Revelation 10 in Marathi

1 मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला, तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे, व त्याचे , पाय अग्निस्तंभासारखे होते,

2 त्याच्याहाती एक उघडलेले लहानसे पुस्तक होते, त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला,

3 आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने आेरडला, आणि तो आेरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले.

4 त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो, इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी एेकली, ती म्हणाली, सात मेघगर्जनांनी काढलेले शब्द गुप्त ठेव, ते लिहू नको.

5 ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला,

6 आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यांत जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते, आणि समुद्र व त्यात जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटले, आणखी उशीर होणार नाही.

7 परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्या दिवसात म्हणजे तो देवदूत तुतारी वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने आपले दास संदेष्टे ह्यांस सुवार्ता सांगितली, त्यानुसार त्याचे गूज पूर्ण होईल.

8 स्वर्गातून झालेली जी वाणी मी एेकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी एेकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातलें उघडलेले पुस्तक जाऊन घे.

9 तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, ते लहानसे पुस्तक मला दे असे म्हटले. तो म्हणाला, हे घे आणि खाऊन टाक; ते तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.

10 तेव्हा मी देवदूताच्या हातातून ते लहानसे पुस्तक घेतले व खाऊन टाकले, ते माझ्या तोंडाला मधासारखे गोड लागले, तरी ते खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले.

11 तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रें, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे ह्यांच्याविषयी तू पुन्हा संदेश दिला पाहिजे.