Revelation 12:9 in Marathi 9 तो मोठा अजगर, सैतान म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले.
Other Translations King James Version (KJV) And the great dragon was cast out, that old serpent, called the Devil, and Satan, which deceiveth the whole world: he was cast out into the earth, and his angels were cast out with him.
American Standard Version (ASV) And the great dragon was cast down, the old serpent, he that is called the Devil and Satan, the deceiver of the whole world; he was cast down to the earth, and his angels were cast down with him.
Bible in Basic English (BBE) And the great dragon was forced down, the old snake, who is named the Evil One and Satan, by whom all the earth is turned from the right way; he was forced down to the earth, and his angels were forced down with him.
Darby English Bible (DBY) And the great dragon was cast out, the ancient serpent, he who is called Devil and Satan, he who deceives the whole habitable world, he was cast out into the earth, and his angels were cast out with him.
World English Bible (WEB) The great dragon was thrown down, the old serpent, he who is called the devil and Satan, the deceiver of the whole world. He was thrown down to the earth, and his angels were thrown down with him.
Young's Literal Translation (YLT) and the great dragon was cast forth -- the old serpent, who is called `Devil,' and `the Adversary,' who is leading astray the whole world -- he was cast forth to the earth, and his messengers were cast forth with him.
Cross Reference Matthew 4:1 in Marathi 1 मग सैतानाकडून त्याची परीक्षा व्हावी म्हणून पवित्र आत्म्याने येशूला अरण्यात नेले.
Matthew 4:5 in Marathi 5 मग सैतानाने त्याला पवित्र नगरात नेऊन येशूला मंदिराच्या उंच कंगोऱ्यावर उभे केले.
Matthew 4:8 in Marathi 8 मग सैतानाने येशूला एका अतिशय उंच पर्वतावर नेले. त्याने येशूला जगातील राज्ये अणि त्यांतील सर्व वैभव दाखवले.
Matthew 4:10 in Marathi 10 तेव्हा येशू त्याला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यापासून दूर हो! कारण असे लिहिले आहे की, '‘देव जो तुझा प्रभू त्याचीच उपासना कर 'आणि केवळ त्याचीच सेवा कर.’”
Matthew 13:39 in Marathi 39 ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणी ही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत;
Matthew 24:24 in Marathi 24 खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांना ते चिन्हे दाखवतील व लोकांना एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील.
Matthew 25:41 in Marathi 41 “मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, ‘माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, अनंतकाळच्या अग्नीत जा. हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे.
Luke 8:12 in Marathi 12 आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो, आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंत:करणातून वचन काढून घेतो.
Luke 10:18 in Marathi 18 तेव्हा तो त्यांना म्हणाला, मी सैतानाला आकाशातून विजेसारखे पडताना पाहिले!
Luke 13:16 in Marathi 16 ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?
Luke 22:3 in Marathi 3 तेव्हा बारा प्रेषितांपैकी एक जो यहूदा ज्याला इस्कर्योत म्हणत,त्याच्यात सैतान शिरला.
Luke 22:31 in Marathi 31 शिमोना, शिमोना, ऐक! सैतानाने तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून मागितले आहे.
John 8:44 in Marathi 44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणं करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
John 12:31 in Marathi 31 आता ह्या जगाचा न्याय होतो, आता ह्या जगाचा अधिकारी बाहेर टाकला जाईल.
John 14:30 in Marathi 30 ह्यापुढे, मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही, कारण जगाचा अधिकारी येतो; तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही.
John 16:11 in Marathi 11 आणि न्यायाविषयी; कारण ह्या जगाच्या अधिपतीचा न्याय झाला आहे.
Acts 5:3 in Marathi 3 तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे?
Acts 26:18 in Marathi 18 मी तुुला त्यांच्याकडे पाठवितो,ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून देवाकडे वळावे,म्हणुन तू त्यांचे डोळे उघडावे, आणी त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोंकामध्ये वतन मिळावे.
Romans 16:18 in Marathi 18 कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत, पण आपल्या पोटाची सेवा करतात, आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या माणसांची मने बहकवतात;
Romans 16:20 in Marathi 20 आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
2 Corinthians 2:11 in Marathi 11 यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याचे विचार जाणत नाही असे नाही.
2 Corinthians 4:4 in Marathi 4 जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने ह्या युगाच्या देवाने अंधळी केलीत.
