Romans 1:16 in Marathi 16 कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही. कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.
Other Translations King James Version (KJV) For I am not ashamed of the gospel of Christ: for it is the power of God unto salvation to every one that believeth; to the Jew first, and also to the Greek.
American Standard Version (ASV) For I am not ashamed of the gospel: for it is the power of God unto salvation to every one that believeth; to the Jew first, and also to the Greek.
Bible in Basic English (BBE) For I have no feeling of shame about the good news, because it is the power of God giving salvation to everyone who has faith, to the Jew first, and then to the Greek.
Darby English Bible (DBY) For I am not ashamed of the glad tidings; for it is God's power to salvation, to every one that believes, both to Jew first and to Greek:
World English Bible (WEB) For I am not ashamed of the Gospel of Christ, for it is the power of God for salvation for everyone who believes; for the Jew first, and also for the Greek.
Young's Literal Translation (YLT) for I am not ashamed of the good news of the Christ, for it is the power of God to salvation to every one who is believing, both to Jew first, and to Greek.
Cross Reference Mark 8:38 in Marathi 38 या देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
Luke 2:10 in Marathi 10 देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे, त्याचे शुभवर्तमान मी तुम्हास सांगतो.
Luke 9:26 in Marathi 26 जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयींची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या व बापाच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
Acts 3:26 in Marathi 26 देवाने आपला सेवक येशू याला उठवून प्रथम तुमच्याकडे पाठवले; यासाठी की त्याने तुमच्यातील प्रत्येकाला तुमच्या दुष्कर्मापासून फिरण्याने तुम्हास आशीर्वाद द्यावा.
Romans 2:9 in Marathi 9 संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य, प्रथम यहूदी आणि मग हेल्लणी,अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील.
Romans 4:11 in Marathi 11 आणि, तो सुंता न झालेला होता तेव्हा विश्वासाने त्याला मिळालेल्या नीतिमत्वाचा शिक्का म्हणून त्याला सुंता ही खूण मिळाली. म्हणजे जे कोणी विश्वास ठेवतात, ते सुंता न झालेले असले तरी त्याने त्या सर्वांचा पिता व्हावे; म्हणजे त्यांच्याही बाजूकडे नीतिमत्व गणले जावे.
Romans 10:17 in Marathi 17 तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
Romans 15:29 in Marathi 29 आणि माझी खातरी आहे की, मी तुमच्याकडे येईन तेव्हा मी ख्रिस्ताच्या आशीर्वादाचा भार घेऊन येईन.
1 Corinthians 1:18 in Marathi 18 कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
1 Corinthians 2:2 in Marathi 2 कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोही वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे.
1 Corinthians 2:4 in Marathi 4 माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते, पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते.
1 Corinthians 9:12 in Marathi 12 जर दुसरे तुमच्यावरील ह्या अधिकाराचे वाटेकरी होतात, तर आम्ही विशेषेकरून का होऊ नये? आणि तरी आम्ही ह्या अधिकाराचा उपयोग केला नाही, पण ख्रिस्ताच्या सुवार्तेला आम्ही अडखळण करू नये म्हणून, आम्ही सर्व गोष्टी सहन करतो.
1 Corinthians 9:18 in Marathi 18 तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी सुवार्ता सांगतो, तेव्हा मी सुवार्ता फुकट पुरवावी आणि सुवार्तेविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
1 Corinthians 14:24 in Marathi 24 परंतु जर प्रत्येक जण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात;
1 Corinthians 15:2 in Marathi 2 जिच्याद्वारे तुम्हाला तारण मिळाले आहे तीच सुवार्ता मी तुम्हाला कळवतो. ज्या वचनाने तुम्हाला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असल्यास तिच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
2 Corinthians 2:12 in Marathi 12 आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी त्रोवसास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक दार उघडले गेले,
2 Corinthians 2:14 in Marathi 14 पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हाला विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 9:13 in Marathi 13 ह्या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;
2 Corinthians 10:4 in Marathi 4 कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत_ चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही.
Galatians 1:7 in Marathi 7 ती दुसरी नाही; पण तुम्हाला कोणी तरी घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताची सुवार्ता चुकीची करण्याची त्यांची इच्छा आहे.
Colossians 1:5 in Marathi 5 जी आशा तुमच्यासाठी आकाशात ठेवली आहे ह्या आशेविषयी,तुम्ही प्रथम, सुवार्तेच्या सत्यवचनात ऐकले.
1 Thessalonians 1:5 in Marathi 5 कारण आमची सुवार्ता केवळ शब्दाने नव्हे,तर सामर्थ्याने, पवित्र आत्म्याने व पूर्ण खात्रीने तुम्हाला कळविण्यात आली;तसेच तुमच्याकरिता आम्ही तुमच्याबरोबर असताना कसे वागलों हे तुम्हास ठाऊक आहे.
1 Thessalonians 2:13 in Marathi 13 ह्या कारणांमुळे आम्हीहि देवाची निरंतर उपकारस्तुती करीतो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते माणसांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले, आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
1 Timothy 1:11 in Marathi 11 गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
2 Timothy 1:8 in Marathi 8 म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्या प्रमाणे तू माझ्या बरोबर दुःखाचा वाटा घे.
2 Timothy 1:12 in Marathi 12 आणि या कारणामुळे मी सुध्दा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
2 Timothy 1:16 in Marathi 16 अनेसिफराच्या घरावर प्रभू दया दाखवो. कारण त्याने अनेकदा माझे समाधान केले आहे. आणि माझ्या तुरूंगात असण्याची त्याला लाज वाटली नाही.
Hebrews 4:12 in Marathi 12 कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे ,आणि मनातील विचार व हेतू हयांची पारख करणारे असे आहे.
1 Peter 4:16 in Marathi 16 ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्याला लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.