Matthew 20:28 in Marathi 28 म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे.जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
Other Translations King James Version (KJV) Even as the Son of man came not to be ministered unto, but to minister, and to give his life a ransom for many.
American Standard Version (ASV) even as the Son of man came not to be ministered unto, but to minister, and to give his life a ransom for many.
Bible in Basic English (BBE) Even as the Son of man did not come to have servants, but to be a servant, and to give his life for the salvation of men.
Darby English Bible (DBY) as indeed the Son of man did not come to be served, but to serve, and to give his life a ransom for many.
World English Bible (WEB) even as the Son of Man came not to be served, but to serve, and to give his life as a ransom for many."
Young's Literal Translation (YLT) even as the Son of Man did not come to be ministered to, but to minister, and to give his life a ransom for many.'
Cross Reference Matthew 8:20 in Marathi 20 येशू त्याला म्हणाला, खोकडास बिळे व आकाशांतील पाखरांस घरटी आहेत, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास ठिकाण नाही.
Matthew 26:28 in Marathi 28 कारण हे माझे कराराचे रक्त आहे.हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.
Mark 14:24 in Marathi 24 मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.
Luke 22:27 in Marathi 27 तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.
John 11:50 in Marathi 50 प्रजेसाठी एका मनुष्याने मरावे आणि सर्व राष्ट्राचा नाश होऊ नये तुम्हास हितावह आहे,हेहि तुम्ही लक्षात आणीत नाही.”
John 13:4 in Marathi 4 येशू भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्य वस्त्रे एकीकडे ठेवली, आणि एक रूमाल घेऊन आपल्या कमरेला बांधला.
Romans 3:24 in Marathi 24 देवाच्या कृपेने ख्रिस्त येशुने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात.
Romans 4:25 in Marathi 25 तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो उठला आहे.
Romans 5:15 in Marathi 15 पण अपराधाची गोष्ट आहे तशी कृपादानाची नाही; कारण एकाच्या अपराधामुळे जर पुष्कळ मेले, तर त्याहून अधिक हे आहे की, देवाची कृपा व येशू ख्रिस्त ह्या एका मनुष्याच्या कृपेची देणगी पुष्कळांसाठी विपुल झाली.
2 Corinthians 8:9 in Marathi 9 आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
Galatians 3:13 in Marathi 13 आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला.आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’,असा शास्त्रलेख आहे.
Ephesians 1:7 in Marathi 7 त्या प्रियकराच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हाला मुक्त करण्यात आले आहे,त्याच्या कृपेच्या विपुलतेने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे.
Ephesians 5:2 in Marathi 2 आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली, आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
Philippians 2:4 in Marathi 4 तुम्ही कोणीहि आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
1 Timothy 2:6 in Marathi 6 त्याने सर्व लोकांसाठी मुक्तीचे मोल म्हणून स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्य वेळी देणे आहे.
Titus 2:14 in Marathi 14 आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी,आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्व:ताचे लोक आपणासाठी शुध्द करावेत.
Hebrews 2:10 in Marathi 10 देव असा आहे ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि सर्व गोष्टी त्याच्या गौरवासाठी आहेत. देवाला त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या पाहिजेत. म्हणून देवाने जे त्याला करायला पाहिजे होते ते केले. त्याने येशूला जो त्या लोकांना तारणापर्यंत नेतो त्याला परिपूर्ण केले. देवाने त्याला त्याच्या दुःखसहनाद्वारे परिपूर्ण तारणारा बनविले.
Hebrews 5:8 in Marathi 8 जरी तो पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
Hebrews 9:28 in Marathi 28 तसाच ख्रिस्त पुष्कळ लोकांची पापे नाहीशी करण्याकरिता अर्पणरूपाने केवळ एका वेळेस दिला गेला आणि परत एकदा, दुसऱ्या वेळेस, त्यांची पापे नाहीशी करावी म्हणून नव्हे, परंतु जे त्याच्या तारणाची आतुरतेने वाट पाहतात त्यांच्यासाठी दिसेल.
1 Peter 1:18 in Marathi 18 कारण तुम्हाला माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही.
1 Peter 2:24 in Marathi 24 त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, हयासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्वाला जिवंत रहावे; त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहा.
1 Peter 3:18 in Marathi 18 कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मेला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
1 John 2:2 in Marathi 2 तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे.
Revelation 1:5 in Marathi 5 आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी , जो मेलेल्यांमधून प्रथम जन्मलेला, आणि पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासून त्याच्या रक्ताने मुक्त केले;
Revelation 5:8 in Marathi 8 आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले. प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. त्या वाट्या म्हणजे पवित्र जनांच्या प्रार्थना होत्या.