2 Corinthians 11:3 in Marathi 3 पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुध्द भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील .
2 Corinthians 11:14 in Marathi 14 आणि यात आश्चर्य नाही, कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.
2 Corinthians 12:7 in Marathi 7 आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे, मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये, म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे.
Ephesians 4:14 in Marathi 14 “ह्यासाठी की आपण यापुढे लहान बाळकासारखे नसावे. म्हणजे माणसांच्या कपटाने, भ्रांतीच्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडे तिकडे हेलकावणारे होऊ नयेत
2 Thessalonians 2:3 in Marathi 3 कोणत्याहि प्रकारे कोणाकडून फसू नका;कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष,नाशाचा पुत्र प्रकट होईल;
2 Thessalonians 2:9 in Marathi 9 सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अदभूते करीत येईल
1 Timothy 2:14 in Marathi 14 आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
1 Timothy 3:6 in Marathi 6 तो ह्या कार्यात नवशिका नसावा म्हणजे तो गर्वाने फुगून सैतानाच्या दंडात पडू नये.
2 Timothy 3:13 in Marathi 13 पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
1 Peter 5:8 in Marathi 8 सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावेे म्हणून शोधीत फिरतो.
1 John 3:8 in Marathi 8 जो पाप करतो तो सैतानाचा आहे, कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला.
1 John 5:19 in Marathi 19 आम्हाला माहीत आहे की आम्ही देवाचे आहोत, आणि संपूर्ण जग हे त्या सैतानाच्या नियंत्रणाखाली आहे.
Jude 1:9 in Marathi 9 परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्या ऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला.
Revelation 2:9 in Marathi 9 “मला तुमचे दु:ख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गाेष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, (पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.)
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 2:24 in Marathi 24 “पण थुवतीरा येथील मंडळीतील जे दुसरे लोक आहेत जे तिची शिकवण आचरीत नाहीत त्यांना मी सांगतो की, ज्यास सैतानाची_ म्हणतात ती गुपिते तुम्हाला माहित नाहीत, त्या तुमच्यावर मी दुसरे ओझे लादणार नाही.
Revelation 3:9 in Marathi 9 पाहा! जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.
Revelation 9:1 in Marathi 1 मग पाचव्या देवदूताने त्याची तुतारी वाजविली, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची (खोल असा खड्डा ज्याला शेवट नाही) चावी दिली होती.
Revelation 9:20 in Marathi 20 त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या माणसांनी आपल्या हातच्या कृत्यांविषयी पश्चाताप केला नाही, म्हणजे, भूतांची व ज्यास पाहता, एेकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही.
Revelation 12:3 in Marathi 3 आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्याला सात डोकी व दहा शिंगे होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुगुट होते.
Revelation 12:7 in Marathi 7 आणि स्वर्गात युध्द झाले. मिखाएल व त्याचे दूत हे अजगराविरुध्द लढले, आणि अजगर व त्याचे दूतहे सुध्दा त्यांच्याशी लढले.
Revelation 12:14 in Marathi 14 परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले. आणि तेथे, ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ, आणि अर्धा काळ तिचे पोषण केले जाईल.
Revelation 13:14 in Marathi 14 आणि त्याला त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो.
Revelation 16:14 in Marathi 14 कारण हे चमत्कार करणारे भूतांचे आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत.
Revelation 18:2 in Marathi 2 तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, “पडली, ती महान बाबेल पडली आहे! ती भूतांना वस्ती झाली आहे, सर्व अशुध्द आत्म्याना आणि सर्व अशुध्द आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे.
Revelation 18:23 in Marathi 23 आणि तुझ्यात दिव्याचा उजेड ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.
Revelation 19:20 in Marathi 20 मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले. त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. ह्या दोघांनाही गंधकाने जळणार्या अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले.
Revelation 20:2 in Marathi 2 आणि ज्याला दियाबल आणि सैतान म्हणतात त्या पुरातन सर्पाला म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्याला बांधले,
Revelation 20:8 in Marathi 8 आणि तो पृथ्वीच्या चारी कोपर्यांतील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
Revelation 20:10 in Marathi 10 आणि त्यांना फसविणार्या सैतानाला अग्नीच्या व गंघकाच्या सरोवरात टाकण्यात आले. तो पशू व तो खोटा संदेष्टा हे तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.