Revelation 12:11 in Marathi 11 त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
Other Translations King James Version (KJV) And they overcame him by the blood of the Lamb, and by the word of their testimony; and they loved not their lives unto the death.
American Standard Version (ASV) And they overcame him because of the blood of the Lamb, and because of the word of their testimony; and they loved not their life even unto death.
Bible in Basic English (BBE) And they overcame him through the blood of the Lamb and the word of their witness; and loving not their lives they freely gave themselves up to death.
Darby English Bible (DBY) and *they* have overcome him by reason of the blood of the Lamb, and by reason of the word of their testimony, and have not loved their life even unto death.
World English Bible (WEB) They overcame him because of the Lamb's blood, and because of the word of their testimony. They didn't love their life, even to death.
Young's Literal Translation (YLT) and they did overcome him because of the blood of the Lamb, and because of the word of their testimony, and they did not love their life -- unto death;
Cross Reference Luke 14:26 in Marathi 26 जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतः:च्या जिवाचासुध्दा व्देष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही.
John 16:33 in Marathi 33 माझ्या ठायी तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाला जिकले आहे.”
Acts 20:24 in Marathi 24 मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे. प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे - ते काम म्हणजे- देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांना सांगितली पाहिजे.
Acts 21:13 in Marathi 13 पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेममध्ये मरायलादेखील तयार आहे.”
Romans 8:33 in Marathi 33 देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे.
Romans 16:20 in Marathi 20 आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
1 Corinthians 15:57 in Marathi 57 पण देवाला धन्यवाद असो, जो प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्हाला विजय देतो!
2 Corinthians 10:3 in Marathi 3 कारण, आम्ही देहात चालणारे असूनही अाम्ही देहस्वभावाप्रमाणे युध्द करत नसतो.
Ephesians 6:13 in Marathi 13 याकारणास्तव वाईट दिवसात तुम्हाला प्रतिकार करता यावा म्हणून देवाने दिलेली संपूर्ण शस्रसामग्री घ्या. म्हणजे तुम्हाला सर्व ते केल्यावर टिकून राहता येईल
2 Timothy 4:7 in Marathi 7 मी सुयुध्द केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे.
Hebrews 2:14 in Marathi 14 म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला,येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा.
Hebrews 11:35 in Marathi 35 कित्येक स्त्रियांना त्यांचे मेलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले. आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले.
1 John 2:13 in Marathi 13 वडिलांनो, मी तुम्हाला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मी तुम्हाला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही विजय मिळवला आहे. लहान मुलांनो,मी तुम्हास लिहीले आहे, कारण तुम्ही पित्याला आेळखता.
1 John 4:4 in Marathi 4 माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे; कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
1 John 5:5 in Marathi 5 येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
Revelation 1:2 in Marathi 2 योहानाने देवाच्या वचनाविषयी व येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्या सर्वाविषयी साक्ष दिली;
Revelation 1:9 in Marathi 9 मी योहान, जो तुमचा बंधू आणि येशू मधील क्लेश , राज्य व धीर ह्यांचा तुम्हाबरोबर भागीदार आहे. येशूच्या सत्यात आणि देवाच्या वचनामुळे आणि येशूच्या साक्षीमुळे मी पात्म नावाच्या बेटावर होतो.
Revelation 2:7 in Marathi 7 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
Revelation 2:10 in Marathi 10 जे दु:ख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो,सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा आणि मग मी तुम्हाला जीवनाचा मुगुट देईन.
Revelation 2:13 in Marathi 13 मला माहीत आहे जेथे सैतानाचे सिंहासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला.त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
Revelation 2:17 in Marathi 17 “आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.“जो विजय मिळवतो त्याला मी गुप्त ठेवलेल्या मान्न्यातून काही देईन. मी त्याला पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल. ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.
Revelation 2:26 in Marathi 26 “जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्याला मी राष्ट्रांवर अधिकार देईन.
Revelation 3:5 in Marathi 5 जो विजय मिळवतो, तो अशारीतीने पांढरी वस्त्रे परिधान करील. मी त्याचे नाव जीवनाच्या पुस्तकातून खोडणारच नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,
Revelation 3:12 in Marathi 12 जो विजय मिळवतो त्याला मी माझ्या देवाच्या मंदिराचा खांब बनवीन. आणि तो कधीही बाहेर जाणार नाही. मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व (माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरूशलेम) , म्हणजे माझ्या देवाची नगरी हिचे नाव आणि माझे नवे नाव लिहीन.
Revelation 3:21 in Marathi 21 “ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या सिंहासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्याला मी माझ्या सिंहासनावर बसण्याचा अधिकार देईन.
Revelation 6:9 in Marathi 9 जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते.
Revelation 7:10 in Marathi 10 ते मोठ्याने आेरडून म्हणत होते राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे.
Revelation 11:7 in Marathi 7 त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील.
Revelation 12:17 in Marathi 17 तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला;
Revelation 14:1 in Marathi 1 आणि मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या कपाळांवर त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते.
Revelation 15:2 in Marathi 2 आणि मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे, आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर, आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते.
Revelation 19:10 in Marathi 10 आणि, मी त्याला नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा, आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर. कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवादाचा आत्मा आहे. ”
Revelation 20:4 in Marathi 4 तेव्हा मी सिंहासने बघितली व त्यावर जे कोणी बसले होते त्यांच्याकडे न्यायनिवाडा देण्यात आला; आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता, आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले.