Matthew 4:23 in Marathi 23 येशू गालील प्रांतात सगळीकडे गेला, त्याने सभास्थानात जाऊन शिकविले व स्वर्गाच्या राज्याची सुवार्ता सांगितली. आणि लोकांचे सर्व रोग व आजार बरे केले.
Other Translations King James Version (KJV) And Jesus went about all Galilee, teaching in their synagogues, and preaching the gospel of the kingdom, and healing all manner of sickness and all manner of disease among the people.
American Standard Version (ASV) And Jesus went about in all Galilee, teaching in their synagogues, and preaching the gospel of the kingdom, and healing all manner of disease and all manner of sickness among the people.
Bible in Basic English (BBE) And Jesus went about in all Galilee, teaching in their Synagogues and preaching the good news of the kingdom, and making well those who were ill with any disease among the people.
Darby English Bible (DBY) And [Jesus] went round the whole [of] Galilee, teaching in their synagogues, and preaching the glad tidings of the kingdom, and healing every disease and every bodily weakness among the people.
World English Bible (WEB) Jesus went about in all Galilee, teaching in their synagogues, preaching the Gospel of the Kingdom, and healing every disease and every sickness among the people.
Young's Literal Translation (YLT) And Jesus was going about all Galilee teaching in their synagogues, and proclaiming the good news of the reign, and healing every disease, and every malady among the people,
Cross Reference Matthew 3:2 in Marathi 2 पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
Matthew 8:16 in Marathi 16 मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी पुष्कळ भूतग्रस्तांना त्याच्याकडे आणिले; तेव्हा त्याने भुते शब्दानेच घालवली व सर्व दुखणाइतांना बरे केले.
Matthew 9:35 in Marathi 35 येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याचे सुवार्तेची घोषणा करत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करत सर्व नगरातून व सर्व गावातून फिरला.
Matthew 10:7 in Marathi 7 तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.
Matthew 11:5 in Marathi 5 आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.
Matthew 12:9 in Marathi 9 नंतर येशूने ते ठिकाण सोडले व यहूद्यांच्या सभास्थानात तो गेला.
Matthew 13:19 in Marathi 19 वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो;
Matthew 13:54 in Marathi 54 आणि स्वतःच्या गावी आल्यावर त्याने त्याच्या सभास्थानात त्यांना अशी शिकवण दिली की ते आश्चर्यचकित होऊन म्हणाले, हे ज्ञान व अद्भूत कृत्ये करण्याचे हे सामर्थ्य ह्या माणसाला कोठून मिळते?
Matthew 14:14 in Marathi 14 मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्याला त्यांच्याबद्दल कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.
Matthew 15:30 in Marathi 30 मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांना आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले.
Matthew 24:14 in Marathi 14 सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल. आणि मग शेवट होईल.
Mark 1:14 in Marathi 14 योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालीलास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली.
Mark 1:21 in Marathi 21 नंतर ते कफर्णहूमास गेले, लगेचच त्याने शब्बाथ दिवशी सभास्थानात जाऊन शिक्षण दिले.
Mark 1:32 in Marathi 32 संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले.
Mark 1:39 in Marathi 39 मग तो सर्व गालीलातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भुते काढीत फिरला.
Mark 3:10 in Marathi 10 त्याने अनेक लोकांना बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्याला स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते.
Mark 6:2 in Marathi 2 शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या माणसाला ही शिकवण कोठून मिळाली?'' ''त्याला देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि ह्याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात?''
Mark 6:6 in Marathi 6 त्यांच्या अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले. नंतर येशू शिक्षण देत जवळपासच्या गावोगावी फिरला.
Luke 4:15 in Marathi 15 त्याने त्यांच्या सभास्थानात शिकविले, आणि सर्वांनी त्याची स्तुती केली.
Luke 4:40 in Marathi 40 सूर्य मावळत असतांना, सर्व निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या माणसांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले.
Luke 4:43 in Marathi 43 परंतु तो त्यांना म्हणाला, देवाच्या राज्याची सुवार्ता मला इतर गावांमध्येही सांगितली पाहिजे. कारण याच कारणासाठी मला पाठवले आहे.
Luke 5:17 in Marathi 17 असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते, जे गालील, यहूदीया आणि यरूशलेम या भागातील प्रत्येक गावातून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्या ठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे.
Luke 6:17 in Marathi 17 तो (प्रभू येशू) त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया, यरूशलेम, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते.
Luke 7:22 in Marathi 22 येशूने त्यांना उत्तर दिले, जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुध्द होतात, बहिरे ऐकतात, मेलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.
Luke 8:1 in Marathi 1 त्यानंतर लवकरच असे झाले की, तो उपदेश करीत व देवाच्या राज्याच्या शुभवर्तमान सांगत नगरोनगरी व गांवोगांवी फिरत होता, तेव्हा ते बारा जण त्याच्याबरोबर होते.
Luke 9:11 in Marathi 11 परंतु ह्याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्या मागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलूं लागला, आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.
Luke 10:9 in Marathi 9 आणि त्यांत जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा, व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.
Luke 13:10 in Marathi 10 आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता.
Luke 20:1 in Marathi 1 एके दिवशी येशू मंदिरात लोकांना शिक्षण देत असता व सुवार्ता सांगत असता, एक मुख्य याजक नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडीलजन एकत्र वर त्याच्याकडे आले.
John 6:59 in Marathi 59 कफर्णहूमात शिक्षण देत असताना त्याने सभास्थानात ह्या गोष्टी सांगितल्या.
John 7:1 in Marathi 1 ह्यानंतर येशू गालीलांत फिरू लागला, कारण यहूदी त्याला ठार मारायला टपले होते. म्हणून त्याला यहूदीयात फिरावेसे वाटले नाही.
John 18:20 in Marathi 20 येशूने त्याला उत्तर दिले, “मी जगासमोर उघडपणे बोललो आहे, सभास्थानात आणि मंदिरात, सर्व यहूदी जमतात, तेथे मी नेहमी शिक्षण दिले. आणि गुप्तपणे मी काही बोललो नाही.
Acts 5:15 in Marathi 15 इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रत्यामध्ये आणले आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले.
Acts 9:13 in Marathi 13 परंतु हनन्याने उत्तर दिले, “प्रभू मी त्या मनुष्याविषयी अनेक लोकांच्या तोंडून ऐकले आहे. यरूशलेम येथील तुझ्या संतांशी तो किती वाईट रीतीने वागला हे मी ऐकले आहे.
Acts 10:38 in Marathi 38 नासरेथच्या येशूविषयी तुम्हाला माहिती आहे. देवाने त्याला पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त). येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला. जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले. कारण देव त्याच्याबरोबर होता.
Acts 18:4 in Marathi 4 प्रत्येक शब्बाथवारी पौल सभास्थानात यहूदी लोकांशी व ग्रीक लोकांशी बोलत असे (चर्चा करीत असे) आणि तो यहूदी व ग्रीक लोकांची मने वळविण्याचा प्रयत्न करीत असे.
Acts 20:25 in Marathi 25 राज्याची घोषणा करीत ज्या लोकांत मी फिरलो त्या तुम्हातील कोणालाही मी पुन्हा कधीही दिसणार नाही हे आता मला माहीत आहे
Romans 10:15 in Marathi 15 आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात, त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’