधपर संदेश मी थोडक्यात लिहिला आहे, तो धीर धरून ऐका अशी विनंति तुम्हाला करतो.
1 Peter 2:5 in Marathi 5 तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आध्यात्मिक मंदिर असे,रचले जात आहा देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहा.
1 Peter 2:10 in Marathi 10 ते तुम्ही पूर्वी लोक नव्हता, पण आता देवाचे लोक आहा; तुमच्यावर दया केली नव्हती, पण आता दया केली गेली आहे.
1 Peter 2:20 in Marathi 20 पण, तुम्ही पाप करता तेव्हा तुम्हाला ठोसे दिले गेले, आणि तुम्ही ते सहन केलेत तर त्यात काय मोठेपणा आहे? पण चांगले करून सोसावे लागते तेव्हा तुम्ही ते सहन केले, तर ते देवाला आवडणारे आहे.