Revelation 19:9 in Marathi 9 आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः ‘कोकर्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत. ’” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत. ”
Other Translations King James Version (KJV) And he saith unto me, Write, Blessed are they which are called unto the marriage supper of the Lamb. And he saith unto me, These are the true sayings of God.
American Standard Version (ASV) And he saith unto me, Write, Blessed are they that are bidden to the marriage supper of the Lamb. And he saith unto me, These are true words of God.
Bible in Basic English (BBE) And he said to me, Put in the book, Happy are the guests at the bride-feast of the Lamb. And he said to me, These are the true words of God.
Darby English Bible (DBY) And he says to me, Write, Blessed [are] they who are called to the supper of the marriage of the Lamb. And he says to me, These are the true words of God.
World English Bible (WEB) He said to me, "Write, 'Blessed are those who are invited to the marriage supper of the Lamb.'" He said to me, "These are true words of God."
Young's Literal Translation (YLT) And he saith to me, `Write: Happy `are' they who to the supper of the marriage of the Lamb have been called;' and he saith to me, `These `are' the true words of God;'
Cross Reference Matthew 22:2 in Marathi 2 “स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले.
Luke 14:15 in Marathi 15 मेजाभोवती बसलेल्यांपैकी एकाने जेव्हा हे ऐकले, तेव्हा तो येशूला म्हणाला, जो देवाच्या राज्यात भाकर खाईल, तो प्रत्येक जण धन्य!
1 Timothy 1:15 in Marathi 15 ``ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की , ख्रिस्त येशू पापी लोकांना तारावयला जगात आला, आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे.
1 Timothy 4:9 in Marathi 9 हे वचन विश्वसनीय आहे जे सर्वथा स्वीकारावयास योग्य आहे.
2 Timothy 2:11 in Marathi 11 हे वचन विश्वसनीय आहे की , ''जर आम्ही त्याच्यासह मेलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू
Titus 3:8 in Marathi 8 हे एक विश्वसनीय वचन आहे आणि माझी इच्छा आहे की, तू ह्या गोष्टी निक्षून सांगत जा. म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे त्यांनी चांगल्या कामात राहण्याची काळजी घ्यावी. ह्या गोष्टी चांगल्या असून माणसासाठी हितकारक आहेत.
Revelation 1:19 in Marathi 19 म्हणून ज्या गोष्टी तू पाहतोस, ज्या घडत आहेत आणि ज्या गोष्टी नंतर घडणार आहेत त्याही लिही.
Revelation 2:1 in Marathi 1 इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही: “जाे आपल्या उजव्या हातात सात तारे धरतो आणि सात सोन्याच्या समयांमधून चालतो त्याचे हे शब्द आहेत
Revelation 2:8 in Marathi 8 “स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही: “जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मेला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो
Revelation 2:12 in Marathi 12 “पर्गम येथील मंडळीच्या दूताला लिही: “ज्याच्याकडे दोन्ही बाजूंनी धार असणारी(दुधारी) तरवार आहे, त्याचे हे शब्द आहेत,
Revelation 2:18 in Marathi 18 “थुवतीरा येथील मंडळीच्या दूताला लिही: “देवाचा पुत्र हे सांगत आहे, ज्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे आहेत आणि ज्याचे पाय चमकणाऱ्या सोनपितळासारखे आहेत.
Revelation 3:1 in Marathi 1 सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही “ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत अाहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मेलेले आहात.
Revelation 3:7 in Marathi 7 “फिलदेल्फिया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो पवित्र व सत्य आहे त्याचे हे शब्द आहेत_ ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जे तो उघडतो, ते कोणी बंद करू शकणार नाही आणि जे तो बंद करतो ते कोणी उघडू शकणार नाही.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 3:20 in Marathi 20 पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दार ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दार उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोही माझ्याबरोबर जेवेल.
Revelation 10:4 in Marathi 4 त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी एेकली, ती म्हणाली, सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.
Revelation 14:13 in Marathi 13 आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः ‘आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य होत. ’ आत्मा म्हणतो, ‘हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा. कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्या मागे जातात. ’
Revelation 19:7 in Marathi 7 या, आपण आनंद करू, हर्ष करू, आणि त्याला गौरव देऊ; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Revelation 21:5 in Marathi 5 तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, “पाहा, मी सर्वकाही नवीन करतो. ” आणि तो मला म्हणाला, “लिही, कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. ”
Revelation 22:6 in Marathi 6 नंतर देवदूत मला म्हणाला, “हे शब्द विश्वासयोग्य आणि खरे आहेत. जो प्रभू संदेष्ट्यांच्या आत्म्यांचा प्रभू आहे, ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत, त्या आपल्या सेवकांना दाखवून देण्यासाठी त्याने आपला दूत पाठविला आहे. ”