Revelation 12:17 in Marathi 17 तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;
Other Translations King James Version (KJV) And the dragon was wroth with the woman, and went to make war with the remnant of her seed, which keep the commandments of God, and have the testimony of Jesus Christ.
American Standard Version (ASV) And the dragon waxed wroth with the woman, and went away to make war with the rest of her seed, that keep the commandments of God, and hold the testimony of Jesus:
Bible in Basic English (BBE) And the dragon was angry with the woman and went away to make war on the rest of her seed, who keep the orders of God, and the witness of Jesus:
Darby English Bible (DBY) And the dragon was angry with the woman, and went to make war with the remnant of her seed, who keep the commandments of God, and have the testimony of Jesus.
World English Bible (WEB) The dragon grew angry with the woman, and went away to make war with the rest of her seed, who keep God's commandments and hold Jesus' testimony.
Young's Literal Translation (YLT) and the dragon was angry against the woman, and went away to make war with the rest of her seed, those keeping the commands of God, and having the testimony of Jesus Christ.
Cross Reference Matthew 28:20 in Marathi 20 आणि जे काही मी तुम्हाला शिकविले आहे ते त्या लोकांना पाळायला शिकवा. आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
John 8:44 in Marathi 44 तुम्ही आपला बाप सैतान ह्यापासून झाला आहात आणि तुमच्या बापाच्या वासनांप्रमाणं करू इच्छिता. तो प्रारंभापासून मनुष्य घातक होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा बाप आहे.
1 Corinthians 2:1 in Marathi 1 बंधूनो , जेव्हा मी तुमच्याकडे आलो, तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगण्यासाठी आलो नाही.
1 Peter 5:8 in Marathi 8 सावध रहा; जागृत रहा; कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावेे म्हणून शोधीत फिरतो.
1 John 2:3 in Marathi 3 जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्याला खऱ्या अर्थाने ओळखले आहे.
1 John 5:2 in Marathi 2 देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने.आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
1 John 5:10 in Marathi 10 जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे. कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
Revelation 1:2 in Marathi 2 योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वाविषयी साक्ष दिली;
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 6:9 in Marathi 9 जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.
Revelation 11:7 in Marathi 7 त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील.
Revelation 12:11 in Marathi 11 त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
Revelation 13:7 in Marathi 7 आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास, आणि त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली आणि त्याला प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणार्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.
Revelation 14:12 in Marathi 12 जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.
Revelation 17:6 in Marathi 6 आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्र जनांच्या रक्ताने व येशूसाठी(साक्षीचे रक्त)हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती. आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.
Revelation 17:14 in Marathi 14 ते कोकर्याशी युध्द करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. ”
Revelation 18:20 in Marathi 20 “हे स्वर्गा, अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून आनंद करा; कारण तिच्या न्यायनिवाड्यात तुमचा न्याय केला आहे. ”
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Revelation 19:19 in Marathi 19 आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व पृथ्वीचे राजे आणि त्यांच्या सेना एकत्र आल्या होत्या.
Revelation 20:4 in Marathi 4 तेव्हा मी सिंहासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला; आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.
Revelation 20:8 in Marathi 8 आणि तो पृथ्वीच्या चारी कोपर्यांतील गोग व मागोग ह्या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल. त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे.
Revelation 22:14 in Marathi 14 “जे आपले झगे साफ धुतात, ते धन्य! त्यांना जीवनी झाडाचे फळ खाण्याचा आणि वेशीतून नगरामध्ये जाण्याचा अधिकार राहील.