Philippians 2:12 in Marathi 12 म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ माझ्या नसताहि, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.
Other Translations King James Version (KJV) Wherefore, my beloved, as ye have always obeyed, not as in my presence only, but now much more in my absence, work out your own salvation with fear and trembling.
American Standard Version (ASV) So then, my beloved, even as ye have always obeyed, not as in my presence only, but now much more in my absence, work out your own salvation with fear and trembling;
Bible in Basic English (BBE) So then, my loved ones, as you have at all times done what I say, not only when I am present, but now much more when I am not with you, give yourselves to working out your salvation with fear in your hearts;
Darby English Bible (DBY) So that, my beloved, even as ye have always obeyed, not as in my presence only, but now much rather in my absence, work out your own salvation with fear and trembling,
World English Bible (WEB) So then, my beloved, even as you have always obeyed, not only in my presence, but now much more in my absence, work out your own salvation with fear and trembling.
Young's Literal Translation (YLT) So that, my beloved, as ye always obey, not as in my presence only, but now much more in my absence, with fear and trembling your own salvation work out,
Cross Reference Matthew 11:29 in Marathi 29 माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल.
Luke 13:23 in Marathi 23 कोणीतरी त्याला विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?”तो त्यांना म्हणाला,
John 6:27 in Marathi 27 नष्ट होणार्या अन्नासाठी श्रम करू नका, पण सार्वकालिक जीवनाकरता, टिकणार्या अन्नासाठी श्रम करा. मनुष्याचा पुत्र ते तुम्हास देईल, कारण त्याच्यावर देवपित्याने शिक्का मारला आहे.”
Romans 2:7 in Marathi 7 म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच ;
Romans 13:11 in Marathi 11 आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे. कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.
1 Corinthians 9:20 in Marathi 20 मी यहूद्यांना मिळविण्यास, यहुद्यांना यहुद्यासारखा झालो; मी नियमशास्त्राधीन नसलो तरी मी नियमशास्त्राधीन असलेले मिळविण्यास, नियमशास्त्राधीन असल्यासारखा झालो.
1 Corinthians 15:58 in Marathi 58 म्हणून माझ्या प्रिय बंधूनो व बहिणींनो प्रभूमध्ये स्थिर आणि अचल राहा. नेहमी स्वतःला प्रभूच्या कार्यसाठी वाहून घ्या. कारण तुम्ही जाणता की प्रभूमध्ये तुमचे काम व्यर्थ नाही.
2 Corinthians 7:15 in Marathi 15 तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले ह्याची त्याला आठवण होत असता तुमच्यासाठी त्याचा जीव फार उत्कंठित होतो.
Galatians 6:7 in Marathi 7 फसू नका, देवाचा उपहास होणार नाही; कारण मनुष्य जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल.
Ephesians 6:5 in Marathi 5 दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने,व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
Philippians 1:27 in Marathi 27 सांगावयाचे ते इतकेच की ख्रिस्ताच्या सुवार्तेस शोभेल असे आचरण ठेवा; म्हणजे मी येऊन तुम्हाला भेटलो किंवा मी दूर असलो, तरी मला तुमच्या बाबतीत हे ऐकता यावे की, तुम्ही एकजिवाने राहून सुवार्तेच्या विश्वासासाठी, एकजुटीने लढत स्थिर राहता.
Philippians 1:29 in Marathi 29 कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे,तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हाला दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
Philippians 3:13 in Marathi 13 बंधूंनो, मी ते आपल्या ताब्यांत घेतले असे मानीत नाही, पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून,
Philippians 4:1 in Marathi 1 म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुगूट आहा; म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
Philippians 4:15 in Marathi 15 फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, सुवार्तेच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही.
1 Thessalonians 1:3 in Marathi 3 आपल्या देवपित्यासमोर तुमचे विश्वासाने केलेले काम, प्रीतीने केलेले श्रम, व आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावरच्या आशेमुळें धरलेला सहनशीलता ह्यांची आम्ही निरंतर आठवण करतो.
2 Timothy 2:10 in Marathi 10 ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्व काही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकालचे गौरव प्राप्त व्हावे.
Hebrews 4:1 in Marathi 1 म्हणून देवापासून मिळालेले अभिवचन जे त्याच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठीचे आहे, ते अजून तसेच आहे. म्हणून तुमच्यापैकी कोणीही ते चुकवू नये म्हणून काळजी घ्या.
Hebrews 4:11 in Marathi 11 म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
Hebrews 5:9 in Marathi 9 आणि नंतर त्याला परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
Hebrews 6:10 in Marathi 10 कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांना दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
Hebrews 12:1 in Marathi 1 म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहो म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
Hebrews 12:28 in Marathi 28 म्हणून, आम्हाला अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या, आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू;
1 Peter 2:11 in Marathi 11 माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हाला विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्या दैहिक वासनांपासून दूर रहा.
2 Peter 1:5 in Marathi 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकते ज्ञानाची
2 Peter 3:18 in Marathi 18 आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्याला आता आणि सर्वकाळपर्यत गौरव असो. आमेन.