Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Other Translations King James Version (KJV) And from Jesus Christ, who is the faithful witness, and the first begotten of the dead, and the prince of the kings of the earth. Unto him that loved us, and washed us from our sins in his own blood,
American Standard Version (ASV) and from Jesus Christ, `who is' the faithful witness, the firstborn of the dead, and the ruler of the kings of the earth. Unto him that loveth us, and loosed us from our sins by his blood;
Bible in Basic English (BBE) And from Jesus Christ, the true witness, the first to come back from the dead, and the ruler of the kings of the earth. To him who had love for us and has made us clean from our sins by his blood;
Darby English Bible (DBY) and from Jesus Christ, the faithful witness, the firstborn from the dead, and the prince of the kings of the earth. To him who loves us, and has washed us from our sins in his blood,
World English Bible (WEB) and from Jesus Christ, the faithful witness, the firstborn of the dead, and the ruler of the kings of the earth. To him who loves us, and washed us from our sins by his blood;
Young's Literal Translation (YLT) and from Jesus Christ, the faithful witness, the first-born out of the dead, and the ruler of the kings of the earth; to him who did love us, and did bathe us from our sins in his blood,
Cross Reference Matthew 28:18 in Marathi 18 तेव्हा येशू त्याच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
John 3:11 in Marathi 11 मी तुम्हाला खचीत खचीत सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो, आणि आम्ही जे पाहिले आहे त्याची साक्ष देतो; पण तुम्ही आमची साक्ष मानत नाही.
John 3:32 in Marathi 32 जे त्याने पाहिले आहे व ऐकले आहे त्याविषयी तो साक्ष देतो, आणि त्याची साक्ष कोणी मानत नाही.
John 8:14 in Marathi 14 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी स्वतःविषयी साक्ष दिली तरी माझी साक्ष खरी आहे, कारण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे मला माहीत आहे; पण मी कोठून आलो आणि कोठे जाणार हे तुम्हाला माहीत नाही.
John 13:1 in Marathi 1 आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता ह्या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, ह्या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
John 13:8 in Marathi 8 पेत्र त्याला म्हणाला, “तुम्हाला माझे पाय कधीही धुवावयाचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी तुला धुतले नाही, तर तुला माझ्याबरोबर वाटा नाही.”
John 13:34 in Marathi 34 मी एक नवी आज्ञा तुम्हाला देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हींहि एकमेकांवर प्रीती करावी.
John 15:9 in Marathi 9 जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीहि तुम्हावर प्रीती केली; तुम्ही माझ्या प्रीतीत रहा.
John 18:37 in Marathi 37 म्हणून पिलात त्याला म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी ह्यासाठी जन्मलो आहे, आणि ह्यासाठी मी जगात आलो आहे.मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
Acts 20:28 in Marathi 28 तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हाला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हाला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
Acts 26:23 in Marathi 23 त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दुःख सहन करील. आणि मेलेल्यातून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.”
Romans 8:37 in Marathi 37 पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्या द्वारे ह्या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
1 Corinthians 6:11 in Marathi 11 आणि तुम्ही कित्येक जण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहा, आणि, प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहा.
1 Corinthians 15:20 in Marathi 20 परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.
Galatians 2:20 in Marathi 20 मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो; आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरता दिले.
Ephesians 1:20 in Marathi 20 त्याने ती कृती ख्रिस्ताच्या ठायी करून त्याला मरणातून उठवले आणि स्वर्गाच्या राज्यात देवाच्या उजव्या हाताला बसविले.
Ephesians 2:4 in Marathi 4 “पण देव खूप दयाळू आहे. कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.”
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Ephesians 5:25 in Marathi 25 पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
Colossians 1:18 in Marathi 18 तो शरिराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे, आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्याला सर्व गोष्टींत प्राधान्य असावे.
1 Timothy 6:13 in Marathi 13 जो सर्वांना जीवन देतो त्या देवासमोर आणि पंतय पिलातासमोर ज्याने चांगली साक्ष दिली त्या ख्रिस्त येशूसमोर मी तुला आज्ञा करतो.
1 Timothy 6:15 in Marathi 15 जोे धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू,
Hebrews 9:14 in Marathi 14 तर ख्रिस्ताचे रक्त देवासाठी त्याहून कितीतरी अधिक परिणामकारक अर्पण ठरू शकेल! ख्रिस्ताने सार्वकालिक आत्म्याद्वारे आपल्या स्वतःचे निष्कलंक आणि परिपूर्ण असे अर्पण केले. त्याचे रक्त आपल्या निर्जीव कर्मामुळे मरून गेलेली आपली सदसदविवेकबुद्धी शुध्द करील. अशासाठी की, आपण जिवंत देवाची उपासना करू शकू.
1 Peter 1:19 in Marathi 19 निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहा.
1 John 1:7 in Marathi 7 पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे, आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुध्द करते.
1 John 4:10 in Marathi 10 आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापाकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे.
1 John 5:7 in Marathi 7 आत्मा हा साक्ष देणारा आहे,कारण आत्मा सत्य आहे.
Revelation 3:14 in Marathi 14 “लावदिकीया येथील मंडळीच्या दूताला लिहीः “जो आमेन , विश्वासू आणि खरा साक्षीदार आहे, देवाच्या निर्मितीवरील सत्ताधीश आहे त्याचे हे शब्द आहेत.
Revelation 7:14 in Marathi 14 मी त्याला म्हटले, प्रभो, तुला माहित आहे. आणि तो मला म्हणाला जे मोठ्या संकटातून येतात ते हे आहेत. त्यांनी आपले झगे धुतले आहेत आणि कोकऱ्याच्या रक्तात पांढरे केले आहेत.
Revelation 11:15 in Marathi 15 मग सातव्या देवदूताने तुतारी वाजविली तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः ‘जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे, आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील. ’
Revelation 17:14 in Marathi 14 ते कोकर्याशी युध्द करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे; आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत. ”
Revelation 19:16 in Marathi 16 त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.