Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Other Translations King James Version (KJV) And I fell at his feet to worship him. And he said unto me, See thou do it not: I am thy fellowservant, and of thy brethren that have the testimony of Jesus: worship God: for the testimony of Jesus is the spirit of prophecy.
American Standard Version (ASV) And I fell down before his feet to worship him. And he saith unto me, See thou do it not: I am a fellow-servant with thee and with thy brethren that hold the testimony of Jesus: worship God; for the testimony of Jesus is the spirit of prophecy.
Bible in Basic English (BBE) And I went on my face before his feet to give him worship. And he said to me, See you do it not: I am a brother-servant with you and with your brothers who keep the witness of Jesus: give worship to God: for the witness of Jesus is the spirit of the prophet's word.
Darby English Bible (DBY) And I fell before his feet to do him homage. And he says to me, See [thou do it] not. I am thy fellow-bondman, and [the fellow-bondman] of thy brethren who have the testimony of Jesus. Do homage to God. For the spirit of prophecy is the testimony of Jesus.
World English Bible (WEB) I fell down before his feet to worship him. He said to me, "Look! Don't do it! I am a fellow bondservant with you and with your brothers who hold the testimony of Jesus. Worship God, for the testimony of Jesus is the Spirit of Prophecy."
Young's Literal Translation (YLT) and I fell before his feet, to bow before him, and he saith to me, `See -- not! fellow servant of thee am I, and of thy brethren, those having the testimony of Jesus; bow before God, for the testimony of Jesus is the spirit of the prophecy.'
Cross Reference Matthew 4:10 in Marathi 10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की, '‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर 'आणि केवळ त्याचीच सेवा कर.’”
Mark 5:22 in Marathi 22 तेव्हा याईर नावाचा सभास्थानाचा एक अधिकारी, आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला.
Mark 7:25 in Marathi 25 पण जिच्या लहान मुलीला अशुध्द आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्या विषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली.
Luke 1:19 in Marathi 19 देवदूताने त्याला उत्तर दिले, 'मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे, आणि तुझ्याशी बोलायला व तुला ही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे.
Luke 24:25 in Marathi 25 मग येशू त्यांना म्हणाला, संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
Luke 24:44 in Marathi 44 तो त्यांना म्हणाला, “ह्याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हांबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, भविष्यवादी आणि स्तोत्रे ह्यात माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.”
John 4:22 in Marathi 22 तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हाला ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे.
John 5:39 in Marathi 39 तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल. आणि तेच माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
Acts 3:12 in Marathi 12 हे पाहून पेत्राने त्या लोकास उत्तर दिले; तो म्हणाला, अहो इस्त्राएल मनुष्यांनो, यावरून तुम्ही आश्चर्य का करता , अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?
Acts 10:25 in Marathi 25 “जेव्हा पेत्र आत गेला, तेव्हा कर्नेल्य त्याला भेटला. कर्नेल्याने पेत्राच्या पाया पडून आदराने त्याला अभिवादन केले. “
Acts 10:43 in Marathi 43 जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्याला क्षमा केली जाईल. येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील. सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”
Acts 13:27 in Marathi 27 यरुशलेमेमध्ये राहतात ते यहूदी व यहूदी पुढारी यांना जाणीव झाली नाही की, येशू हा तारणारा होता. येशूविषयी जे शब्द भविष्यवाद्यांनी लिहिले ते यहूदी लोकांसाठी प्रत्येक शब्बाथाच्या वारी वाचले गेले. परंतु त्यांना ते समजले नाही. यहूदी लोकांनी येशूचा धिक्कार केला, जेव्हा त्यांनी असे केले, तेव्हा त्यांनी भविष्यावाद्यांचे म्हणणे खरे ठरवले!
Acts 14:11 in Marathi 11 पौलाने केलेले लोकांनी जेव्हा पाहिले, तेव्हा ते आपल्या लुकवनिया भाषेत ओरडले. ते म्हणाल, “देव माणसांच्या रूपाने आमच्यात उतरले आहेत.”
Romans 3:21 in Marathi 21 पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्व,आता, प्रकट झाले आहे.
2 Corinthians 8:7 in Marathi 7 म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे.
Ephesians 5:15 in Marathi 15 म्हणून, तुम्ही कसे जगता, याविषयी काळजीपूर्वक असा. मूर्ख लोकांसारखे होऊ नका, तर शहाण्या लोकांसारखे व्हा.
Ephesians 5:33 in Marathi 33 तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे. व पत्नी नेही पतीचा मान राखला पाहिजे.
Philippians 3:3 in Marathi 3 कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची सेवा करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे, आणि देहावर भरवसा न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहो.
1 Thessalonians 5:15 in Marathi 15 आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाइटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण, तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
Hebrews 1:14 in Marathi 14 सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?
Hebrews 12:25 in Marathi 25 जो बोलतो त्याचे ऐकण्यासाठी नकार देऊ नका. त्याविषयी खात्री असू द्या. ज्याने पृथ्वीवर त्यांना सावध राहण्याविषयी सांगताना त्याचे ऐकायचे नाही असे ज्यांनी ठरवले ते लोक जर सुटू शकले नाहीत तर मग जो स्वर्गातून सावध करतो, त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर आम्हाला सुटकेसाठी कोणता मार्ग राहीला बरे?
1 Peter 1:10 in Marathi 10 तुम्हाला प्राप्त होणार्या कृपेविषयी ज्या संदेष्ट्यांनी संदेश सांगितले ते ह्या तारणाविषयी विचार व शोध करीत होते.
2 Peter 1:19 in Marathi 19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल.
1 John 5:10 in Marathi 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
1 John 5:21 in Marathi 21 माझ्या मुलांनो, स्वतःला मूर्तीपूजेपासून दूर राखा.
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 4:10 in Marathi 10 तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो सिंहासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्याला नमन करतात आणि आपले मुगुट सिंहासनासमोर ठेवून म्हणतात
Revelation 12:11 in Marathi 11 त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
Revelation 12:17 in Marathi 17 तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;
Revelation 14:7 in Marathi 7 तो मोठ्या आवाजात म्हणत होता, ‘देवाचे भय धरा, आणि त्याला गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे. आणि ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र, आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्याला नमन करा. ’
Revelation 15:4 in Marathi 4 हे प्रभू, कोण तुला भिणार नाही आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही? कारण तू एकच पवित्र आहेस. कारण सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत. ’
Revelation 22:8 in Marathi 8 ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि त्यांनी पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो.