Philippians 2:15 in Marathi 15 ह्यासाठी की,ह्या कुटिल आणि विपरीत पिढीमध्ये तुम्ही निर्दोष व निरुपद्रवी देवाची निष्कलंक मुले असे व्हावे;
Other Translations King James Version (KJV) That ye may be blameless and harmless, the sons of God, without rebuke, in the midst of a crooked and perverse nation, among whom ye shine as lights in the world;
American Standard Version (ASV) that ye may become blameless and harmless, children of God without blemish in the midst of a crooked and perverse generation, among whom ye are seen as lights in the world,
Bible in Basic English (BBE) So that you may be holy and gentle, children of God without sin in a twisted and foolish generation, among whom you are seen as lights in the world,
Darby English Bible (DBY) that ye may be harmless and simple, irreproachable children of God in the midst of a crooked and perverted generation; among whom ye appear as lights in [the] world,
World English Bible (WEB) that you may become blameless and harmless, children of God without blemish in the midst of a crooked and perverse generation, among whom you are seen as lights in the world,
Young's Literal Translation (YLT) that ye may become blameless and harmless, children of God, unblemished in the midst of a generation crooked and perverse, among whom ye do appear as luminaries in the world,
Cross Reference Matthew 5:14 in Marathi 14 “तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपत नाही.
Matthew 5:45 in Marathi 45 अशासाठी की , तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो वाइटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो.
Matthew 5:48 in Marathi 48 ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा’.
Matthew 10:16 in Marathi 16 “लांडग्यांमध्ये जसे मेंढरास पाठवावे तसे मी तुम्हास पाठवत आहे, म्हणून तुम्ही सापांसारखे चतुर आणि कबुतरांसारखे निरूपद्रवी व्हा.
Matthew 17:17 in Marathi 17 येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्याला माझ्याकडे आणा.”
Luke 1:6 in Marathi 6 ते दोघेही देवापुढे नीतिमान होते आणि प्रभूच्या सर्व आज्ञा व विधीत निर्दोषपणे चालत असत
Luke 6:35 in Marathi 35 परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रेम करा, व त्यांचे बरे करा, आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
John 5:35 in Marathi 35 तो जळता व प्रकाशणारा दिवा होता; आणि तुम्ही काही काळ त्याच्या प्रकाशात हर्ष करण्यास राजी झालात.
Acts 2:40 in Marathi 40 आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टी सांगून त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले,ह्या कुटिल पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या.
Acts 20:30 in Marathi 30 तुमच्यामधूनसुध्दा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील.
Romans 16:19 in Marathi 19 कारण तुमचे आज्ञापालन सर्वत्र सर्वांना कळले आहे म्हणून मी तुमच्यासाठी आनंद करतो. पण तुम्ही चांगल्याविषयी ज्ञानी व्हावे आणि वाइटाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा आहे.
1 Corinthians 1:8 in Marathi 8 तोच तुम्हाला शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.
2 Corinthians 6:17 in Marathi 17 आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुध्दाला शिवू नका; म्हणजे मी तुम्हाला स्विकारीन.
Ephesians 5:1 in Marathi 1 तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा,
Ephesians 5:7 in Marathi 7 म्हणून त्यांचे भागीदार होऊ नका.
Ephesians 5:27 in Marathi 27 यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल. किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.
Philippians 1:10 in Marathi 10 यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
1 Thessalonians 5:23 in Marathi 23 आणि स्वतः शांतीचा देव तुम्हाला पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.
1 Timothy 3:2 in Marathi 2 तर वडील हा निर्दोष, एका बायकोचा नवरा, मिताचारी ,सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण , असा असावा.
1 Timothy 3:10 in Marathi 10 वडीलांप्रमाणे यांचीसुद्धा प्रथम परीक्षा व्हावी, मग निर्दोष ठरल्यास, त्यांनी सेवकपण करावे.
1 Timothy 5:7 in Marathi 7 त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना ह्या गोष्टी आज्ञारूपाने लोकांना सांग,
1 Timothy 5:14 in Marathi 14 यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण स्त्रियांनी (विधवांनी) लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये.
1 Timothy 5:20 in Marathi 20 जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे.
Titus 1:6 in Marathi 6 ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पति असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
Titus 2:10 in Marathi 10 त्यांनी चोर्या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकांत, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
Titus 2:15 in Marathi 15 तू ह्या गोष्टी समजावून सांग, बोध कर, आणि, सर्व अधिकार पूर्वक दोष पदरी घाल. कोणी तुझा उपहास करू नये.
Hebrews 7:26 in Marathi 26 म्हणून अगदी असाच प्रमुख याजक आपल्याला असणे योग्य होते, तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुध्द आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्याला आकाशाहूनही उंच केलेले आहे.
1 Peter 1:14 in Marathi 14 तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.
1 Peter 2:9 in Marathi 9 पण तुम्ही एक निवडलेला वंश, एक राजकीय याजकगण, एक पवित्र राष्ट्र, देवाचे स्वतःचे लोक असे आहा ; ह्यासाठी की, तुम्हाला ज्याने अंधारातून आपल्या अद्भूत प्रकाशात बोलावले त्याचे गुण तुम्ही प्रसिध्द करावेत.
1 Peter 2:12 in Marathi 12 आणि, परराष्ट्रीयात आपले आचरण चांगले ठेवा, म्हणजे तुम्हाला दुराचरणी मानून, ते जरी तुमच्याविषयी वाईट बोलतात, तरी तुमची जी चांगली कामे त्यांना दिसतील, त्यावरून त्याच्या भेटीच्या दिवशी त्यांनी देवाचे गौरव करावे.
2 Peter 3:14 in Marathi 14 म्हणून प्रियजनहो, ह्या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.
1 John 3:1 in Marathi 1 आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा; आणि आपण तसे आहोच! ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही, कारण त्यांनी त्याला ओळखले नाही.
Revelation 3:9 in Marathi 9 पाहा! जे सैतानाच्या सभास्थानाचे आहेत, ते स्वतःला यहूदी समजतात पण ते यहूदी नाहीत तर ते खोटारडे आहेत. मी त्यांना तुमच्याकडे आणून तुमच्या पाया पडायला लावीन. आणि त्यांना समजेल की मी तुमच्यावर प्रीती केली आहे.